होळी- रंगांचा आणि उत्साहाचा सण
रंगांच्या ऐवजी पाणी, माती, फळं किंवा आणखी काही... पण हे सगळं वापरण्याचा उद्देश फक्त एक... तो म्हणजे आपल्या तक्रारी, गैरसमज दूर करून प्रेमानं सर्वांसोबत राहणं... आपलं लहानपण पुन्हा अनुभवणं...
आज ज्याप्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ, संकटं, नैराश्य आणि स्पर्धा असते, यासर्वांमधून थोडा आराम देण्याचं काम सण करतात. त्यातल्या त्यात "बुरा ना मानो होली है" म्हणत प्रत्येक जण आपल्या आप्तेष्टांना आनंद देण्याचं काम करतो. भारतासोबत इतर देशांनीही होळी सारखा सण आपलासा केलाय. अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या नावानं आणि पद्धतीनं हा सण साजरा केला जातो.
१) स्पेन: ला-टोमाटिना फेस्टिव्हल
स्पेनमध्ये ला-टोमाटिना फेस्टिव्हल खूप प्रसिद्ध आहे. यासाठी खास करून १.५ लाखांहून अधिक टोमॅटो पिकविले जातात. या टोमॅटोंची चव नसते चांगली. म्हणून हे स्वस्त असतात. ला-टोमाटिना स्पेन, स्पेनच्या ब्यूनॉल शहरात वॅलेंसिअन समाजाचे लोकं दरवर्षी साजरा करतात. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या बुधवारी ला-टोमाटिना फेस्टिव्हल साजरा केला जातो. यात एकमेकांवर टोमॅटो फेकले जातात. टोमॅटो कुसकरून फेकावे ही अट असते, कारण कोणालाही त्याच्या माऱ्यामुळं इजा होऊ नये. यात होळी सारखीच मस्ती असते.
का साजरा करतात?
१९४५मध्ये जनावरांच्या एका परेडदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांवर टोमॅटो फेकले. मग नंतर हे दरवर्षी होऊ लागलं आणि आता एक सण झालाय.
२) स्पेन: ग्रेप्स थ्रोईंग फेस्टिव्हल
स्पेनमध्ये आणखी होळीसारखाच साजरा होणारा सण म्हणजे `ग्रेप्स थ्रोईंग फेस्टिव्हल`. यासाठी ९० टन काळ्या द्राक्षांचा यात वापर असतो. या फेस्टिव्हलमध्ये प्रत्येक व्यक्ती जांभळ्या रंगात न्हालेले दिसतात. ग्रेप थ्रोईंग फेस्टिव्हल स्पेनच्या मलोर्का बेटावरील बिनिसलेम शहरात दरवर्षी सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो. यात एक रॉकेट उडवलं जातं. त्य़ानंतर लोकं आपल्या हातात काळी द्राक्ष घेऊन चौकात पोहोचतात. त्यानंतर शिट्टी वाजवली जाते आणि एकमेकांवर दाक्ष फेकली जातात.
का साजरा करतात?
पिकं कापणीची वेळ आलेली असते. याच आनंदात हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. मागील काही वर्षांमध्ये परदेशी नागरिकांना यात सहभागी होण्याची परवानगी मिळाल्यामुळे हा फेस्टिव्हल आणखी प्रसिद्ध झालाय.
३) दक्षिण कोरिया : बोरयोंग मड फेस्टिव्हल
२००९मध्ये हा फेस्टिव्हल वादात सापडला होता. जेव्हा काही विद्यार्थ्यांना मड फेस्टिव्हलनंतर स्किन प्रॉब्लेम झाले होते. बोरयोंग मड फेस्टिव्हल दक्षिण कोरियातील बोरयोंगमध्ये जुलै महिन्यात साजरा केला जातो.यासाठी दायचियोन बीचवर ट्रकांनी भरून माती आणली जाते. त्यात पाणी मिसळून चिखल तयार केला जातो. मग या बीचवर एक-दोन आठवडे मड फेस्टिव्हल चालू असतो. यादरम्यान, चिखलात खेळले जाणारे अनेक खेळ यात खेळले जातात.
का साजरा करतात?
१९९८पासून मड फेस्टिव्हलची सुरूवात झालीय. बोरयोंग इथं काही कंपन्यांनी मातीपासून सौंदर्य प्रसाधनं बनवले, ज्याचं प्रमोशन करण्यासाठी मड फेस्टिव्हल सुरू झाला. मात्र हळुहळु पर्यटकांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रसिद्ध होत या फेस्टिव्हलनं मोठं रूप घेतलं.
