गुगलचा क्रोमबुक पिक्सेल
पिक्सेलच्या रुपाने लॅपटॉपच्या जगात नवी क्रांती घडवायचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांधिक परिपूर्ण लॅपटॉप बनवण्याचा हा प्रयत्न आहे. पिक्सेल हा हाय-एंड आणि प्रभावशाली हार्डवेअर असलेला लॅपटॉप आहे. पिक्सेल हा गुगलने स्वतः तयार केलेला लॅपटॉप आहे. यामध्ये सर्वांत आकर्फक गोष्ट म्हणजे ‘क्लाऊड’ आहे. विंडोज-८ आणि मॅकबुक यांच्या एकत्रित संयोगाइतका प्रभावी हा लॅपटॉप आहे. याचा स्क्रीन रेटिना डिसप्ले असलेला आहे.
हार्डवेअर
क्रोमबुक पिक्सेलमध्ये ड्युएल कोर १.८ गिगाहर्ट्झ इंटेल कोर i5 प्रोसेसर आहे. ४ जीबीमेमरी आणि इंटिग्रेटेड HD ४००० ग्राफिक्स आहे. आधीच्या क्रोमबुकपेक्षा यात ऍडव्हान्स तंत्र वापरलं आहे. जुन्या क्रोमबुकमध्य़े ARM आणि सेलेरॉन प्रोसेसर वापरला जाई. कंप्युटिंग पॉवरमध्येही जबरदस्त सुधारणा केली आहे.
पिक्सेलमध्ये २ २.० USB पोर्ट्स आहेत. तसंच एक मिनी डिसप्ले पोर्ट आहे. तसंच SD कार्ड स्लॉट आणि ३.५ मिमीचं कॉम्बो हेडफोन-मायक्रोफोन जॅक आहे. यात ड्युएल बँड ८०२.११ a/b/g/n वाय-फाय, ब्ल्युटूथ ३.०, त्यावर ७२० पिक्सलचा वेबकॅम आणि त्यालाच ड्युएल मायक्रोफोन आहेत. ब्लुटूथ ३.० असलं तरी HDMI नाही.
डिसप्ले
गुगलने बाकीच्या लॅपटॉप्सना मागे टाकत आगाडी मिळवली आहे ती आपल्या गोरिला ग्लास कव्हर्ड मल्टी-टच स्क्रीन आहे. १२.८५ इंच आणि २५६०x १७०० (२३९ PPI) टचस्क्रीन पॅनल आहे. ४.३ मिलिअन पिक्सल्स आणि ४०० निट ब्राइटनेस आहे. याचा आस्पेक्ट रेशो ३:२ आहे. ५९ WHr बॅटरी पाच तास चालते असा दावा केला जात असला तरी ती त्या आधीच डाऊन होते.
ऑपरेटिंग सिस्टम
जुलै २००९ मध्ये वेब ऍप्लिकेशन्ससाठी खास क्रोम ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र युजर इंटरफेसच्या ब्राऊजरमध्ये फक्त मीडिआ प्लेयर आणि फाइल मॅनेजर आहे. इतर सर्व अॅप्लिकेशन्स आणि डॉक्युमेंट्स ‘क्लाऊड’मध्ये स्टोअर करावे लागतात.
क्लाऊड स्टोअरेज
क्रोमबुक पिक्सेलमध्ये लोकल सॉलिड स्टेट स्टोअरेज ३२ जीबी आणि SSD ६४ जीबी आहे. पण पुढील ३ वर्षांत ग्राहकांना गुगल ड्राइव्ह सर्व्हिसतर्फे १ टेराबाइट एवढी क्लाऊड स्टोअरेज स्पेस मिळणार आहे. क्लाऊडद्वारे अधिक शक्तिशाली करण्यासाठी पिक्सेलचा शोध लावल्याचं गुगलचं म्हणणं आहे.
किंमत
वाय-फाय व्हर्जन असणारा लॅपटॉप १,२९९ डॉलर्स आणि एप्रिलमध्ये बिल्ट-इन एलटीई किंमत असणाऱ्या लॉपटॉपची किंमत १,४४९ रुपये असेल. ३२ जीबी स्टोअरेज असणाऱ्या लॅपटॉपची किंमत १,२९९ डॉलर्स आहे. तर रोपात याची किंमत १,०४९ पाऊंड असेल. ६४ जीबी स्टोअरेज असणाऱ्या लॅपटॉपची किंमत १,४९९ डॉलर्स असेल.
/marathi/slideshow/गुगलचा-नवा-क्रोमबुक-पिक्सेल-लॅपटॉप_196.html