`नेत्यांची` वाचाळ वस्ती...
लोकसभा निवडणूक २०१४ बऱ्याच नागरिकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील ती केवळ स्वत:ला नेते म्हणवणाऱ्या मंडळींच्या वाचाळ बडबडीमुळे...
निवडणुकीआधी आपल्या विरोधकांवर टीका करताना अनेक नेत्यांची कमरेखालची पातळी गाठली... अनेकांनी धार्मिक मुद्दे टोकाला नेले... तर काहींनी बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्याचाही प्रयत्न करत काही ठराविक मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.
पण, आपणच केलेली वक्तव्य जेव्हा अंगाशी आलेली दिसली तेव्हा मात्र अनेकांनी आपल्याच वक्तव्यांवरून पलटी मारली... पाहुयात अशाच काही नेत्यांची बडबड गिते...
अजित पवार
"धरणांमध्ये पाणी नाही, तर मी काय त्यात जाऊन मुतू का?"
राज ठाकरे
" धरणांमध्ये पाणी नाही, तर मी काय त्यात जाऊन मुतू का असं अजित पवार म्हणाले. अजित पवार तुम्हाला निवडणुकीत आता मत नाही मूत मिळणार आहे. महाराष्ट्राची जनता तुमच्यावर मुतणार आहे. त्यात तुम्ही वाहात महाराष्ट्राबाहेर जाल. आणि तुम्हाला थांबवायला बंधारेही नाहीत. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की धरणं किंवा बंधारे बांधले असते, तर वाहात एवढं दूर आलो नसतो"
राज ठाकरे
"उत्तर भारतीय माझ्या मराठी मुलांच्या तोंडातील घास हिसकवून घेत असतील तर पुन्हा मारीन... परप्रांतीय महाराष्ट्रात येतात. त्यांना नोकऱ्या मिळवतात, पण माझे मराठी मुले नोकरीपासून वंचीत राहतात. माझ्या मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. राज्यातील या उत्तर भारतीयांना लाथाडतात, पण त्यांना कोणी देशाच्या आस्मितेबद्ल सांगत नाही फक्त आम्हांला देशाच्या अखंडतेबद्दल डोस पाजले जातात"
राखी सावंत
* "जर चहा विकणारे मोदी पंतप्रधान देश चालवू शकतात... तर, एक आयटम गर्ल का नाही चालवू शकत?"
* "मी `आयटम गर्ल` असेल तर अरविंद केजरीवाल `आयटम बॉय` आहेत"
ए के अँटनी
"भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी सैनिकांनी नाही तर पाकिस्तानच्या लष्कराचा गणवेश घालून काही दहशतवाद्यांनी हल्ला केला"
पाक लष्कराच्या सीमा कृती दलाच्या एका तुकडीने काश्मीरमधील पूंछ सेक्टर येथे भारतीय भूभागामध्ये घुसून पाच भारतीय जवानांची हत्या केल्याचं समोर आलं होतं, तेव्हा अँटनी यांनी हे वक्तव्य केलं होतं.
- ए के अँटनी, संरक्षणमंत्री
मुलायम सिंग यादव
"लडकों से गलती हो जाती हैं, तो इसका मतलब ये तो नहीं की उन्हे फांसी दे दी जाऐं"... असं म्हणत बलात्कार करणाऱ्यांची पाठराखण करण्याचा आणि सत्तेत आलो तर कायद्यात बदल करण्याची भाषाही समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनी केली होती.
