टर्मिनल-२
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रुपडे बदलण्यात आले आहे. त्यामुळे नवा लूक डोळ्यांचे पारणे फेडतो. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन रुप सर्वांनाच आकर्षित करीत आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ चे उदघाटन शुक्रवारी रण्यात आले. या टर्मिनल-२ चे प्रवाशांनाच नाही तर सामान्यांनाही प्रचंड कुतूहल आहे.
कसं आहे टर्मिनल-२
या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ हे ४,३९,२०३ चौ.मी. इतके आहे. या विमानतळाची प्रवाशी वाहन क्षमता प्रतिवर्ष ४ कोटी आहे. तसेच या आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८८ चेक इन काउंटर आणि ६० डिपार्चर इमिग्रेशन काऊंटर आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२४ सुरक्षा तपासणी नाके आहेत. या विमानतळावरील वाहनतळाची क्षमता ५००० वाहने एकाच वेळेस बसतील इतकी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुविधा
पश्चिम द्रुतगती महामार्गापासून सहापदरी उन्नत रस्ता टर्मिनल-२ ला जोडण्यात आला आहे. या मार्गावरुन टर्मिनल-२ मधील बहुतांश प्रवाशी मार्गस्थ करणार आहेत. नवीन मार्गामुळे आता ५०० मीटरचे अंतर कमी होणार आहे.
टर्मिनसचे नवीन रुप
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पॅसेंजर बोर्डिग ब्रिज ५२ आहे. या विमानतळावर सरकते पट्टे ४४ बसवण्यात आले आहे. तसेच या विमानतळावर ४९ सरकते जिने लावण्यात आले आहेत आणि ७३ एलिव्हेटर्स ही आहे. या नवीन रुपाल्या विमानतळावर १०१ प्रसाधनगृहाची सोय करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी २३०० सीसीटीव्ही कॉमेरे बसवण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोईच्या गोष्टी
आगमन झालेल्या प्रवाशांना त्यांचे सामान त्वरित मिळण्यासाठी टर्मिनल-२ च्या आगमन कक्षात १० बॅगेज कन्वेअर बेल्ट बलवण्यात आले आहेत.
बॉलिवू़ड अवतरणार
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रुपडे बदलण्यात आले आहे. त्यामुळे नवा लूक डोळ्यांचे पारणे फेडतो. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन रुप सर्वांनाच आकर्षित करीत आहे. त्याचच बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी, कला, संगित, नाट्य यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मोठे डिजीटल बोर्ड लावण्यात आले आहेत.
संस्कृतीची ओळख
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवं रूप देण्यात आले असताना भारतीय संस्कृतीची ओळख या विमानतळावर आल्यावर होण्यासाठी तशी माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुसान भिंतीवर तशी चित्र, शिल्प काढण्यात आली आहेत.
/marathi/slideshow/मुंबई-विमानतळाचा-राजेशाही-थाट_301.html/5