यशस्वी झेप...
जगभरातील तंत्रज्ञानाच्या विकासात भारतीयांचा मोलाचा वाटा आहे. भारतीयांनी ‘सिलिकॉन व्हॅली’च्या प्रगतीमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या यशस्वीपणे कामगिरीमुळे ते आज जगभरात टेक-गुरू म्हणून ओळखले जात आहेत. एक नजर टाकुयात अशाच काही ‘ग्लोबल’ भारतीय टेक-गुरूंवर...
सुंदर पिचाई, ‘गुगल अँन्ड्रॉईड’ ऍडरॉईचे प्रमुख
गुगलच्या अँड्रॉईड, क्रोम आणि गुगल अॅप्सचे जेष्ठ उपाध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे काम पाहत आहेत. पिचाई मूळचे चेन्नईचे. नुकतंच, अँन्डी रुबीन यांच्याकडून पिचाई यांनी गुगल अँड्रॉईडचे हक्क विकत घेतलेत. याअगोदर ते गुगल क्रोम आणि गुगलच्या विविध अॅप्सचं काम सांभाळत होते.
पिचाई यांनी खडगपूर आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर पदव्यूत्तर शिक्षणासाठी त्यांनी सॅण्डफोर्ड गाठलं. व्हार्टन स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचं शिक्षणही घेतलं. २००४ साली पिचाई यांनी गुगलचा हात धरला.
आनंद राजारामन, सह-संचालक, कॅम्बरीन व्हेन्चर अॅन्ड कॉसमिक्स
आनंद राजारामन हे वेब आणि टेक्नॉलॉजि क्षेत्रातील व्यायसायिक असून ते कॅम्बरीन व्हेन्चर अॅन्ड कॉसमिक्सचे सह-संस्थापक आहेत. ‘जंगली कॅर्पोरेशन’च्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. १९९० साली त्यांनी ‘अमॅझॉन.कॉम’ च्या जडणघडणीतही महत्त्वाची भूमिका बजावली.
विनोद धाम, इन्व्हेन्टर, एन्टरप्रिन्युअर आणि व्हेंचर कॅपिटॅलिस्ट
इंटेलच्या पेन्टीअम प्रोसेसरच्या जडणघडणीमध्ये विनोद धाम यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांना पेन्टीअम चिपचे निर्माते म्हणून ओळखलं जातं. ‘इंटेल’च्या ‘मायक्रो प्रोसेसर समूहा’च्या उपाध्यक्षपदी सध्या ते काम पाहत आहेत. ‘इंटेल’च्या ‘फ्लॅश मेमरी टेक्नॉलॉजी’च्या शोधामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
धाम यांनी ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’मधून च्या इलेक्ट्रीकल इंजिनाअरींची पदवी प्राप्त केलीय. ‘सिनसिनाटी’ विद्यापीठामधून त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं.
विवेक भारद्वाज, सॉफ्टवेअर पोर्टफोलिओ प्रमुख, रिम
विवेक भारद्वाज सध्या ब्लॅकबेरीचे सॉफ्टवेअर पोर्टफोलिओ प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ब्लॅकबेरीच्या नव्या ऑपरेटींग सिस्टम तसंच फोनच्या नव्या लाइनच्या लॉन्चिंगदरम्यान विवेक भारद्वाज यांनी सूत्रं हाताळली. त्यांचा ‘ब्लॅकबेरी-१०’च्या विकासामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
विवेक भारद्वाज यांचे आई-वडील भारतीय वंशाचे असले तरी, त्यांची जडणघडन मात्र ब्रिटनमध्येच झालीय. इन्फॉर्मेसन सिस्टममध्ये त्यांनी पदवी मिळवलीय. ब्लॅकबेरीमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी ‘सिमेन्स मोबाईल’ तसंच ‘बेन क्यू मोबाईल’ मध्येही कामाचा अनुभव घेतला.
साबीर भाटिया, ‘हॉटमेल’ आणि ‘जॅक्सटर’चे सह-संस्थापक
साबीर भाटिया हे भारतीय वंशाचे अमिरेकन उद्योगपती आहेत. भाटिया यांनी ४ जुलै १९९६ मध्ये ‘हॉटमेल’ या ई-मेल सर्व्हिस आणि फ्री मेसेजिंग सर्व्हिस ‘जॅक्सटर’ची स्थापना केली.
‘अॅपल कम्पुटर’सोबत काम करणं भाटिया यांच्या पथ्यावर पडलं. तिथंच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या जॅक स्मिथ या सहकार्यासोबत मिळून त्यांनी ४ जुलै १९९६ रोजी ‘हॉटमेल’ अस्तित्वात आणलं.
‘हॉटमेल’ हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं ई-मेलचं जाळ ठरलंय. ३६९ दशलक्ष यूजर्स ही सुविधा सध्याही हाताळत आहेत. ही संख्या गाठणं आजतागायत केवळ गुगलला शक्य झालंय. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी हॉटमेलला अल्पावधीतच यशाच्या शिखरावर नेलं. १९९८ साली हॉटमेलनं मायक्रॉसॉफ्टशी हातमिळवणी केली.
विनोद खोसला, पूर्व सह-संचालक, सन मायक्रोसिस्टम
सन मायक्रोसिस्टमच्या स्थापनेमध्ये हातभार लावणाऱ्यांमध्ये विनोद खोसला हे एक अग्रगण्य नाव आहे. ‘सन मायक्रोसिस्टम’मध्य खोसला यांनी अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यानंतर मात्र त्यांनी ‘क्लिनीअर पर्किन्स कोफिल्ड अॅन्ड बायर्स’चा रस्ता धरला. खोसला यांनी २००४मध्ये ‘खोसला व्हेन्चर’ची स्थापना केली आणि संपूर्ण जबाबदारी स्वत: सांभाळली.
फोर्ब्सनं जाहीर केलेल्या भारतीय-अमेरिकन अब्जाधिशांच्या यादीतही खोसला यांचं नाव झळकलं होतं. यावेळी त्यांची संपत्ती होती १.३ बिलियन डॉलर्स.
खोसला यांनी दिल्ली ‘आयआयटी’मधून इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग पदवी प्राप्त केलीय. त्यानंतर ‘कार्नेज मेलन युनिव्हर्सटी’तून त्यांनी बायोमेडिकल इंजिनिअरीचं शिक्षण घेतलं. ‘स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिजनेस’मधून त्यांनी आपलं एमबीए पूर्ण केलं.
/marathi/slideshow/ग्लोबल-भारतीय-टेक-गुरू_213.html