... जी तुम्ही सहजासहजी सोडू शकणार नाहीत!
आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या जागा तर आपल्यासाठी सर्वात जवळच्या असतात. पण, कधी कधी तिथल्या सोई-सुविधांची वाणवा आपल्या लक्षात येते आणि जाणवतं... अरे! जग किती पुढे गेलंय. मग, अशा वेळेस आपल्याला साहजिकच अशा काही शहरांची आठवण होते, जिथं तुमची ‘लाईफ’ सहज अन् सोपी होण्यासाठीच बनलेली असतात. कुणी सांगावं... आपल्यालाही कधीतरी अशा शहरांत जाऊन राहण्याची तिथल्या सोई-सुविधा उपभोगण्याची संधी मिळेल... किंवा या शहरांचा आदर्श समोर ठेऊन आपलंही शहर त्या दिशेनं वाटचाल करेल...
एका जागतिक दर्जाच्या सर्व्हेत कोणकोणत्या शहरांनी स्थान मिळवलंय... जगभरातील पहिली दहा शहरं जिथं राहणं अनेकांचं स्वप्न ठरलंय... चला तर पाहुयात... जगभरातील ‘स्वप्नवत’ १० शहरं... जी तुम्ही सहजासहजी सोडू शकणार नाहीत!
मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया
सुखकारक शहरांमध्ये पहिला नंबर पटकावलाय ऑस्ट्रेलियातील ‘मेलबॉर्न’ या शहरानं... सर्व्हेत ९७.५ गुण मिळवून या शहरानं नागरिकांना स्वर्गाचं सुख जमिनीवरच दिल्याचं सिद्ध केलंय. ‘ट्राम वे’ वाहतुकीसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. ही ‘ट्राम वे’ सिस्टीम जगातील सर्वोत्तम सिस्टम आहे. तर त्याची ऑफिस बिल्डिंग दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे. १९०६ साली जगातील पहिली फिचर फिल्म ‘नेड केली गँग’ची कथा मेलबर्न या शहरातच तयार झालीय. खरं म्हणजे या शहराची स्थापना १८३५ साली झाली होती पण, १८४७मध्ये राणी व्हिक्टोरिया हिनं ‘मेलबॉर्न’ला शहराचा दर्जा दिला होता.
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
ऑस्ट्रियामधलं सर्वात मोठं शहर आणि राजधानी... व्हिएन्ना... या शहरानं या सर्व्हेमध्ये दुसरा क्रमांक मिळवलाय. या शहराला मिळालेल्या संगीताच्या वारसामुळे हे शहर ‘सिटी ऑफ म्युझिक’ म्हणून ओळखलं जातं. तसंच जगातील पहिले मनोविश्लेषक ‘सिगमंड फ्रायड’ यांच्यामुळे ‘स्वप्नांचं शहर’ अशीही ओळख या शहराला मिळाली. जगात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठी स्मशानभूमी इथंच वसलेली आहे. या स्मशानभूमीत अडीच लाखांपेक्षाही जास्त कबरी आहेत.
वैंकूवर, कॅनडा
कॅनडास्थित वैंकूवर हे जगातील तिसरं सोई-सुविधांपूर्ण शहर ठरलंय. हे कॅनडामधल्या अनेक मोठ्या बंदरांपैकी एक बंदर आहे. ‘ग्रीनपीस’ जागतिक पर्यावरण संघटनेचं हे जन्मस्थान... उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कॅनडामधलं हे एक असं शहर आहे, जिथे बहुतांशी नागरिकांची मातृभाषा इंग्रजी नाही आणि हे नागरिक त्यांच्या इतर भाषेतच एकमेकांशी संवाद साधतात.
टोरांटो, कॅनडॉ
चौथा क्रमांक पटकावलाय कॅनडातीलच टोरांटो या शहरानं... कॅनडाचं हे आर्थिक शहर आणि जगातील सर्वात मोठ्या आर्थिक घडामोडी या शहरात घडून येतात. टोरांटो या शहरातील ‘यंग स्ट्रीट’ची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीय. कारण हा जगातील सर्वात लांब रस्ता ठरलाय. त्याची लांबी आहे तब्बल १,८९६ किलोमीटर. एका मॅगझीननं केलेल्या सर्व्हेनुसार, आर्थिकरित्या शक्तीशाली ठरलेल्या जगातील शहरांमध्ये या शहराचा दहावा क्रमांक आहे.
