लज्जा (२००१)
दिग्दर्शिक/निर्माता/कथा- राजकुमार संतोषी
कलाकार - मनीषा कोईराला, माधुरी दीक्षित, महीमा चौधरी, रेखा, जॅकी सराफ, अनिल कपूर, अजय देवगण, समीर सोनी
चित्रपटातील कथानक देशातील स्त्री सशक्तीकरणावर आहे. चित्रपटातल्या प्रत्येक भूमिकेतून हे स्पष्ट केलं गेलंय.
डोर (२००६)
दिग्दर्शक - नागेश कुकुनूर
निर्माता - इले हिप्तूला
कलाकार - आयशा टाकिया, गुल पनाग, श्रेयस तळपदे
चित्रपटातील कथानक भारताच्या पुरातन मतवादावर आधारित आहे. ही एका `मीरा`ची कथा आहे. जी विधवा असल्यामुळे तिचा कुटुंबाकडून पाणउतारा केला जातो. विधवा महिलांना किती वाईट रित्या वागणूक दिली जाते हे या चित्रपटाद्वारे सांगण्यात आलंय.
अस्तित्व (२०००)
दिग्दर्शक/कथा - महेश मांजरेकर
निर्माता - राहुल
कलाकार - तब्बु, सचिन खेडेकर, मोहनिश बेहल, रवींद्र मानकानी, स्मिता जयकर
चित्रपटाचं कथानक विवाहबाह्य जीवन आणि लग्ननंतर स्त्रीबरोबर केलं जाणारं गैरवर्तणूक याबद्दल आहे. यामध्ये ती स्त्री तिची ओळख शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
चक दे इंडिया (२००७)
दिग्दर्शक - शिमीत अमीन
निर्माता - आदित्य चोप्रा
कलाकार - शाहरुख खान
चित्रपटाचं कथानक प्रत्येकानं दुर्लक्ष केलेल्या अशा भारतीय महिलाच्या हॉकी संघावर आधारित आहे. कार्यसंघाचे प्रशिक्षक कबीर खान (शाहरुख खान) त्यांच्या स्वतःच्या स्पर्धात्मक स्वरूप आणि वैयक्तिक सहकार्यानं भारताच्या विविध विभागांमधील १६ महिला खेळाडूंचा एक गट तयार केला जातो. मुलीं अखेरीस स्पर्धा जिंकतात. एकजुटीने काम केल्याने, संकटांवर मात करता येते असा संदेश देणारा हा चित्रपट आहे.
मदर इंडिया (१९५७)
दिग्दर्शक - मेहबूब खान
निर्माता - मेहबूब खान
कलाकार - नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राज कुमार
चित्रपटाचं कथानक एका गरीब शेतकरी कुटुंबावर आधारित आहे. राधा (नर्गिस)जी एक विधवा असल्यामुळे तिला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. `ऑस्कर` नामाकंनसाठीचा हा पहिला बॉलीवूड चित्रपट आहे.
दामिनी (१९९३)
दिग्दर्शक - राजकुमार संतोषी
निर्माता - अली मोरानी, करीम मोरानी, बंटी सूर्मा
कलाकार - मीनाक्षी शेषाद्री, ऋषी कपूर, सनी देओल, अमरीश पुरी, टीनू आनंद, परेश रावल
चित्रपटाचं कथानक दामिनीवर तिच्या मालकाद्वारे केला गेलेला लैंगिक अत्याचार, कुटुंबातून होणारा पाणउतारा आणि याबाबत तिचा लढा यावर आधारित आहे.
मिर्च मसाला (१९८७)
दिग्दर्शक - केतन मेहता
निर्माता - राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ
कलाकार - स्मिता पाटील, नसरुह्दीन शाह, ओम पुरी, परेश रावल, सुरेश ओबेरॉय
चित्रपटाचं कथानक दडपशाही विरोधात लढा देणाऱ्या एका शक्तिशाली स्त्रीबद्दल आहे.
बॅडिंड क्वीन (१९९४)
दिग्दर्शक - शेखर कपूर
निर्माता - बॉबी बेदी
कलाकार - सीमा बिस्वास
चित्रपटाचं कथानक फुलणदेवी आणि तिच्या जीवनवर आधारित आहे.
मातृभूमी (२००३)
दिग्दर्शक - मनीष झा
निर्माता - पॅट्रिक सोबेलमन, पंकज खरबंदा
कलाकार - ट्युलिप जोशी, सुधीर पांडे, सुशांत सिंह, आदित्य श्रीवास्तव
नो वन किल जेसिका (२०११)
दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता
निर्माता - रॉनी स्क्रुवाला
कलाकार - राणी मुखर्जी, विद्या बालन
चित्रपटाचं कथानक जेसिका लाल हत्याकांडावर आधारित आहे. राणी मुखर्जीनं पत्रकाराची भूमिका केलीय. तर आपल्या बहिणीच्या हत्येविरोधात लढा देणाऱ्या बहिणीची भूमिका विद्या बालननं केलीय.
इंग्लिश विंग्लिश (२०१२)
दिग्दर्शक - गौरी शिंदे
निर्माता - सुनील लुल्ला, आर बल्की, राकेश झुनझुनवाला, आर. के. दमानी
कथा - गौरी शिंदे
कलाकार - श्रीदेवी, प्रिया आनंद, आदिल हुसेन
कहानी (२०१२)
दिग्दर्शक - सु़जॉय घोष
निर्माता- सुजॉय घोष, कुशल कंटीलाल
कथा - अद्वैत कला, सुजॉय घोष
कलाकार - विद्या बालन, परम्ब्रता चॅटर्जी, नवाजुद्दीन सिद्धीकी, इंद्रनील सेनगुप्ता, सास्वता चॅटर्जी
चित्रपटाचं कथानक रहस्यमय आणि रोमांचक आहे. यात विद्या बालननं अतिशय चांगली कामगिरी केली आहे. तिच्या पतीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्याला ती ठार मारते.
/marathi/slideshow/महिला-प्रधान-भूमिका-असलेले-बॉलिवूडचे-टॉप-चित्रपट_309.html/5