हुसेनी हँगिंग ब्रिज, पाकिस्तान
पूल... दोन रस्त्यांना जोडण्याचं ते एक साधन असतं. अनेक वेळा पूल अशा ठिकाणी बनवले जातात जिथं रस्ता बनवणं शक्य नसतं. जसं दोन पहाडांमध्ये असलेल्या दरीवरून पूल बनवला जातो. दोन पहाडांना जोडण्यासाठी पूलाशिवाय दुसरा पर्यायच नसतो.
उंच पहाड आणि धोकादायक ठिकाणांवर पूलावरून जातांना अनेकांना हाइट फोबिया म्हणजेच उंचावरुन जाण्याची भीती वाटते. मात्र जगात असे अनेक धोकादायक पूल आहेत, ज्यावरून जातांना सामान्य माणूसही घाबरेल. यावरून जाणं म्हणजे खरोखर खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासारखं आहे.
पाकिस्तानातील हा पूल जगातील सर्वात भयावह पूलांमधील एक पूल आहे. बोरीट लेकला पार करण्यासाठी हा पूल तयार करण्यात आलाय. दोरी आणि लाकडाच्या पाट्यांनी बनलेल्या या पूलावरून थेट रावळपिडींपर्यंत पोहोचता येत. तिथं पायी जाण्याचा हा रस्ता आहे. शहरांना शहरांसोबत जोडण्यासाठी हायवे बनवले गेले. मात्र आत गावांमध्ये प्रवास करणं अजूनही १०० वर्षांपूर्वी इतकंच त्रासदायक आहे.
कॅनोरी वॉक, घाना
आफ्रिकेतील देश म्हणजे घाना... घानाच्या काकुल नॅशनल पार्कमध्ये हा पूल आहे. कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये असलेला हा एकमेव पूल आहे. हा पूल म्हणजे अनेक झाडांना जोडत बनवलेला पूल आहे. या पूलामुळं पर्यटकांना नॅशनल पार्कमधील प्राण्यांना वरून बघण्याची संधी मिळते. मात्र या पुलावरून चालणं काही सोपी नाही.
लांगक्वी स्काय ब्रिज, मलेशिया
हा पूल लांगक्वी बेटावरील घाटावर बनवलेला आहे. समुद्र सपाटीपासून ६८७ मीटर उंचीवर हवेत झुलणारा हा पूला. या पूलावरून अंदमानातील समुद्र आणि थायलंडच्या टारूटोआ बेटावरील सुंदर दृश्य सहज पाहता येतं. मात्र या पूलावरून खाली बघणं सर्वांनाच काही शक्य नाही. २००४मध्ये बनलेला हा पूल जानेवारी २०१४ला बंद केला गेला आणि कदाचित आता तो कधीच सुरू होणार नाही.
माउंट टायटलिस, स्वित्झर्लँड
स्वित्झर्लँडच्या अल्पसच्या पहाडांवर बनलेला हा टायटलिस क्लिफ ब्रिज हा हवेत लटकणाऱ्या यूरोपातील सर्वात खतरनाक ब्रिजमधील एक ब्रिज आहे. हा ३,००० मीटर उंचावर आहे. यावरुन आपल्याला अंदाज येईल की या ब्रीजवर जाण्यासाठी किती हिंमत लागेल. २०१३मध्ये हा पूल सुरू झाला. खूप बर्फ पडत असतांना त्याचा आणि हवेचा सामना करण्याच्या दृष्टीनं हा ब्रिज सुरक्षित आहे.
वितीन रिवर ब्रिज, रशिया
रशियाच्या सायबेरियामध्ये वितिन नदीवर जवळपास ५७० मीटर लांब हा पूल खूप खतरनाक आहे. या पुलावरून जाणारे बोटावर मोजण्या इतकेच लोकं आहेत की जे जिवंत वाचले आहेत. हा पूल कार जावू शकेल असा रूंद आहे. मात्र यावर रेलिंग नाहीय. सोबत आता या पुलावरील लाकडं खूप खराब झाली आहेत. अशातच त्याच्यावरून चालत जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे.
मिलाउ वायडक्ट, फ्रान्स
फ्रांसमधील एका मुख्य मार्गावरून जाण्यासाठी बांधला गेलेला हा जगातील सर्वात उंच ब्रिज आहे. या ब्रिजची उंची आयफेल टॉवर पेक्षाही जास्त आहे. हा ब्रिज पॅरिसला मांटपेल्लरला जोडतो. इंजिनिअरिंग क्षेत्रातील हा ब्रिज जगातील सर्वात मोठी उपलब्धी आहे.
क्यूपोस ब्रिज, कोस्टा रिका
कोस्टा रिकामध्ये बनलेल्या या पूलाचा फोटोच बघून चांगले-चांगले लोकं आपली हिंमत करत नाहीत. म्हणूनच या ब्रिजला ‘द ब्रिज ऑफ डेथ’ असं म्हटलं जातं. ब्रिजची परिस्थिती पाहून असं वाटतं की हा पूल कधीही तुटून पडेल. मात्र तरीही या पुलावरून लोकांसोबत ट्रकही येणं जाणं करतात.
पुअंट डी ओजुएला, मॅक्सिको
दुरांगोच्या पश्चिम-उत्तर शहरात ओज्युएला खाणीतील एक छोटसं ठिकाणं. धातू आणि खनिजांच्या खाणी असलेलं हे ठिकाण आता घोस्ट शहरमध्ये रूपांतरित झालंय. या शहराची रचना (जे कामाच्या लायक आहेत) आता केवळ एक रचनाच उरलेली आहे. ज्याला पुअंट डी ओजुएला ब्रिजच्या नावानं ओळखला जातो. याला नुकतंच पेनोल्सनं दुसऱ्यांदा बनवलं.
एग्युली ड्यू मिडी ब्रिज, फ्रांस
फ्रांसमधीलच हा एक दुसरा धोकादायक पूल अल्प्सच्या पहाडांवर बनलेला आहे. दोन पहाडांना हा पूल जोडतो. पूल छोटा आहे मात्र खूप उंचावर आहे. या पुलापर्यंत पोहोचण्यासाठी ९,२००च्या उंचीवर केबल कार द्वारे जावं लागतं.
रॉयस जॉर्ज ब्रिज, अमेरिका
पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारा हा ब्रिज. २००१पर्यंत हा जगातील सर्वात उंच पूल होता. या पूलाजवळ असलेल्या जंगलात २०१३मध्ये आग लागली होती, ज्यामुळं हा पूल बंद करण्यात आला होता. आता हा पूल याच वर्षी पुन्हा खुला होण्याची शक्यता आहे.
/marathi/slideshow/जगातील-१०-सर्वात-धोकादायक-पूल_325.html/1