मेरी मां (तारे जमीन पर)
बाल कलाकार दर्शीलवर आधारीत तारे जमीन पर या सिनेमात मेरी मां हे गाणं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी घेऊन येतं. गायक शंकर महादेवन याने हे गाणं गायलं आहे. या गाण्यासाठी शंकर महादेवन यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
ए मां तेरी सूरत (दादी मां)
ए मां तेरी सूरत या गाण्याला आईवर प्रदर्शित केलेल्या गाण्यांमध्ये अप्रतीम शब्द रचनेसाठी नेहमीच गुणगूणलं जातं. १९६६ साली दादी मां हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी ह्या गाण्याला लोकांनी खूपच पसंती दर्शवली होती.
मम्मा (दस विदानिया)
२००८ साली दस विदानिया हा सिनेमा प्रदर्शीत झाला. विनय पाठकने या सिनेमात काम केलं होतं. `मम्मा` या गाण्याला या सिनेमात प्रदर्शित केलं होतं. या गाण्यामध्ये आपल्या आयुष्यात आईची जागा किती महत्वाची असते. हे दाखवण्यात आलं आहे.
तू कितनी अच्छी है (राजा और रंक)
तू कितनी अच्छी है गाणं लता मंगेशकरने यांनी गायलं आहे. या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं आहे. १९९८ मध्ये राजा और रंक या सिनेमातील हे गाणं नेहमीच भावना दाटून आणणारे आहे
लुक्का छुप्पी (रंग दे बसंती)
संगीतकार ए आर रेहमान यांनी संगीतबद्द केलेल्या या गाण्याला देखील लता मंगेशकर यांनीच गायलं आहे. रंग दे बसंती सिनेमातील सगळ्यात लोकप्रिय अशा या गाण्यात आई पासून मुलगा लांब गेल्यावर त्याच्या कशा प्रकारच्या भावना असतात, हे सांगण्यात आलं आहे.
/marathi/slideshow/मदर्स-डे-आणि-गीते_327.html/4