टॅक्स वाचविण्याचे पाच फंडे
तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त कमाई झाली किंवा तुमचे उत्पन्न टॅक्सेबल असेल तर तुम्हाला टेन्शन येते. पैसा आपण कमावलेल्या पैशावर टॅक्स का भरायचा. पगारातून काही कर जात असतो असे असताना पुन्हा टॅक्स द्यायचा, असा प्रश्न नेहमी पडतो ना. मग तुम्हाला टॅक्स वाचविण्याचे पाच उपाय करावे लागतील. मग तुम्ही हे उपाय करायला तयार आहात ना?
टॅक्स वाचविण्यासाठी कर सल्लागार, कर वकिलाकडे धाव घ्यावे लागते. किंवा काहीतरी गुंतवणूक करावी लागते. बऱ्याचवेळा केलेली गुंतवणूक आपल्यासाठी मारक ठरते. अशावेळी तुम्ही कपाळावर हात मारून घेता. मात्र, कर किंवा टॅक्स वाचविण्यासाठी बचत महत्वाची आहे. ही बचत योग्य ठिकाणी करणे गरजेचे आहे. तुम्ही पुढील पाच पर्यांयांपैकी कोणत्याही पर्याची निवड करून टॅक्स वाचवू शकता.
गंतवणूक कुठे कराल?
१) एलआयसी (आर्युविमा) :
टॅक्स वाचविण्यासाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे. याठिकाणी बचत करणे केव्हाही फायदेशीर ठरते. यात दोन फायदे असतात. एक म्हणजे तुमची बचत होते आणि तुम्हाला वीम्याचे संरक्षण मिळते. दुसऱा फायदा असा की टॅक्स वाचविण्यासाठी लाभ मिळतो. त्यामुळे वीम्यामध्ये केलेली गुंतवणूक बेस्ट ठरते.
गंतवणूक कुठे कराल?
२) पीपीएफ :
पीपीएफमध्ये केव्हाही गुंतवणूक चांगली असते. पीपीएफ याला भविष्य निर्वाह निधी असे संबोधले जाते. आपल्याला म्हारपणी याचा खूप आधार मिळतो. शिवाय पीएफमध्ये गुंतवलेल्या पैशावर चांगले व्याज मिळते. त्यामुळे सुरूवातीला गुंतवलेली रक्कम दहा वर्षानंतर चांगला फायदा मिळवून देते. या रक्कमेत मिळणाऱ्या व्याजामुळे वाढ होते. तसेच टॅक्स वाचविण्यासाठी पीएफमधील गुंतवणूक फायदेशीर ठरते. आपल्याला चांगला रिर्टन्स मिळतो. यावर कर सुटही मिळते.
गंतवणूक कुठे कराल?
३) ईएलएसएस :
ईएलएसएस म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक बचत योजना. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक केली तर ती टॅक्स वाचविण्यासाठी उपयोगी येते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून इक्विटी बाजारात मंदी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी इक्विटी बाजार डोकेदु:खी झाला आहे. सुरुवातीला इक्विटी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पहिली पसंती होती. इक्विटी बाजार हा शेअर मार्केटशी संबंधित आहे. ईएलएसएस गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी जोखीम उचलावी लागते. एकदा गुंतवणूक केली तर लगेच पैसे मिळणार नाही. लाँगटर्मसाठी येथील गुंतवणूक फायदेशी ठरते.
गंतवणूक कुठे कराल?
४) फिक्स्ड डिपॉझीट :
फिक्स डिपॉझीट हा पर्यायही टॅक्स वाचविण्यासाठी उत्तम आहे. एफडी मध्ये पैसे भरणे केव्हीही चांगले. हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि फायदेशील ठरणारा पर्याय आहे. आपली रक्कम सुरक्षित राहण्याबरोबर टॅक्स वाचविण्यासाठी मदत होते. या पर्याला सर्वांची अधिक पसंती असते.
गंतवणूक कुठे कराल?
५) एनएससी :
नॅशनल सेव्हिंग स्किममध्ये (राष्ट्रीय बचत योजना) गुंतवणूक केव्हीही चांगली. यामधील गुंतवणुकीमुळे टॅक्य वाचतो. तर यातील गुंतवणूकही फायदेशीर ठरते. गुंतवणुकीबरोबर चांगला लाभही मिळतो. पुढील दहा वर्षांसाठी ही गुंतवणूक महत्वाची भूमिका बजावते.
काय कराल?
सेक्शन ८० डी :
आरोग्य विमा (हेल्थ इंश्युरंन्स) - या सेक्सशमध्ये करदात्याला आरोग्य विमा संरक्षण मिळते. यामध्ये करदाता स्वत:ल १५,००० तर आईवडिलांसाठी २०,००० रूपयांचा प्रिमिअर भरू शकतो. त्यामुळे आपल्याला टॅक्स वाचविण्यासाठी मदत होते. तसेच अडचणीच्यावेळी आपल्याला मदतही होते.
-------------
सेक्शन ८० सीसीडी :
ही नवीन पेन्शन स्किम आहे. (निवृत्ती योजना) या योजनेत वेतनातील १० टक्के रक्कम जमा केल्याने टॅक्स वाचविण्यासाठी लाभ मिळतो. या योजनेत सहभागी झाले तर सेक्शन ८० सीसीडीनुसार करातून सुट मिळण्यासाठी त्या व्यक्तीचा हक्क बनतो. टॅक्स वाचविण्यासाठी १ लाखांपर्यंत सवलत आहे. हे त्या व्यक्तीने लक्षात घेतले पाहिजे.
-------------
सेक्शन ८० सीसीडी (2) :
या सेक्शनमध्ये कर्मचारी लाभ घेण्यासाठी वेतनातील १० टक्के द्यावी लागणार आहे. गुंतवणुकीबरोबर टॅक्स वाचविण्यासाठी हे माध्यम चांगले आहे.
/marathi/slideshow/कसा-वाचवणार-टॅक्स_178.html