अबू आझमी
"बलात्कार प्रकरणांत फाशीची शिक्षा व्हायला हवी, असं इस्लाममध्ये सांगितलं गेलंय. पण, इथे मात्र पुरुषांनाच शिक्षा होते... स्त्रिया मात्र यातून अलगद सुटून जातात... स्त्रियाही तितक्याच दोषी आहेत ना"
"एखादी स्त्री विवाहीत किंवा अविवाहीत एखाद्या परपुरुषासोबत तिच्या संमतीनं किंवा संमतीशिवाय जात असेल तर तिलाही फासावर चढवलं जायला हवं... दोघांनाही फाशी व्हायला हवी"
- अबू आझमी, समाजवादी पार्टी
आझम खान
"१९९९ साली झालेले कारगिल युद्ध भारताला मुस्लीम सैनिकांनी जिंकून दिले, हिंदूंनी नव्हे... कारगिलच्या टेकड्यांवर विजयाचा झेंडा रोवणारा मुसलमान जवान होता"
- आझम खान, उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री
अमित शहा
`` मुझफ्फरनगर दंगलीचा बदला घेण्याची हीच संधी... तुम्हाला सर्व गोष्टींचा बदला घ्यायचा असेल, तर तुम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा. आपल्याला उत्तर प्रदेशातून `मुल्लाह मुलायम` यांचे सरकार बरखास्त करायचे आहे. मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत न्याय झालेला नाही, त्यामुळे हीच वेळ आहे बदला घेण्याची``
- अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते व नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय
बाबा रामदेव
"माईक समोर पैशांच्या गोष्टी नको... "
बाबा रामदेव अलवर मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी, संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी चंदनाथ आणि बाबा रामदेव स्टेजवर शेजारी शेजारी बसलेले असले होते. त्यांच्या समोरचा माईक बंद होता... यावेळी, महंत यांनी रामदेवांसमोर `प्रचार दौऱ्यादरम्यान धनाची कमतरता भासतेय` अशी आपली अडचण मोकळेपणानं कथन केली.
पण, अचानक बाबा रामदेवांना समोर माईक असल्याचं ध्यानात आलं. म्हणून, खुसपुसत त्यांनी महंत यांना माईक सुरु झाल्यावर धनाबद्दल चकार शब्द न काढण्याविषयी चेतावलं. `इथं या गोष्टी बोलणं बंद कर... तू मूर्ख आहेस` असं म्हणत बाबा रामदेवांनी महंतला चांगलंच झापलं.
भीम सिंह
"जवान हे मरण्यासाठीच लष्करात सहभागी होतात"
बिहारमधील हुतात्मा जवान प्रेमनाथ यांच्या अंत्यसंस्कारावेळी तेथील रहिवासी असलेले राज्याचे विज्ञानमंत्री गौतमसिंह हेही उपस्थित नसल्याने भीमसिंह यांना विचारले असता ते म्हणाले, की जवान हे मरण्यासाठीच लष्करात आणि पोलिस दलात सहभागी होतात.
- भीमसिंह, बिहारचे ग्रामोद्योग व पंचायत राज मंत्री
शरद पवार
`गेल्या वेळी सातारची आणि मुंबईची निवडणूक एकाचवेळी होती. पण यावेळी साता-यात १७ तारखेला मतदान आहे आणि मुंबईत २४ तारखेला... त्यामुळे १७ तारखेला तिथे घड्याळावर शिक्का हाणायचा आणि नंतर इथेही शिक्का हाणायचा... फक्त पहिली शाई पुसून टाका, नाहीतर घोटाळा व्हायचा...`
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा
आझम खान
"संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात सक्तीच्या नसबंदीची मोहीम राबवली होती, तर राजीव गांधी यांनी बाबरीचे दार खुले करून देऊन तिथे ‘शिलान्यास’ घडवला होता. त्याची शिक्षा त्या दोघांनाही ‘अल्लाह’कडून मिळाली आहे... लोकसभेची ही निवडणूक नुसती निवडणूकच नाही तर फॅसिस्ट शक्तीविरुद्धचं युद्ध आहे... अल्पसंख्याकांना ही लढाई जिंकावीच लागेल. मुसलमानांच्या मतांची विभागणी त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल"
- आझम खान, समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते
शरद पवार
`सकाळ, दुपार, संध्याकाळ ते लोक एकच नाव घेतील... मोदी... सकाळी उठल्यावर तेच... आणि सकाळी जाताना तेच (हातात लोटा घेतल्याचं दाखवत)...`
मोदींना मीडियानं डोक्यावर घेतल्याची टीका पवारांनी यावेळी केली होती.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
/marathi/slideshow/वाचाळ-नेत्यांची-बडबड-गीते_322.html/4