कोकण माझ्यासाठी खास आहे - राज
टीकेसाठी अनेक विषय आहे, पण आज मी कोकणच्या बाहेर जाणार नाही - राज
रात्री अडीच तीनला अटक केली, लपूनछपून कशाला... मीडियाने संपूर्णवेळ लाईव्ह दाखवलं होतं - राज
मला अटक देखील याच जिल्ह्यातून झाली - राज
पक्ष स्थापन केल्यानंतर पहिली विजयाची बातमी याच खेड जिल्ह्यातून मिळाली - राज
कोकणात खास खेडमध्येच सभा घेतली
दौऱ्याची सुरवात महालक्ष्मी मातेच्या दर्शनाने सुरवात केली
राज ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी...
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत परशुराम उपरकर यांचा मनसेत प्रवेश
अजित पवार आणि राणेंवर राज ठाकरेंची टीका
आधी जमिनी घेतात, आणि नंतर रस्ते बनवतात - राज
राज ठाकरेंची नारायण राणेंवर टीका
माझ्या हातात राज्याची सत्ता द्या, मग दाखवतो राज्य कसे हाकायचं असतं... - राज
कधीही हसतानाचा त्यांचा फोटो पाहिला नाही - राज
चेहरा गंभीर असणं साहजिकच आहे... सतत मोजत असतात रात्र दिवस फक्त मोजायचं काम करतात अजित पवार
सतत पाहावं तेव्हा अजित पवारांचा चेहरा गंभीर - राज
अजित पवार नक्कल करण्यासाठी देखील अक्कल लागते - राज
अजित पवार म्हणाले नकला करतो - राज
नक्कल करायला पण अक्कल लागते - राज
`नक्कल करायलाही अक्कल लागते`, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंनी आपल्य़ा दौऱ्य़ातली दुसरी सभा आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये घेतली. अजित पवार दिवस रात्र पैसे मोजण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली.
राज ठाकरेंनी अजित पवारांच्या टीकेला अपेक्षेप्रमाणे जोरदार उत्तर दिलं. तर परप्रांतीय कोकणात घुसून कोकणी माणसांच्या जमिनींवर कब्जा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
नारायण राणे जमिनी घेण्यातच मग्न - राज
नारायण राणेंवर त्यांनी अनपेक्षितपणे हल्लाबोल केला. राणेंची कोकणात राजकीय दहशत असून ते कोकणातल्या जमिनी बळकावत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
कोकणी माणसानं आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नये असंही त्यांनी बजावलं. जैतापूरबाबत आपली भूमिका कायम ठेवत प्रकल्पाला त्यांनी समर्थन दिलं.
खेडमध्ये सभा घेऊनही त्यांनी भास्कर जाधव आणि शिवसेनेवर टीका करण्याचं मात्र टाळलं.
परप्रांतिय कोकणच्या जमिनी बळकावतायेत - राज
परप्रांतिय कोकणच्या लोकांच्या जमिनी बळकावतायत, बेसावध राहू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. नारायण राणे यांच्या मालवण भागात मोठ्या प्रमाणात जमिनीसाठी धमकावणी होत असते. असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
आणि तसं जर राणे करीत नसतील तर राणेंनी त्याचा खुलासा करावा... असं म्हणत राज ठाकरेंनी राणेंवर अनपेक्षितपणे हल्ला चढवला. त्यामुळे राणे आता राज ठाकरेंना काय उत्तर देणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले...
राज ठाकरे यांनी कोल्हापुरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करीत त्यांच्यावर टीका केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी राज ठाकरेंवर तुफान हल्ला चढवला. ‘नकला करून लोकांचं मनोरंजन होतं, विकासाची कामं होतं नसतात’, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना चांगलेच खडे बोल सुनावले,
नाशिकमध्ये बोलत असताना अजित पवारांनी नाशिकची काय अवस्था करून ठेवली आहे? आमचं पिंपरी-चिंचवड येऊन बघा, कसं चमकतयं, असे बोलत नाशिकच्या विकासात्मक कामावरही टीका केली.
सुप्रिया सुळेंनीही लगावला होता राज ठाकरेंना टोला...
जो माणूस काम करतो, त्याच्यावरच टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
परभणीमध्ये राष्ट्रवादीतर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे राज ठाकरेंचा अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा.
राज नौटंकी बंद करा – अजित पवार
दरम्यान, राज ठाकरे नौटंकी बंद करा... केवळ विदुषकी चाळे करून करमणूक होते मात्र प्रश्न सुटत नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
दोन दिवसांपूर्वी, कोल्हापुरातल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या भाषणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे मात्र नाशिकचे कोणते प्रश्न आत्तापर्यंत सोडवलेत? असा सवाल अजित पवारांनी विचारलाय.
उपरकरांचा मनेसत प्रवशे... सेनेला जय महाराष्ट्र
शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.
२९ डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलीय. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील स्थानीक नेते सुनील बागुल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आता उपरकरही शिवसेना सोडणार असल्यानं पंक्षातर्गत नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय़.
राज ठाकरे लहान भावासारखे वागले नाहीत- मनोहर जोशी
राज ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले, राज ठाकरे मात्र लहान भावासारखे वागले नाहीत अशी टीका मनोहर जोशींनी केली आहे. `झी २४ तास`शी खास बातचीत करताना मनोहर जोशी यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे असंही मनोहर जोशींनी म्हटलं आहे. मनसेची भविष्यात अशीच भूमिका राहिल्यास शिवसेना मनसेशी विरोधकांसारखीच वागेल असं मनोहर जोशींनी सांगितलं.
/marathi/slideshow/खेडने-दिली-मला-पहिली-विजयाची-बातमी-राज-ठाकरे_191.html