ऐश्वर्याची सुरूवात
१ नोव्हेंबर १९७३ रोजी ऐश्वर्याचा जन्म मेंगलोरमधील एका तुलु कुटुंबात झाला होता. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज पेशाने मरिन बायोलॉजिस्ट होते, तर आई ब्रिंदा या गृहिणी. आदित्य रॉय हा ऐश्वर्याचा मोठा भाऊ जो मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. २००३ मध्ये आदित्यने ऐश्वर्याचा ‘दिल का रिश्ता’ चित्रपट को-प्रोड्यूस्टही केला होता. रॉय परिवाराने मुंबईत स्थलांतर केल्यानंतर ऐश्वर्याने माटुंग्याच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयामध्ये अडमिशन घेतलं. त्यानंतर आर्किटेक्टचं शिक्षण घेण्यासाठी तिने मुंबईच्या रहेजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण पुढे ऐश्वर्याने मॉडेलिंग क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं.
मॉडेलिंग आणि मिस वर्ल्ड
वयाच्या १७ व्या वर्षी १९९४ मध्ये ऐश्वर्याने ‘मिस इंडिया’ आणि ‘मिस वर्ल्ड’ चा किताब जिंकला होता. त्याच वर्षी ऐश्वर्यानं मिस फोटोजेनिक आणि ‘मिस वर्ल्ड कॉन्टिनेन्टल क्विन ऑफ ब्युटी –एशिया अँड ओशिनिया’चा ही किताब पटकवला होता. हे सारे किताब पटकवल्यानंतर अख्ख जग ऐश्वर्याला आत्तापर्यतची सर्वात ‘सुंदर मिस वर्ल्ड’ म्हणून ओळखू लागले. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याआधी ऐश्वर्या मॉडेलिंग क्षेत्रातच कार्यरत होती.
चित्रपटात पदार्पण
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी १९९७ मध्ये ऐश्वर्याने मणिरत्नमच्या ‘इरूवर’ या तमिळ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. ‘इरूवर’ चित्रपटाला असंख्य पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटापासून ऐश्वर्याची घोडदौड सुरू झाली. त्यानंतर ऐश्वर्या दिसली दिग्दर्शक राहूल रवेलच्या ‘और प्यार हो गया’ या हिंदी चित्रपटात, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. १९९८ मध्ये ऐश्वर्याने मोठा बजेट असलेला ‘जिन्स’ हा तमिळ सिनेमा केला होता, या सिनेमाला चांगलच व्यावसयिक यश मिळालं होतं.
बॉलिवूडमधील यश
ऐश्वर्याच्या खऱ्या करिअरची सुरूवात झाली, ती १९९९ साली. १९९९ मध्ये ऐश्वर्याने संजय लिला भन्सालीचा ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अजय देवगण होते. त्यानंतर सिनेसृष्टीला तिने अनेक हिट्स सिनेमे दिले उदा. ताल, जोश, मोहबते,देवदास इत्यादी.
वेगळा लूक
२००६ पासून ऐश्वर्या वेगवेगळ्या रंगाढंगाच्या चित्रपटात दिसून आली. २००६ मध्ये तीनं जे. पी. दत्तांचा उमराव जान केला. नंतर ब्लॉकबस्टर ठरलेला यशराज बॅनरचा ‘धूम-२’ आणि मणिरत्नमचा ‘गुरू’ असे नाविन्यपूर्ण सिनेमे केले.
सोशल वर्क
ऐश्वर्याने अनेक सामाजिक कार्यही केलेले आहेत. २००४ मध्ये भारतात आलेल्या त्सुनामी आणि भूकंपात सापडलेल्यांसाठी ऐश्वर्याने आर्थिक मदत केली होती. बच्चन फॅमिलीत एन्ट्री केल्यानंतर तिनं २००८ मध्ये बच्चन परिवारासोबत उत्तर प्रदेशातील दौलतापूर गावात मागासलेल्या मुलींसाठी शाळा स्थापन केली होती.
पर्सनल लाईफ
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटानंतर ऐश्वर्या आणि सलमान खानचं प्रेम जुळलं होतं. दोघे लग्नही करणार आहेत इथपर्यत गोष्ट पोहोचली होती. पण सलमानसोबत आपलं पटत नसल्याचं सांगून ऐश्वर्याने सलमानसोबत ब्रेकअप केलं. सलमाननंतर ऐश्वर्याचं विवेक ओबेरॉय सोबत अफेअर होतं ते देखील जास्त काळ टिकलं नाही.
मीडियातील छबी
ऐश्वर्या नेहमीचं मीडियाच्या आकर्षणाचा हिस्सा राहिली आहे. कुठल्याही प्रकारची बातमी असो चांगली अथवा वाईट मीडियाने नेहमीच तिला डोक्यावर उचलेल आहे. अनेक मासिकांच्या फ्रन्ट पेजवर ऐश्वर्याही आज झळकताना दिसते. अनेक प्रोडक्सची ब्रॅन्ड अम्बसेडर आहे. चित्रपटात जरी ती सध्या दिसत नसली तरी ती अनेक आकर्षित जाहिरांतीमधून तिच्या चाहत्यांना नेहमीच दिसत असते.
पुरस्कार
‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ चित्रपटांसाठी ऐशला ‘फिल्मफेअर बेस्ट अक्ट्रेस पुरस्कार’ मिळाला होता. तसेच अकरा वेळा तिला ‘फिल्मफेअर बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार’चं नामांकनही मिळाली होती. इंटरनॅशनल पुरस्कार, फिल्म अकॅडमी पुरस्कार, स्टार स्क्रिन पुरस्कार,झी सिने पुरस्कार, इत्यादी पुरस्कार तिनं आपल्या कारर्किदीत मिळवले आहेत. २००९ मध्ये ऐश्वर्याला पद्मश्री पुस्कारानेही गौवरवण्यात आलं होतं.
आराध्यासोबत वाढदिवस
ऐश्वर्याचा यंदाचा वाढदिवस अगदी अविस्मरणीय ठरणार आहे, कारण यावर्षी ऐश तिची मुलगी आराध्यासोबत तिचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.
बच्चन परिवारतील एन्ट्री
१९९७ मध्ये अभिषेक-ऐश्वर्याची भेट झाली. १४ जानेवारी २००७ मध्ये ते दोघं साखरपुडा करणार आहेत याची घोषणा झाली. २० एप्रिल २००७ मध्ये अभि-ऐशनं हिंदू प्रथेप्रमाणं लग्न केलं. अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षामध्ये अभि-ऐशच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. अभि आणि ऐशला ‘आराध्या’ नावाची मुलगी देखील आहे. अभि-ऐशचा संसार अगदी सुखात चालू आहे.
/marathi/slideshow/ऐश्वर्या-रॉय-३९_160.html