कॅलगरी, कॅनडा
पाचवा नंबर आहे कॅनडातल्याच ‘कॅलगरी’ या शहराचा... १९८८ साली झालेल्या शीतकालीन ऑलिम्पिक खेळांचं यजमानपद कॅनडातल्या याच शहरानं पहिल्यांदा भूषविलं होतं. २००७ साली फोर्ब्स मॅगझिननं या शहराचा सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरव केला होता. तसंच २०११ साली जगातील पहिल्या क्रमांकाचं पर्यावरणवादी शहर’ म्हणून या शहराला ओळख मिळाली. १८८४ साली ४००० लोकसंख्येच्या बळावर या ठिकाणाला शहराचा दर्जा देण्यात आला.
सिडनी, ऑस्ट्रेलिया
सिडनी या शहराचा क्रमांक आहे सहावा... ‘युनेस्को’चं हे घर, कलेला वाव देणारं एक शहर म्हणूनही ओळखलं जातं. सिडनीचा ‘हार्बर ब्रिज’ हा जगातील सर्वात मोठा ब्रिज आहे. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद झालीय. जागतिक दर्जाच्या अनेक खेळांचं यजमानपद या शहरानं भूषवलंय. यामध्य १९३८ सालचा ‘ब्रिटीश एम्पायर गेम्स’ तसंच ‘२००० च्या उन्हाळी सत्रातील ऑलिम्पिक’चाही समावेश आहे. १७८८ मध्ये वसलेलं हे शहर अगोदर ऑस्ट्रेलियातील एक ब्रिटिश कॉलनी म्हणून ओळखलं जात होतं.
एडिलेड, ऑस्ट्रेलिया
भव्य आणि दिव्य चर्चसाठी ओळखलं जाणारं हे एक शहर... राहण्यासाठी योग्य अशा शहरांमध्ये या शहरानं सातवा क्रमांक पटकावलाय. १८३८मध्ये बांधण्यात आलेलं ‘होली ट्रिनिटी एंग्लिकन चर्च’ हे सगळ्यात जुनं चर्च याच शहरात वसलंय. या शहराची खासियत म्हणजे तुम्ही या शहरात कुठेही असाल आणि तुम्हाला एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर, एअरपोर्टवर किंवा शहराच्या मध्यभागातल्या कुठल्याही ठिकाणावर पोहचायचं असेल तर तुम्हाला गाडीनं केवळ २० मिनिटांत या ठिकाणी पोहचता येतं. सायकल शर्यतींसाठीही हे शहर ओळखलं जातं. १८३६ साली या शहराची स्थापना झालीय.
हेलसिंकी, फिनलँड
आठव्या क्रमांकावर आहे हेलसिंकी हे शहर. जगातील सर्वात थंड शहरांपैकी हे एक शहर... वर्षांतील तब्बल ५१ दिवस या शहराला सूर्यप्रकाशाचा एक किरणही लाभत नाही. फिनलँडच्या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि संशोधनाचं महत्त्वाचं केंद्र... ऑलिम्पिक स्टेडियम, ग्लास पॅलेस, वेलोड्रोमिया यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. १५५० साली स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला) यानं एक व्यापार केंद्र म्हणून या शहराची स्थापना केली होती.
पर्थ, ऑस्ट्रेलिया
पश्चिम ऑस्ट्रेलियाची राजधानी पर्थ... जगातील नवव्या क्रमांकाचं शहर ठरलंय. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षांचे ३६५ दिवस इथं दिवसातले आठ तास इथं सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे या शहराला ‘प्रकाशाचं शहर’ म्हणूनही ओळखलं जातं
ऑकलँड, न्यूझीलंड
न्यूझीलंडचं ऑकलँड या शहरानं दहावा नंबर मिळवलाय. ‘सिटी ऑफ सेल्स्’ म्हणूनही हे शहर ओळखलं जातं... कारण, जगात सगळ्यात जास्त बोटी या शहरात आढळतात. ‘ऑकलँड ज्वालामुखी’ क्षेत्रात जवळजवळ ५० ज्वालामुखी आढळलेत. यातील ‘रँगिटोटो’ बेटावर सर्वात मोठा ज्वालामुखी आढळलाय.
/marathi/slideshow/जगभरातील-स्वप्नवत-१०-शहरं_112.html