गिफ्ट्सचा नजराणा
प्रत्येक मुलाला वाटत असतं, की त्याची आई हीच त्याच्यासाठी देवाने पाठवलेली परी असते. `मदर्स डे` हा दिवस अशाच आपल्या सुंदर आईसाठी साजरा केला जातो. अशा दिवशी आपल्या आईला खुश करण्यासाठी काही तरी गिफ्ट दिलं तर नक्कीच ती आनंदी होईल.
मग आता पाहुया काही असे गिफ्ट्स, जे तुम्ही तूमच्या आईला दिले तर तिला नक्कीच आश्चर्य होऊन ती खूश होईल.
ब्रेकफास्ट इन बेड
रोज तुमची आई सकाळी लवकर उठून तुमच्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट करते. पण `मदर्स डे`च्या दिवशी तुम्ही लवकर उठून तुमच्या आईसाठी सकाळचा तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट तयार करू शकता. तूम्ही तुमच्या आईसाठी यासाठी काही तरी साधं असं तयार करू शकता. यामध्ये ब्रेड बटर टोस्ट, अंड्याचं ऑमलेट आणि ब्रेड, सॅंडविच आणि चहा किंवा कॉफी यासारखे पदार्थ तुम्ही तयार करून आईला सकाळीच एक मस्त सप्राईज देऊ शकता.
सुंदर फुलं
लहानपणापासून जसं तुमची आई तुम्हाला फुलासारखं सांभाळते. तसंच तुम्ही देखील `मदर्स डे` दिवशी तुमच्या आईला जगातील सुंदर फुले देऊन तीच्या चेहऱ्यावर फुलासारखं एक सुंदर हास्य उमलून आणू शकता. यासाठी तुमच्या पॉकेटमनीमधून जास्त पैसे ही खर्च होणार नाही. ही फूलं तुम्ही आईच्या बेडजवळ रात्रीच ठेवली. तर तिची सकाळ देखील फुलांसारखी सुंदर होईल.
पिकनिक
एका सुंदर सकाळीच आईला घेऊन एका जवळच्याच सुंदर ठिकाणी किंवा हील स्टेशनवर फिरायाला जा. एक चांगला वेळ तुम्ही आई सोबत तिथे घालवू शकता. गप्पा मारून आईचा एकटेपणा दूर करू शकता. मस्ती मज्जा करून आईच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता. जर का पूर्ण दिवस जाता येत नसेल तर, दिवसातील थोडासा वेळ घालवून आईला मस्त लाँग ड्राईव्हला घेऊन जा.
होम मेड कार्ड
आईला सोने, चांदी आणि हिरे देण्यापेक्षा लहान मुलांनी हाताने बनवलेलं एक ग्रिटींग दिलं, तरी आईला ते सोने आणि हिऱ्यांपेक्षा जास्त किंमतीचं असेल. हे कार्ड्स तुम्ही न्यूज पेपर, किंवा कार्ड पेपर अशा गोष्टींनी तयार करू शकता. त्यावर एक छान चित्र आणि एक मॅसेज लिहून तुमचं हे गिफ्ट तयार होईल. या गिफ्टचं वैशिष्ट म्हणजे हे कार्ड तुम्ही घरातील पेपर्सचा वापर करून तयार करू शकता.
डिनर
जर का तुम्ही किचनमध्ये काही करू शकत नसाल आणि दिवसभर घरी देखील थांबू शकत नसाल, तर मग आईसोबत रात्री डिनर एन्जॉय कारायाला तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आईच्या आवडत्या रेस्टॉरंट किंवा तिला आवडतं अशा फूड रेस्टॉरंटमध्ये जाऊन आई सोबत मस्त डिनर फूड एन्जॉय करा.
स्पा गिफ्ट
मम्माला हेल्थकेअरसाठी स्पा गिफ्ट देऊन तुम्ही तीच्या हेल्थची देखील काळजी घेऊ शकतात. आईची तब्बेत ठिक राहिली, तर घरातील सगळ्यांची तब्बेत ठिक राहील असं म्हटलं जातं. आईला स्पाचे वॉवचर्स देऊन तुम्ही आईला एक चांगलं गिफ्ट देऊ शकतात. याच प्रकारे आईला हेल्थकेअरच्या वस्तू देऊन तुम्ही तिला एक प्रकारे हेल्दी गिफ्ट देऊ शकता.
गुड नाईट केक
`मदर्स डे`चा शेवट तुम्ही आईला गुड नाईट केक देऊन करू शकता. यासाठी सध्या बाजारात असलेल्या फेमस केक शॉप मधून केक आणून आईच्या हाताने तुम्ही तो कापू शकता. याच प्रकारे कुठलेही स्विट डेजर्ट तुम्ही आईला देऊन तिचा संपूर्ण दिवस गोड करू शकता.
/marathi/slideshow/मदर्स-डे-निमित्त-गिफट_328.html/4