देवदास
संजय लीला भंसाली यांच्या `देवदास`मध्ये माधुरीने भूमिका केली. चंद्रमुखी ही व्यक्तीरेखा निभावली. ही फिल्म बॉक्स ऑफिस हिट राहिली.. फिल्मने पाचवा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री म्हणून माधुरीला गौरविण्यात आले.
तेजाब
माधुरी दीक्षितचा `तेजाब` हा सिनेमा खूप गाजला. एका नृत्याने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली. माधुरीने फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे नामांकन जिंकले. `एक दो तीन` या गाण्यावर माधुरी दीक्षित बेभान नाचली.
राम लखन
माधुरीने अनिल कपूरबरोबर `राम लखन` मध्ये काम केले. सुभाष घई यांचा हा सिनेमा हिट झाला. माधुरी एक चांगली डान्सर नाही तर ती उत्कृष्ठ काम करु शकते हे तिने या सिमेनातून दाखवून दिले. राधाची भूमिका स्क्रीनवर चांगली निभावली. तिचे अनिल कपूर चांगले रसायन जुळले होते, अशी प्रशंसा केली गेली.
दिल
आमिर खानबरोबर माधुरी चमकली. `दिल` या सिमेनामुळे माधुरीला फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट सुपर हिट झाला. या सिमेमातील गाण्यांनी लोकांना वेड लावले होते.
साजन
सलमान खान आणि संजय दत्त यांच्यासोबर माधुरीने काम केले. `साजन` या सिनेमात तिने नायिकेची भूमिका केली. या सिनेमाने चांगली कमाई केली. बॉलिवूडमध्ये या सिनेमाची चलती राहिली.
बेटा
माधुरी दीक्षित पुन्हा एकदा अनिल कपूरबरोबर काम करताना दिसून आली. या सिनेमात माधुरीने अप्रतिम भूमिका केली. धक धक गर्ल म्हणून माधुरीची ओळख झाली होती. त्यात अधिक भर पडली. या सिनेमातील कामानंतर माधुरीला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
बेटा
माधुरी दीक्षित पुन्हा एकदा अनिल कपूरबरोबर काम करताना दिसून आली. या सिनेमात माधुरीने अप्रतिम भूमिका केली. धक धक गर्ल म्हणून माधुरीची ओळख झाली होती. त्यात अधिक भर पडली. या सिनेमातील कामानंतर माधुरीला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
खलनायक
माधुरी `खलनायक`मध्ये संजय दत्तबरोब काम केले. हा सिनेमा सुपरहिट झाला. यामध्ये माधुरीने बोल्ड सिन दिलेत. `चोली के पीछे` हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. माधुरीने या गाण्यावर कामूक नृत्य सादर केले.
हम आपके हैं कौन ..!
माधुरी दीक्षितची ही कौटुंबीक फिल्म ओळखली केली. `हम आपके हैं कौन` या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर बॉक्सऑफिसवर जोरदार गल्ला जमवला. या चित्रपटाने सात वर्षांचे सर्व रिकॉर्ड तोडले. माधुरीची भूमिका खास राहिली. समलान खानसोबत तिने या सिनेमात काम केले. माधुरी दीक्षित या सिनेमातील भूमिकेबद्दल सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. माधुरीवर चित्रित केलेल्या `दीदी तेरा देवर दीवाना` या गाण्याने बॉलिवूडमध्ये जादू केली.
मृत्यूदंड
प्रकाश झा यांची `मृत्यूदंड` ही फिल्म माधुरीसाठी खास ठरली. माधुरीच्या अभिनयाचा यात कस दिसून आला. माधुरीने या सिनेमातून आपली छाप पाडली.
दिल तो पागल है
यशराज बॅनरची `दिल तो पागल है` या फिल्मने रेकॉर्ड केला. माधुरी दीक्षितने यात शाहरुख खानबरोबर भूमिका केली. यामध्ये माधुरीचा डान्स जलवा पाहायला मिळाला. हा सिमेना सुपरहीट झाला शिवाय माधुरीचे स्टार एकदम चमकलेत. तिला वर्षातील फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
लज्जा
लज्जा या सिनेमातून स्त्री-पुरुष असमानता दाखविण्याचा प्रयत्न केला. या सिनेमात माधुरीने महत्वाची भूमिका साकारली. यामध्ये रेखा आणि मनिषा कोयराला या आघाडीच्या अभिनेत्रीही होत्या. हा सिनेमा नेहमीत चर्चेत राहिला. प्रामुख्याने माधुरीही चर्चेत होती.
/marathi/slideshow/माधुरी-दीक्षितचे-सर्वश्रेष्ठ-सिनेमे_329.html/5