पहिला वहिला कॅनवास
मायक्रोमॅक्सने स्मार्ट फोनमध्ये फिचर्स आणि किमतीच्या तुलनेत इतर कंपन्यांना टक्कर दिली आहे. मायक्रोमॅक्सने आपला पहिला वहिला कॅनवास ब्रँडमध्ये टॅबलेट लाँच केलाय. कॅनवास टॅब पी६५०नावाच्या या टॅबलेटमध्ये ८ इंचाचे स्क्रीन आहे. हा टॅबलेट अॅपलचा आयपॉड मिनी, सॅमसंग गॅलेक्सी टॅबलेट ३च्या स्पर्धेत उतरला आहे.
अॅल्युमिनियम बॉडीत
अॅल्युमिनियम बॉडीत बनलेला कॅनवास टॅब पी६५० मध्ये आयपीएस डिस्प्ले आहे. यात एंड्राइड ४.२ (जेली बिन) ऑपरेटिंग सिस्टम आहे, जो अपग्रेडेड वर्जन आहे, ज्याला गूगल भविष्यात आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रयोग करणार आहे. यात १.२ गीगाहर्ट्स क्वॉडकोरच्या प्रोसेसरसोबत १ जीबीचे रॅम आहे.
काय आहे या टॅबमध्ये
टॅबलेटमध्ये १६ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि ३२ जीबी मायक्रोकार्ड एसडीद्वारे वाढवू शकता. यात ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फ्रंटमध्ये २ मेगापिक्सल शूटरचा कॅमेरा आहे. हा टॅबलेटमध्ये वाय-फाइ आणि ३जी नेटवर्कसोबत व्हाइस कॉलिंग सुविधा आहे. भारतात या टॅबलेटची किंमत १६,५०० रुपए आहे.
अॅप्स मिळणार फ्री
यात ४८०० एमएएचची बॅटरी लागलेली आहे. ही बॅटरी पाच तास इंटरनेट ब्राऊजिंगचा वेळ देते. या टॅबलेटमध्ये ऑपेरा मिनी, एम लाइवल म्युझिक हम आणि एम सिक्योरिटी सारखे अॅप्स प्रीलोडेड आहे. सुपीरियर टेक्नॉलॉजी आणि अनमॅच्ड स्टाइल असणारे कॉम्बिनेशन असणारे हे टॅबलेट आहे.
नवीन स्मार्ट फोन
मायक्रोमॅक्सने आपला नवीन स्मार्ट फोन ३४ लाँच केला आहे. ३.९५ इंचीच एचवीजीए स्क्रीन ३२०x४८० पिक्सलच्या रेजल्यूशनसोबत सादर केला आहे. या स्मार्ट फोनचे वजन ८५ ग्राम आहे. १ गीगाहट्जच्या प्रोसेसरसोबत २५६ बी रॅम.
मायक्रोमॅक्सचा स्मार्टफोन ड्यूल सिमचा
मायक्रोमॅक्स स्मार्टफोन हँडसेट ड्यूल सिमचे आहे आणि दोन्ही सिम जीएस आहे. यात दोन मेगापिक्सलचा कॅमेरा फ्लॅशसोबत लावण्यात आला आहे. या कॅमेर्यात मल्टीशूट मोडसोबत ८xचा झूम आहे. यात ब्राइटनेस कंट्रोलपण ७x आहे. या हँडसेटमध्ये १३५० एमएएचची पॉवरफुल बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की यात ४ तासाचा टॉकटाइम आणि १२०घंटे स्टंडबॉय टाइम आहे.
/marathi/slideshow/मायक्रोमॅक्सचा-कॅनवास-टॅबलेट-किंमत-१६-५००_273.html/5