Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

गणेशोत्सवाची परंपरा

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

महागणपती

महागणपती

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे महागणपतीची स्थापना सन १७०१ मध्ये या घराण्याचा मूळपुरुष शिव तांडेल याने सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच त्या घराण्याच्या पहिल्या पिढीपासून अगदी आतापर्यंतची नववी व दहावी पिढी त्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत आहे. ‘लिम्का बुक’नेही मान्यता दिलेला भारतातील पहिला आणि ३११ वर्षांची परंपरा असलेला हा आगळावेगळा महागणपती आहे.

या महागणपतीची मूर्ती बनविण्यास श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला सुरुवात करतात. गणेश चतुर्थीला या महागणपतीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात. फक्त डोळे रंगविले जातात व विधिवत पूजा होते. दुसर्याल दिवशी उंदीर पूजेला ठेवतात. तिसर्याळ दिवशी या महागणपतीचे रंगकाम सुरू होते व ते पाचव्या दिवशी संपूर्ण रंगवून संपते. शेवटचे रंगकाम विसाव्या दिवशी दुपारी होते. पहिले चार दिवस सफेद, नंतर संपूर्ण रंगकाम झालेला व विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिलेला असा २१ दिवसांत वेगवेगळा दिसणारा असा हा जगातील एकमेव गणपती आहे.

गणेश गल्लीचा राजा

गणेश गल्लीचा राजा

मुंबईतल्या ‘लालबागचा राजा’नंतर मुंबईतल्या लोकांची पावलं आपोआप वळतात ती गणेश गल्लीच्या राजाकडे. पण या राजाचं मंडळ हे त्या बाप्पाच्या सेवेसोबतच समाजाप्रती असलेलं ऋृण फेडण्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात. जीएसबीचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या किंग सर्कलच्या राजाची मूर्ती ही दरवर्षी शाडूच्या मातीची तयार केलेली असते. तसंच ही मूर्ती नागपंचमीच्या दिवशी बनवायला सुरुवात केली जाते. या गणपतीवर दरवर्षी ६८ किलो सोनं व चारशे किलो चांदी चढवली जाते.

लालबागचा राजा

लालबागचा राजा

लालबागच्या राजाची स्थापना १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार सन १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री`ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा` म्हणून श्री ची मूर्ती प्रसिध्द झाली.

गिरगावचा उत्सव

गिरगावचा उत्सव

गिरगावनेही आता टॉवर्सची उंची गाठण्यास सुरुवात केली असली, तरी आजही बहुतांश पारपंरिक पद्धतीचा आणि कार्यकर्त्यांचा उत्सव हे गिरगावच्या गणेशोत्सवाचे रूप कायम टिकून आहे. व्यापारीकरणाची लागण येथेही झाली आहे, पण खूपच कमी प्रमाणात. गिरगावचा गणेशोत्सव म्हटला की प्रामुख्याने तीन भाग येथे पडतात. गिरगावच्या सुरुवातीचा चिराबाजारचा भाग , त्यानंतर झावबावाडी , ठाकूरद्वारपासून सुरू झालेला थेट मुगभाट , आंबेवाडी , रामचंद्र बिल्डिंग , प्रार्थना समाजपर्यंतचा परिसर आणि त्यापलीकडचा खेतवाडीचा परिसर.

गणेशोत्सवाच्या दरम्यान अख्खे गिरगाव एक मंडपच बनल्यासारखे. इथे सार्वजनिक गणेशोत्सवांची जितकी मोठी संख्या तितकीच घरगुती गणपतींची संख्याही मोठी असते. त्यामुळेच तर विसर्जनाच्या मिरवणुकींप्रमाणे गणेशचतुर्थीच्या म्हणजेच पहिल्या दिवशी वाजतगाजत प्रत्येक जण आपापली मूर्ती घरी आणतात. पूर्वापारचे मराठी - गुजराती - गिरगावलाच खेटून असलेल्या खेतवाडीचा तोंडवळा मात्र पूर्वापार वेगळाच असतो. खेतवाडीच्या पाचव्या सहाव्या गल्लीपासून अकराव्या - बाराव्या गल्लीपर्यंत १८ ते २५ फूट उंचीच्या मूर्ती पाहण्यासाठी अहोरात्र रांगा असतात.

दादर-माटुंगा गणेशोत्सवाचे महत्त्व

दादर-माटुंगा गणेशोत्सवाचे महत्त्व

मुंबईच्या राजकीय , सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचे प्रमुख केंद्र असलेल्या दादर आणि परिसरातील गणेशोत्सवात गेल्या अनेक वर्षांपासून देखावे , रोषणाई आणि उंच गणेशमूर्तीपेक्षा सामाजिक कार्यावर भर देऊन गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल दिसून येतो.

मुंबईतील गणेशोत्सवात गिरगावनंतर दादरच्या गणेशोत्सवाचे महत्त्व होते. म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या दादरच्या राम मारुती रोड आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गिरगावमधील ब्राह्मण सभेच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. लोकमान्य टिळकांनी ब्राह्मण सभेच्या तीन मूर्तींची स्थापना केली. तशाच गणेशमूर्तीची दादरच्या राम मारुती रोड गणेशोत्सव मंडळाने प्रतिष्ठापना केली. गेल्या ६४ वर्षांपासून या मंडळाच्या मूर्तीत बदल झालेला नाही. तीन फूटांची शाडूची मूर्ती हे या मंडळाच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आजही कायम आहे.

दादरमधील विठ्ठलवाडी आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा दबदबा आहे. म्हणूनच दादरचा राजा असे बिरूद या गणेशोत्सवाला मिळाले आहे. गेल्या ७४ वर्षांपासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी मानली आहे. दादर - माहीममधील गणपती उत्सव सर्वसामान्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो .

माटुंगा वडाळ्यातील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा गणेशोत्सव म्हणजे श्रीमंतांचा गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो बावनकशी सोन्याने मढलेल्या दागिन्यांची मूर्ती हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे . थाटमाट असला तरी श्रीमंतीचा कुठेही बडेजाव दिसत नाही . मंडळाने पावित्र्य अतिशय कसोशीने जपले आहे.

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

More Slideshow

8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीचे 10 स्मार्टफोन

इराकमध्ये भीषण नरसंहार!

फूटबॉल स्टार्स आणि त्यांच्या प्रेम कहाण्या...

`फादर्स डे` स्पेशल बॉलिवूडची गाणी

बॉलिवूडचे सुपर ‘डॅड’!

जगातील काही समाजाचे विचित्र अंत्यविधी प्रकार

माधुरी दीक्षितचे सर्वश्रेष्ठ सिनेमे

`मदर्स डे` निमित्त गिफट

`मदर्स डे` आणि गीते

लग्नाआधीच यांना लागली बाळाची चाहूल...

जगातील १० सर्वात धोकादायक पूल!

`बॉलिवूड`मध्ये येणारे नवे चेहरे

First Prev 1 2 3 4 5  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/गणेशोत्सवाची-परंपरा_127.html