अमिर खानच्या सिझलिंग हॉट हिरोइन्स
वर्षातून एकच सिनेमा करायचा आणि त्यात तडाखेबंद परफॉर्मंस देऊन इतर कलाकारांच्या शर्यतीपासून पुढे निघून जायचं ही आमिर खानची खास पद्धत. वेगळे विषय, हटके अंदाज आणि वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स ही देखील त्याच्या सिनेमाची वैशिष्ट्यं. या सर्वांसोबत अमिर खानच्या हिरोइन्स हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. अबिनेत्री कुठलीही असो, अमिर खानसोबत तिची केमिस्ट्री अशी काही जमून येते की बस रे बस... पण आमिर खान खास अपवाद वगळता कधी एका हिरोइनसोबत पुन्हा काम करत नाही. पण त्याच्यासोबत एका सिनेमात झळकणं हे ही अभिनेत्रींसाठी प्रतिष्ठेचं ठरतं.
करीना कपूर
आमिर आणि करीनाची जोडी जबरदस्त गाजली ती ‘३ इडियट्स’मध्ये. आमिरचा कॉलेज कुमाराचा अभिनय करीनाच्या अभिनय शैलीला साजेसा होता. त्यामुळे दोघांमधील वयातलं अंतर फारसं जाणवलं नाही. ‘झुब्बी डुब्बी’ गाण्यात दोघांची केमिस्ट्री मस्त जुळून आली. हेच दोघे पुन्हा तलाश मध्ये एकत्र दिसले. पण त्यावेळी दोघांचाही अभिनय वेगळ्या पातळीवरचा होता. या गंभीर सिनेमातही आमिर करीनाची जोडी तितकीच लक्षवेधी वाटली.
असिन
दक्षिणेकडची अभिनेत्री असिन थोट्टुमकलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ते आमिर खानबोबत ‘गझनी’मधून. २००८ सालच्या ब्लॉकबस्टर सिनेमात आमिरपुढे लहानसा रोल असूनही आसिन आपला प्रभाव पाडू शकली. या सिनेमात दोघांची गमतीदार प्रेमकथा भावली. आणि ही जोडीही अल्टिमेट वाटू लागली.
काजोल
ज्यांना वाटतं काजोल आणि शाहरुख खान याच जोडीची केमिस्ट्री सुंदर आहे, त्यांनी २००६ साली फना सिनेमा पाहून आपलं मत बदललं. शाहरुखसोबत धमाल मस्ती करणाऱ्या काजोलचा फनामध्ये आमिरसोबत गंभीर आणि उत्कट सीन्समध्ये अभिनयाचा कस लागला. आणि ती उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचं तिने दाखवून दिलं.
प्रीटी झिंटा
गालावर गोडशी खळी घेऊन बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या प्रिटी झिंटाची जोडी अनेक अभिनेत्यांसोबत जमली. पण दिल चाहता है सिनेमात प्रिटी आणि आमिर खान यांचं अवखळ प्रेम बहारदार ठरलं. सिनेमाच्या फ्रेश आणि तरुण लूकसाठी दोघांची मजेदार जोडी ताजं तवानं करणारी ठरली. आणि प्रिची झिंटाही हिट झाली.
ग्रेसी सिंग
टीव्ही अभिनेत्री ग्रेसी सिंग हिला बॉलिवूडच्या पदार्पणासाठी सिनेमा मिळाला, तो आमिर खानच्या होम प्रोडक्शनचा पहिला सिनेमा- लगान. तिने आपली भूमिका मन लावून केली. भुवनवर प्रेम करणाऱ्या गौरीच्या रोलमध्ये ती खूपच निरागस आणि गोड वाटली. स्वातंत्र्यपूर्व काळातली गावंढळ जोडी वठवूनही ते एकमेकांना साथ देणारे खरे हिरो हिरोइन ठरले.
सोनाली बेंद्रे
1998 सालच्या सरफरोश सिनेमत सोनाली बेंद्रेच्या वाट्याला लहानशीच भूमिका आली होती. यात बडबड्या ग्लॅमर गर्लची भूमिका तिने साकारली. सिनेमा प्रेमकथा नसली, तरीही त्यात पेरलेल्या काही रोमँटिक सीन्समध्ये सोनाली आणि आमिरची केमिस्ट्री मजेदार वाटली.
रानी मुखर्जी
राजा की आएगी बारात सिनेमातून खरंतर रानी मुकर्जीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण 1998 साली गुलाम सिनेमाने तिला आघाडीची अभिनेत्री बनवलं. रानी मुखर्जीसाठी आमिर खानने स्वतःच्या आवाजात गायलेलं ‘ए क्या बोलती तू?’ गाणं अतोनात गाजलं. रानी मुखर्जीला या नंतरही मंगल पांडे, तलाश या सिनेमांत आमिरसोबत काम करण्याची संधी मिळाली. मन सिनेमातील एका गाण्यातही दोघे थिरकताना दिसले.
करिश्मा कपूर
करिश्मा कपूरची गोविंदासोबत जमलेली जोडी इतकी तुफान होती की तिला दुसऱ्या हिरोसोबत पाहाणंही कठीण झालं होतं. मात्र 1996मध्ये राजा हिंदुस्तानी सिनेमात करिश्माने आमिर खानसोबत नुसती जोडी जमवलीच नाही, तर अभिनयाची चांगलीच जुगलबंदी केली. त्यातून भर पावसातला करिश्मा आणि आमिर खानचा हॉट ‘किसिंग सीन’ तेव्हा चांगलाच गाजला. करिश्माने आमिरसोबत एकच सिनेमा करूनही त्याच्यासोबत आपली जोडी प्रेक्षणीय केली.
उर्मिला मातोंडकर
फारशी गाजत नसलेली उर्मिला मातोंडकर 1995 साली रंगीलामधून समोर आली, तेव्हा तिचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज मदहोश करणारा ठरला. या सिनेमात जॅकी श्रॉफसारख्या हंकसोबत तिचे सीन्सही चर्चेचे विषय ठरले. मात्र या सिनेमात आमिर खानने आपल्या सडकछाप स्टाइलने मजा आणली. उर्मिलाचा हिरो सिनेमात
ममता कुलकर्णी
1994 साली बाझी सिनेमात आमिर खानची जोडी होती ती तेव्हा सेक्सबॉम्ब मानल्या गेलेल्या ममता कुलकर्णीसोबत. शुटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम जुळल्याच्या अफवांना तेव्हा ऊत आला होता. पण, या बातम्या आपोआप बंद झाल्या. पण आमिर आणि ममता यांची जोडी पाहून अनेकांना धक्का बसला होता. आमिर आणि ममता ही जोडी त्यावेळची सगळ्यात हटके जोडी ठरली होती.
पूजा भट्ट
कुरळ्या केसांची पूजा भट्ट सिनेमात आली, तेव्हाच ती लाडावलेली, वाया गेलेली फॅशनेबल मुलगी वाटत होती. दिल है की मानता नही या सिनेमात तिच्यासोबत आमिर खानची केमिस्ट्री मस्त जुळून आली होती. श्रीमंत मुलगी आणि तिच्या सोबत असणारा पत्रकार बनून आमिर खानने सिनेमाला चार चाँद लावले. या सिनेमाच्या वेळी पूजा भट्ट आणि आमिर खानचं प्रेम प्रकरण असल्याच्या चर्चा होत्या. मात्र सिनेमासाठी या चर्चा खूप फायद्याच्या ठरल्या.
/marathi/slideshow/अमिर-खानच्या-सिझलिंग-हॉट-हिरोइन्स_203.html