लक्ष्मणची स्पेशल करिअरची स्पेशल सुरवात
नोव्हेंबर 22, 1996: लक्ष्मणनने त्याच्या पदार्पणाच्या मॅचच्या वेळेसच आपल्या स्वभावाची झलक दाखवून दिली होती. 1996 मध्ये द. आफ्रिकेसोबत अहमदाबाद येथे झालेल्या मॅचमध्ये लक्ष्मणनने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर विजय मिळवून दिला होता. त्याने त्या मॅचमध्ये फक्त 51 रनची खेळी केली. पण संपूर्ण मॅचमध्ये फक्त दोघंच अर्धशतकापर्यंत पोहचू शकले होते. आणि ती कसोटी मॅच भारताने 64 रनने जिंकली होती.
हा ठरला ‘टर्निंग पॉईंट’
जानेवारी 2000 : 2000 पर्यंत टीम इंडियामध्ये लक्ष्मण नेहमीच आत बाहेर करीत होता. मात्र 1999/00 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एका सामन्यात त्याने 167 रनची खेळी केली आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. मात्र त्या मॅचमध्ये भारताला 141 रनने ऑस्ट्रेलियाने मात दिली. 1998 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियात लक्ष्मणला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. पण जेव्हा ईडन गार्डनमध्ये सुरवातीला बॅटींगला येऊन 95 रनची खेळी केली आणि ती मॅच भारताने तब्बल 219 रनने ही मॅच जिंकली होती. आणि हाच लक्ष्मणच्या करिअरमधला ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.
व्हेरी व्हेरी स्पेशल इनिंग
मार्च 13-15, 2001: लक्ष्मणनने एकहाती 281 रनची खेळी करून साऱ्यांनाच आवाक् केलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये फॉलोऑनचा डोंगर समोर असतानाही आपल्या मनगटी खेळीच्या जोरावर पराभवाच्या खाईतून खेचून विजयाची चव चाखवली होती. लक्ष्मणची ही व्हेरी व्हेरी स्पेशल खेळी त्याच्या फॅन्सच्या नेहमीच स्मरणात राहिल. 171 रनने ही मॅच जिंकली होती. जेव्हा स्टी व्हॉ सारखा लढवय्या कॅप्टन असताना त्यांना हा पराभव पाहावा लागला होता.
खरा लढवय्या खेळाडू...
डिसेंबर 2003 – जानेवारी 2004 : लक्ष्मणच्या चाहत्यांना त्याने चांगलीच ‘ट्रीट’ दिली होती. 2003/04 ऑस्ट्रेलिया बॉर्डर – गावस्कर सीरिज ही स्टी व्हॉची शेवटीच सीरिज होती. अँडलेड टेस्टमध्ये पाचव्या विकेटसाठी लक्ष्मणने द्रविडच्या साथीने 303 रनची पार्टनरशीप केली होती. त्यात त्याने 148 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतरच्या चौथ्या टेस्टमध्ये सचिनसोबत 353 रनची पार्टनरशीप केली होती. ती मॅच जिंकली असता भारताला सीरिज जिंकण्याची संधी होती. मात्र ती मॅच ड्रॉ झाली.
सिडनीचे युद्ध
जानेवारी 3, 2008: लक्ष्मणनने पुन्हा एकदा त्याची फंलदाजी काय करू शकते याच्या नमुना सिडनी टेस्टमध्ये दाखवून दिला होता. मात्र ही टेस्ट चांगली विवादास्पद ठरली होती. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजी ढेपाळल्यानंतर लक्ष्मण आणि सचिन हे भारतीय टीमच्या मदतीला धावून गेले होते. तेव्हा लक्ष्मणने 109 रनची खेळी केली होती. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम पुन्हा गडगडली आणि मॅच गमावून बसली होती.
दुहेरी आनंद
ऑक्टोबर 29-30, 2008: ‘हैदराबादी बिर्यानी’ सारखा खमंग असा उत्कृष्ट बॅटींगचा नमुना लक्ष्मणने पेश केला होता. तो ऑस्ट्रेलिया विरूद्ध दिल्ली येथे. लक्ष्मणनने लढवय्यासारखा खेळ करून दुहेरी शतकाला गवसणी घातली होती. त्या मॅचमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये 613 रनचा डोंगर उभा केला होता. पण ती मॅच ड्रॉ झाली होती. मात्र बॉर्डर-गावस्कर सीरिज भारताने 2-0ने आपल्या खिशात टाकली होती.
ईडन गार्डन – लक्ष्मणचं ‘लकी मैदान’
फेब्रुवारी 14-18, 2010: ईडन गार्डन हे लक्ष्मणसाठी नेहमीच लाभदायक असं मैदान ठरलं आहे. लक्ष्मणनने याच मैदानावर द. आफ्रिकेविरूद्ध 143 रनची अभेद्य खेळी केली होती. आणि त्याच्याच जोरावर भारताने द. आफ्रिकेवर एक डाव आणि 57 रनने विजय मिळवून सीरिज मध्ये बरोबरी साधली होती.
टीम इंडियाचा रक्षक
ऑगस्ट 3-7, 2010: लक्ष्मणने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये 56 आणि 103* रनची खेळी करून भारताला विजय मिळवून सीरिजमध्ये बरोबरी साधली होती.
दृढ निश्चय असणारा खेळाडू
ऑक्टोबर 1-5, 2010 : लक्ष्मणने खडतर परिस्थितीत दुसऱ्या इनिंगमध्य़े 73 रनची खेळी करून भारताला एका विकेटने विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाने 216 रनचं आव्हान दिलेलं असताना भारताची 124 रन 8 विकेट अशी एकवेळ परिस्थिती झाली होती. मात्र लक्ष्मणनने पाय रोवून 73 रनची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. तसचं सीरिजमध्ये बरोबरीही साधून दिली.
खरा विजेता
डिसेंबर 26-29, 2010: लक्ष्मणनने खेळलेल्या मॅचपैकी त्याने डरबनमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या 38 आणि 96 रनच्या जोरावर भारताने 87 रनने विजय संपादन केला होता. कारण की त्याच्या आधीच्या मॅचमध्ये भारताने अतिशय वाईट पद्धतीने खेळ केला होता. आणि त्यामुळे दुसरा विजय हा फार महत्त्वाचा होता.
/marathi/slideshow/व्हेरी-व्हेरी-स्पशेल-लक्ष्मण_109.html/5