खिलाडी
१९९२ साली रिलीज झालेल्या खिलाडी सिनेमात अक्षय कुमारने पहिल्यांदाच यशाची चव चाखली. अबाबास-मस्तान दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमारने एका कॉलेज युवकाची भूमिका साकारली होती. गम्मत करणं, पैज लावणं या सवयींमुळे हे कॉलेज तरुण एका खूनाच्या केसमध्ये अडकतात. त्यातून मार्ग काढण्याची कथा म्हणजे खिलाडी.. या सिनेमामुळे अक्षय कुमारचं ‘खिलाडी कुमार’ हे नाव झालं आणि नव्या पिढीचा तो ऍक्शन स्टार बनला.
मोहरा
१९९४ मधील मोहरा सिनेमातील अक्षय कुमारची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका लोकांना आवडली. रवीना टंडन बरोबर अक्षय कुमारची जोडी भाव खाऊन गेली. या सिनेमामुळे ऍक्शन थ्रिलर सिनेमांचं वेगळं युग आलं, आणि अत्रय कुमार या सिनेमांमुळे आघाडीचं नाव बनलं.
दिल तो पागल है
‘यह दिल्लगी’नंतर अक्षय कुमारने पुन्हा या सिनेमातून ‘यशराज फिल्म्स’बरोबर काम केलं. १९९७ साली आलेल्या या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अक्षयने पहिल्यांदाच सुपरस्टार म्हणून नावाजलेल्या कलाकारांच्या मांदियाळीत प्रवेश मिळवला. माधुरी दीक्षित, शाहरुख खान या स्टार्सबरोबर अक्षयने काम करून आपणही तितकेच तगडे कलाकार आहोत हे आपल्या छोट्याशा भूमिकेतूनही दाखवून दिलं.
संघर्ष
१९९९ साली आलेल्या संघर्ष सिनेमातून अक्षय कुमारच्या अभिनय गुणांचं वेगळं दर्शन घडलं. समीक्षकांनी पहिल्यांदाच अक्षय कुमारला अभिनयाबद्दल गौरवलं. अथिशय बुद्धिमान कैद्याच्या भूमिकेतला अक्षय कुमार आशुतोष राणाच्या भयानक खलनायकासमोर ताकदीने उभा राहिला. प्रीती झिंटावर या सिनेमाचा फोकस असूनही अक्षय कुमारची व्यक्तिरेखा आवडली.
हेरा फेरी
या सिनेमाने अक्षयच्या करीअरमध्ये एका नव्या पर्वाला सुरूवात केली. २००० साली हा सिनेमा येईपर्यंत अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये अजून किती टिकेल यावर प्रश्नचिन्हं उभं केलं जात होतं. पण या सिनेमातील त्याचं विनोदाचं टायमिंग, धमाल अभिनय आणि परेश रावल, सुनिल शेट्टी यांच्यासोबत केलेला विनोदाचा कहर अक्षयच्या फिल्मी करीअरला नवजीवनदान करून गेला. ‘हेरा फेरी’मुळे अक्षय कुमार आपली ‘ऍक्शन कुमार’ ही ओळख मागे सोडून ‘कॉमेडी कुमार’ बनून लोकांसमोर आला.
धडकन
एका सामान्य प्रेमकथेतला नायक म्हणून अक्षय कुमार या सिनेमात दिसला. एक रोमँटिक हिरो म्हणून लोकांना शांत, समंजस अक्षय कुमार पसंत पडला. शिल्पा शेट्टीच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नामुळे तिचा रोष ओढावून घेतलेला प्रेमळ नवरा, कर्तव्यदक्ष मुलगा अशा विविध आघाड्यांवर लढणाऱ्या नायकाची भूमिका अक्षयने केली होती.
अजनबी
अब्बास-मस्तानच्या २००१ साली आलेल्या ‘अजनबी’ सिनेमात अक्षय कुमारने प्रथमच खलनायक साकारला होता. आपल्या पत्नीची संपत्ती हडप करण्यासाठी एका भारतीय जोडप्याचा वापर करून ‘वाईफ स्वॅपिंग’सारख्या विकृत खेळाचा वापर करणाऱ्या विक्रम बजाजची भूमिका अक्षयने केली होती. या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट खलनायकाचं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.
नमस्ते लंडन
अक्षय कुमारने या सिनेमात खेडवळ पंजाबी युवकाची भूमिका केली होती. या पंजाबी पुत्तरचं लग्न लंडनमधील आंग्लाळलेल्या कतरिना कैफशी होतं. भारताला कमी लेखणाऱ्या लडनवासीयांना, अनिवासी भरतीयांना आणि कुद्द हिरॉइनलाही भारताबद्दल प्रेम निर्माण करून देण्याचं काम यातील हिरो करतो. या सिनेमातून अक्षय कतरिनाची जोडी लोकांना खूप आवली आणि या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
भूलभुलैय्या
अत्यंत विक्षिप्त डॉक्टरची भूमिका अक्षय कुमारने यात केली होती. सस्पेंस थ्रिलर असणाऱ्या या भूतपटात अक्षय कुमारचा डॉक्टर विनोदी आणि आकर्षक वाटला. राजवाड्यातील भूताचा शोध घेत असलेला डॉक्टर ज्या पद्धतीने भूताबद्दलची माहिती मिळवतो आणि अंगातील भूत घालवतो, तो प्रकार लोकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवण्यात आणि हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहाण्यास प्रवृत्त करण्यास यशस्वी ठरला.
सिंग इज किंग
या सिनेमात अक्षय कुमारने भोळ्या भाबड्या हॅप्पी सिंग या सरदारजीची भूमिका केली. अभावितपणे ऑस्ट्रेलियातील अंडरवर्ल्डचा किंग बनलेल्या सरदारजीने लोकांना प्रचंड हसवलं. या वर्षात अक्षय कुमारने लागोपाठ ५ सिनेमे सुपर हिट करून दाखवले. या सिनेमासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कारही मिळाला.
रावडी राठोड
२०१२ साली आलेल्या या सिनेमाने अक्षय कुमारचं स्टारडम पुन्हा एकदा अधोरेखित केलं. हिट-फ्लॉपच्या रोलर कोस्टरवर गेली २३ वर्षं स्वार असलेल्या अक्षयने या वर्षात हाऊसफुल्ल-२ आणि रावडी राठोड हे दोन भिन्न प्रकृतीचे सिनेमे केले आणि दोन्ही सिनेमांनी १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला.’रावडी राठोड’मधून अक्षय पुन्हा ऍक्शन फिल्म्सकडे वळला.
हॅप्पी बर्थडे अक्षय कुमार
गेली २३ वर्षं हिट-फ्लॉप्सच्या चढ उतारांनी सिनेसृष्टीत आपलं अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या अक्षय कुमारचा आज ४५ वा वाढदिवस! राजीव भाटिया नामक मुंबईतील एक पंजाबी तरुण मार्शल आर्ट्सचा विद्यार्थी ते विदेशातील कूक अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करता करता बॉलिवूडचा `खिलाडी` बनला. बॉलिवूडची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही सुपरस्टार बनलेला अक्षय कुमार...
/marathi/slideshow/अक्षय-कुमार_122.html