४) थायलंड: सोंगक्रॉन फेस्टिव्हल
१३ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान थायलंडच्या नववर्षानिमित्त सोंगक्रॉन फेस्टिव्हल साजरा केला जातो. तीन दिवस चालणारा हा फेस्टिव्हल आहे. हा सण अगदी होळीसारखाच थायलंडमध्ये साजरा केला जातो. फरक इतकाच आहे यात रंगांऐवजी एकमेकांच्या अंगावर पाणी टाकलं जातं. गल्लीबोळांमध्ये जागोजागी लहान मुलं हाती पिचकारी घेऊन इतरांना भिजवतात.
का साजरा करतात?
नववर्षाच्या स्वागतासाठी हा सण थायलंडमध्ये साजरा केला जातो. लोकं पहिले मंदिरात जावून देवाला पाण्याचा अभिषेक धालतात नंतर पाण्याची होळी खेळतात. पहिले हातावर पाणी टाकून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. नंतर फेस्टिव्हल सुरू होतं.
५) ऑस्ट्रेलिया: वॉटरमेलन फेस्टिवल
ऑस्ट्रेलियातील क्वींसलँडमधील चिंचिला नावाच्या ठिकाणी दोन वर्षातून एकदा फेब्रुवारी महिन्यात वॉटरमेलन (टरबूज) फेस्टिव्हल साजरा केला जातो. यादरम्यान इथं मेलन स्कीइंद, मेलन बंदी, मेलन चॅरियट आणि मेलन इटिंग रेससह अनेक स्पर्धा भरवल्या जातात. जॉन ऐवूड नावाच्या व्यक्तीनं तर एका मिनिटात ४७ टरबूज डोक्यावर फोडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. या फेस्टिव्हलमध्ये लोकं एकमेकांवर टरबूज फेकतात आणि खूप मस्ती करतात.
का साजरा करतात?
ऑस्ट्रेलियातील २५ टक्के टरबूज चिंचिला इथं पिकवला जातो. टरबूजच्या प्रमोशनसाठी १९९४मध्ये व्यापाऱ्यांनी या फेस्टिव्हलला सुरूवात केली. हळुहळु प्रसिद्ध होत आता या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकही चिंचिला इथं पोहोचतात.
६) इटली: ऑरेंज बॅटल
उत्तर इटलीच्या इव्रिया शहरात फेब्रुवारी महिन्यात ट्रेडिशनल कार्निव्हल डेज साजरा केला जातो. यालाच ऑरेंज बॅटल असं म्हणतात. या फेस्टिव्हलमध्ये जवळपास ५ लाख पाऊंड किमतीची संत्री फेकली जातात. ऑरेंज बॅटल या सणादरम्यान नऊ टीम असतात, ज्या एकमेकांवर संत्र्यांचा मार करतात. संत्री फक्त त्याच व्यक्तींवर फेकली जातात जी की, या नऊ टीममध्ये आहेत. जर कोणी लाल टोपी घातली आहे त्यांच्यावर संत्री अजिबात फेकली जात नाही.
का साजरा करतात?
या सणाच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र सर्व दुर्जनांचा नाश करून विजयोत्सव साजरा करण्याची ही वेळ आहे. सध्या हा सण पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. देश-विदेशातून हजारों पर्यटक ऑरेंज बॅटलसाठी इटलीत पोहोचतात.
६) म्यानमार: वॉटर फेस्टिव्हल
थायलंड प्रमाणेच म्यानमारमध्येही एप्रिल महिन्यात नववर्षाच्या स्वागताच्यावेळी वॉटर फेस्टिव्हल साजरा केला जातो. इथं याचं नवा `थिंग्यान` असं आहे.
७) स्पेन: फ्लोअर एग फेस्टिव्हल
स्पेनच्या एमबीमध्ये दरवर्षी फ्लोअर एग फेस्टिव्हल साजरा केला जातो. यात दोन गटांतील लोक एकमेकांवर कणिक आणि अंडी फेकतात.
८) स्पेन: वाईन फेस्टिव्हल
स्पेनच्या रियाझो भागातील हैरो शहरात वाईन फेस्टिव्हल साजरा केला जातो. यात लोक एकमेकांच्या अंगावर रेड वाईन टाकतात. हा फेस्टिव्हल दरवर्षी २९ जूनला साजरा केला जातो.
/marathi/slideshow/जगभरात-अशी-साजरी-होते-होळी_313.html/5