श्रीदेवी
श्रीदेवीने तर रजनीकांतसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तामिळ आणि हिंदी सिनेमांमध्येही दोघांची जोडी पाहायला मिळाली. पण जेव्हा रजनीकांतने मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एंट्री केली, तेव्हा श्रीदेवी अवघ्या १२ वर्षांची होती.
रेखा
अभिनेत्री रेखा टाईमलेस ब्युटी मानली जाते. एव्हरग्रीन रेखा जेव्हा २१ वर्षांची होती तेव्हा रजनीकांतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी एकत्र ३ हिंदी सिनेमे केले आहेत.
रमैय्या कृष्णन
रमैय्या कृष्णन या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने रजनीकांतसोबत अनेक तेलगू सिनेमे केले आहेत. ती रजनीकांतपेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. जेव्हा रजनीकांत पहिल्यांदा सिनेमात आला, तेव्हा रमैय्या १२ वर्षांची होती.
सौंदर्या
दिवंगत कन्नड अभिनेत्री सौंदर्या ‘सूर्यवंशम’मध्ये अमिताभ बच्चनची नायिका म्हणून हिंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. रजनीकांतचीही ती नायिका होती. तिने रजनीकांतसोबत दोन सिनेमे केले. पण जेव्हा रजनीकांतने सिनेमात पदार्पण केलं, तेव्हा, सौंदर्या ३ वर्षांची होती.
खुशबू
रजनीकांतने मनन, अन्नामलई, पांदियां या सिनेमांमध्ये खुशबू या अभिनेत्रीसोबत काम केलं. मात्र जेव्हा रजनीकांतने जेव्हा सिनेमांमध्ये पदार्पण केलं, तेव्हा खुशबू ५ वर्षांची होती.
मनीषा कोईराला
मनीषा कोईराला रजनीकांतसोबत `बाबा` सिनेमात दिसली होती. मनीषा ५ वर्षांची असताना रजनीकांत सिनेमात आला होता.
ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन रजनीकांतपेक्षा वयाने बरीच लहान आहे. जेव्हा रजनीकांतने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हा ऐश्वर्या फक्त २ वर्षांची होती. पण रोबोट सिनेमात ऐश्वर्याने रजनीकांतच्या नायिकेचं काम केलं.
नयनतारा
नयनतारा ही दक्षिणेतील हॉट अभिनेत्री कुसेलन सिनेमात रजनीकांतची नायिका होती. मात्र जेव्हा रजनीकांत पहिल्यांदा सिनेमात आला, तेव्हा नयनतारा जन्मलीही नव्हती. ती त्यानंतर १० वर्षांनी जन्मली होती.
श्रेया सरन
शिवाजी द बॉस या जबरदस्त हिट सिनेमात रजनीकांतची नायिका असलेल्या श्रेया सरनतर रजनीकांतपेक्षा ३२ वर्षांनी लहान आहे.
दीपिका पादुकोण
आगामी कोचडायन या सिनेमात रजनीकांतची नायिक असणार आहे दीपिका पादुकोण. दीपिका रजनीकांतपेक्षा वयाने बरीच लहान आहे. रजनीकांतने १९७५ साली जेव्हा पहिल्यांदा सिनेमात पदार्पण केलं, त्यानंतर ११ वर्षांनी दीपिकाचा जन्म झाला.
/marathi/slideshow/रजनीकांतच्या-नायिका_264.html/5