`अजित पवार लाचखोर मंत्री`
www.24taas.com, मुंबई
`विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडचेरी सिंचन प्रकल्पात कंत्राटदारानं लाच देऊन आपली कामं करून घेतलीत... आणि या लाच खाणाऱ्यांमध्ये दुसरे तीसरे कुणीही नसून उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश आहे` असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.
गोसीखूर्दचं काम करून घेण्यासाठी कंत्राटदारानं अनेक राजकीय नेत्यांसह सरकारी अधिकार्यांाना लाच दिली... या व्यवहारात अजित पवारांना साडेसत्तावीस कोटी, नितीन गडकरींना ५० लाख, गोपीनाथ मुंडेंना २० लाख अशी लाच देण्यात आल्या आहेत, असंही पाटकर यांनी म्हटलंय.
गोसीखुर्द कालव्यातील एका भागाचं कॉन्ट्रॅक्ट महालक्ष्मी इन्फ्रास्टक्चर कंपनी लिमिटेडमधल्या एका संचालकाच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्यांहनी धाड टाकली होती. या धाडीत पैसेवाटपाबाबतचे काही कागदपत्र इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्यांलच्या हाती लागले होते. हे कागदपत्र मेधा पाटकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवले असून या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हे आरोप केले आहेत.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनंही आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केलीय. अर्थखात्याच्या नियोजनशून्य कारभारावरही कॅगनं कडक ताशेरे ओढलेत. जलसंपदा खात्याच्या अनेक प्रकल्पांच्या अव्वाच्या सव्वा किमती वाढवल्याचं अहावालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळं अजित पवारांना लक्ष्य करण्याची संधी विरोधकांना पुन्हा एकदा मिळालीय.
अजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची काँग्रेसची खेळी
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
इंदापुरमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार संकटात सापडलेले असताना नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र जावीत यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विखे पाटील आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकत वाढवण्याचा आणि पर्यायाने अजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची खेळी काँग्रेस खेळत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आलाय. पिंपरी-चिंचवडची सूत्रं हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहेत. पण त्यांच्यावर असलेल्या इतर जबाबदा-या लक्षात घेता शहराचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटलांकडे द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागलीय. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती अंमल आहे. दादांच्या राजकीय खेळीने काँग्रेसचा शहरात पुरता धुव्वा उडालाय. पण आता अजित पवार हेच अडचणीत आल्याने त्यांचेच कट्टर विरोधक असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांकडे शहराची जबाबदारी देण्याची मागणी जोर धरु लागलीय...
अधिवेशन संपल्यानंतर आणखी काही मोठे निर्णय घेतले जाणार असल्याचंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राधाकृष्ण विखे-पाटील आणि अजित पवारांचं राजकीय वैर सर्वश्रूत आहे..त्यामुळे त्यांनी जर सूत्र हाती घ्यायचं ठरवलं तर पिंपरी चिंचवडमधलं राजकीय चित्र नक्कीच रंजक होणार यात शंका नाही.
आमच्यासाठी `तो` विषय संपला आहे- सुप्रिया सुळे
www.24taas.com, पुणे
अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरील वाद मिटवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण विरोधक मात्र अजित दादांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांची बाजू घेत वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. असे, म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची बाजू घेतली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. शरद पवार, पक्ष आणि अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकला आहे. त्यामुळे विरोधकांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही. असे सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबद्दल वारंवार माफी मागितली आहे. तसंच प्रीतीसंगमावर आत्मक्लेश उपोषणही केलं. शरद पवारांनीही या वक्तव्याबद्दल जनतेची माफी मागितली. मात्र राजीनामा देणार नसल्याचेच संकेत अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी दिले आहेत.
अजित पवार बसलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले?
www.24taas.com, कराड
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी विरोधकांना प्रीतीसंगमावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
दुष्काळकरांची थट्टा करणाऱ्या अजित पवार यांच्या आत्मक्लेष उपोषणाचा निषेध म्हणून शिवसेना-भाजप आणि मनसेनेही कराडमध्ये `गोमूत्र प्रयोग` केला ‘पाणीच नाही तर धरणात मुतायचे काय?’, या अजित पवारांवरच्या बेताल वक्तव्यावरून उठलेले वादळ शांत होण्याचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणी तीनदा माफी मागूनही टीका सुरूच राहिल्याने अजित पवार यांनी रविवारी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन आत्मक्लेष उपोषण केले.
विरोधी पक्षांचे नेते अजितदादांच्या राजीनाम्यावर ठाम असून त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची आंदोलने सुरूच आहेत. आज सकाळीही कराड येथे काही कार्यकर्त्यांनी गोमूत्र आंदोलन केले. यशवंतरावांचे समाधीस्थळ ही पवित्र जागा आहे. त्या ठिकाणी उपोषणाला बसून अजित पवारांनी हे स्थळ अपवित्र केले आहे, असे सांगत विरोधकांनी हे आंदोलन केले.
ही अजित पवारांची नौटंकी – राजू शेट्टी
www.24taas.com, सातारा
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर शेतकरी संघटनेनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. ही अजित पवार यांची नौटंकी आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
अजित पवारांनी सावलीत बसून आंदोलन करू नये. त्यांना जर खरंच असे काहीतरी वाटत असेल तर त्यांनी ऊन्हात बसून दाखवावे. लोकांना काय चटके बसलेत ते समजून येतील. केवळ सहानभुती मिळविण्यासाठी प्रतत्न करू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांची खिल्ली उडविणे चुकीचे आहे. ते जे वागले ते बरोबर नाही. त्यांचे आत्मक्लेश हे नौटंकीचे प्रकरण आहे, असे शेट्टी म्हणालेत.
सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याचं प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय. जो काम करतो तो चुकतो. त्यामुळे आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित घेण्याचे ठरविलेय. मला जे वाटले ते मी करण्यासाठी येथे आलोय. मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असते. तसे मी केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात असं काहीतरी करावसं वाटलं म्हणून मी कराडमध्ये आलोय. मला वाटलं, म्हणून मी हे करीत आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय. राज ठाकरेंनी अजितदादांच्या गांधीगिरीची खिल्ली उडवलीय. जो बुंदसे गयी वो हौद से नही आती असा टोला राज यांनी अजितदादांना लगावलाय. त्यांचे वक्तव्य पुढचे ५०वर्ष महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. त्यांनी प्रायश्चित घेण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना पाण्याची व्यवस्था करावी असं राज यांनी सांगितलं.
यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धा सुचेल अशी अपेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीये. अजित पवार यांची वृत्ती आणि प्रवृत्ती उर्मट पणाची आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे शरद पवारांना तीन वेळा माफी मागावी ल्यागल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार हे हुकुमशहा असल्यासारखे वागतात.
/marathi/slideshow/अजितदादांच्या-अडचणी_217.html