सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आणि तुमचा आनंद
नवं वर्ष सुरू झालंय... अर्थात नवीन आर्थिक वर्ष सुरू व्हायला अजून अवधी असला तरी येत्या वर्षात तुमच्या गुंतवणुकीचं प्लानिंग करणं अर्थातच तुम्ही तुमच्या नकळत सुरूही केलं असेल... कारण, हीच गुंतवणूक आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी कामी येते... नाही का? चला तर पाहुयात, असेच काही गुंतवणुकीचे पर्याय...
पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पीपीएफ :
नोकरदार वर्गाला अत्यंत फायदेशीर आणि सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रोव्हिडंट फंड’कडे पाहिलं जातं. चालू वर्षात (२०१३-१४) पीपीएफ गुंतवणुकीवर ८.७ टक्के व्याज मिळतंय... आणि मुख्य म्हणजे या गुंतवणुकीवर आयकरात सूटही मिळते. नव्या वर्षात गुंतवणुकीचा अजूनही काही विचार केला नसेल तर या पर्यायाचा विचार तुम्ही नक्कीच करू शकाल.
अपेक्षेपेक्षा जास्त व्याज
ईएलएसएस फंड :
गेल्या पाच वर्षांत ‘ईएलएसएस’नं जवळपास १७.५ टक्के परतावा गुंतवणुकदारांना दिलाय. गुंतवणुकीसाठी व्यापक, अनेक पर्याय असलेला आणि इन्कम टॅक्समध्ये सूट असे बरेच फायदे यामधून उपलब्ध होतात.
‘पीएफ’सारखेच फायदे
वालेंटियरी पीएफ :
वेतन घेणाऱ्या नोकरदार वर्गाला ‘पीएफ’ म्हणजेच ‘प्रोव्हिडंट फंड’चा फायदा उपलब्ध होतो. पण, पगार न घेता स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या किंवा इतरांना मात्र हा पर्याय उपलब्ध नसतो. अशांसाठी किंवा ज्यांना ‘पीएफ’ शिवाय आणखीन गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, अशांसाठी ‘पीपीएफ’चा पर्याय आहे.
निवृत्तीचा ताण नको
एससीएसएस :
वयोवृद्ध आणि सेवानिवृत्त लोकांसाठी हा एक उत्कृष्ठ पर्याय आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये यावर गुंतवणुकदारांना ९.२ टक्के व्याज प्राप्त होतं. यामध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तसंच या योजनेत व्याजावर आयकर लागू होतो.
तुमच्या भविष्य आणि पेन्शन
एनपीएस :
नॅशनल पेन्शन सिस्टम हा तुमच्या निवृत्तीच्या प्लानिंगसाठी उत्कृष्ठ पर्याय आहे. यामध्ये फिक्स आणि बाजाराशी निगडीत गुंतवणूक असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये ४.२ पासून ते १०.२ टक्क्यांपर्यंत (गेल्या तीन वर्षांतील) परतावा मिळू शकतो. यामुळे टॅक्समध्येही सूट मिळते.
सुरक्षित गुंतवणूक
एनएससी किंवा बँक एफडी :
गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांमध्ये हा पर्याय खूप लोकप्रिय आहे. यामध्ये ८.५ ते ९.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. परंतु, यामध्ये व्याजावर आयकर लागू होतो.
/marathi/slideshow/सुरक्षित-गुंतवणुकीचे-पर्याय-आणि-तुमचा-आनंद_302.html/4