बलाढ्य विमानं... विजय पक्का!
पहिल्या जागतिक युद्धा ते आत्ताआत्तापर्यंतच्या युद्धांमध्ये लढाऊ विमानांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. २१ व्या शतकात तर सगळ्याच देशांमध्ये जणून अशी लढाऊ विमानांसाठी स्पर्धाच लागलीय. शक्तीप्रदर्शनासाठी या विमानांचा वापर होतोय. ज्या देशाकडे बलाढ्य लढाऊ विमानं त्या देशाचा विजय पक्का! असं काहीसं चित्रही दिसून येतंय.
भन्नाच वेग, परिवर्तनशीलता आणि इतर विमानांच्या तुलनेत छोटा आकार ही या विमानांची खासियत. सध्याच्या युगातील सुपरसॉनिक म्हणजेच आवाजापेक्षाही जास्त वेगानं प्रवास करणारी ही विमानं ताशी १००० मैलांचा टप्पा सहज पार करून जातात. वजनदार बॉम्ब उचलून नेण्यासाठी आणि शत्रूपक्षावर फेकण्यासाठी या विमानांचा वापर केला जातो.
चला तर एक नजर टाकुयात, जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या अशाच काही लढाऊ विमानांवर...
एफ – ३५, लायटनिंग II
एफ – ३५, लायटनिंग II या लढाऊ हे एका इंजिनवर चालणारं एकच सीट असणारं लढाऊ विमान सैन्य दलाची शान समजलं जातं. रडारपासून बचावासाठी वापरलं जाणाऱ्या विमानांची ही पाचवी पिढी... सुपरसॉनिक स्पीड आणि अत्याधुनिक यंत्रणेनं सज्ज असं हे लढाऊ विमान इतिहासातील आत्तापर्यंतच्या विमानांमध्ये सर्वात शक्तीशाली समजलं जातं.
एफ / ए – २२ रॅप्टर
लढाऊ विमानांचं पाचवं जनरेशन असलेलं हे एअरक्राफ्ट अमेरिकेच्या हवाई दलाची शान बनलंय. लॉखिद मार्टीन आणि बोईंग यांनी बनवलेल्या एफ / ए – २२ रॅप्टर या लढाऊ विमानाचा स्पीड थक्क करणारा आहे. M61A2 20 मिलीमीटर तोफ आणि 480 राऊंडसह हे विमान सज्ज आहे. तसंच या विमानातील मुख्य हत्यार विभागात मध्यम आकाराच्या A@A मिसाईलदेखील सामावू शकतात.
सुखोई टी 50
‘सुखोई’ कंपनीनं बनवलेलं सुखोई PAK FA हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान रशिया विमान दलाची शान आहे. ही या विमानाची ही पाचवी पिढी असून अजूनही त्यात अनेक बदल होत आहेत. रशिया आणि भारतातील हवाई दलातील सुखोई हे सर्वांत नवीन आणि अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.
एमआयजी 35
मिकोयान निर्मित मिग 35 हे ‘फोर प्लस प्लस जनरेशन’चं विमान म्हणून ओळखलं जातं. 30 मिलीमिटर जीएसएच-30-1 तोफ आणि 150 राऊंडसह हे विमान सज्ज आहे. वेगवेगळ्या मिसाईल आणि बॉम्ब वाहून नेण्यासाठी मुख्यत: या विमानाचा वापर होतो. एकावेळी 2000 LB बॉम्ब वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. भारतात 2007 साली झालेल्या एअरो इंडिया या कार्यक्रमात या लढाऊ विमानाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पण, पूर्ण तऱ्हेनं विकसीत असलेल्या या विमानाचा समावेश अजूनही भारतीय हवाई दलात करण्यात आलेला नाही.
युरोफायटर टायफोन
अनेक भूमिका निभावणारं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आकाशात भिरभिरणारं हे लढाऊ विमान जगातील अत्याधुनिक विमानांपैकी एक विमान. ब्रिटिश एरोस्पेस, डच एरोस्पेस (जर्मनी), अलेनिया (इटली) आणि CASA (स्पेन) या यंत्रणांनी एकत्र येत या विमानाची निर्मिती केलीय. अमेरिका आणि जर्मनीची अत्याधुनिक पद्धत या विमानाच्या विकासासाठी वापरण्यात आलीय.
चेंगडू जे – 20
स्थान मिळालंय. छोट्या आकाराची दोन इंजिन या एअरक्राफ्टमध्ये बसवण्यात आलीत. चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्री ग्रुप फॉर चायनीज पिपल लिबरेशन आर्मी फोर्स (PLAAF) द्वारे या विमानाची निर्मिती करण्यात आलीय. 2019 साली चीनच्या हवाई दलात या विमानाचा समावेश होण्याची शक्यता आहे.
सू – 47
रशियानं बनवलेल्या सू-47 हे लढाऊ विमानाचा समावेश आत्तापर्यंत सेवेत झालेला नाही. असं असलं तरीसुद्धा पूर्व गोलार्धातील हे एक बलाढ्य विमान म्हणून ओळखलं जातंय. याही विमानात 30 मिलीमिटर जीएसएच-30-1 तोफ आणि 150 राऊंडस् सहज वाहून नेले जाऊ शकतात. 2.09 इतकी गतिक्षमता या विमानाची आहे.
राफेल
डिसॉल्ट राफेल या फ्रेंच ट्विन इंजिन डेल्टा विंग लढाऊ विमानाची निर्मिती ‘डेल्टा एव्हिएशन’नं केलीय. 9 टन वजन वाहण्याची क्षमता असलेल्या या विमानात दोन गन पॉड, 30 मिलीमीटर DEFA 791B तोफ (जी एका मिनिटात 2,500 राऊंडस् फायर करू शकते) आहेत. लेझर गाइडंससाठी ‘लेसर डेस्टिनेशन पॉड’ही या विमानात बसवण्यात आलेत.
भारताच्या हवाई दलात या लढाऊ विमानाचा समावेश लवकरच होण्याची चिन्ह आहेत. ‘126 डिसॉल्ट राफेल’ या लढाऊ विमानाच्या भारत आणि फ्रान्समध्ये चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
साब JAS 39 ग्रीपेन
एकावेळी अनेक भूमिका पार पाडण्याचा हातखंडा असलेल्या या विमानाचं वजन मात्र तुलनेनं अत्यंत कमी आहे. एकच इंजिन असलेलं हे लढाऊ विमान ‘साब’ या स्विडीश एअरोस्पेस कंपनीनं बनवलंय. ग्रीपेन या नव्या पिढीतल्या पहिल्या-वहिल्या लढाऊ विमानानं सैन्य दलात स्थान मिळवलंय. अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असलेलं लढाऊ विमान हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर हल्ले करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं.
सुखोई 30 एमकेआय
रशियाच्या ‘सुखोई’ आणि भारताच्या ‘हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ (HAL) निर्मित सुखोई 30 एमकेआय हे विमान खास भारतीय दलासाठी बनवण्यात आलंय. सध्या भारतीय दलात 190 सुखोई 30 एमकेआय विमानांचा समावेश आहे. 2015 पर्यंत ही संख्या 272 पर्यंत वाढवण्याचा भारतीय हवाई दलाचा मानस आहे.
एफ / ए – 18 हॉरनेट
आवाजापेक्षा तीव्रतेनं प्रवास करू शकणारं ‘एफ / ए – 18 हॉरनेट’ या सुपरसॉनिक विमानात दोन इंजिन आहेत. वेगवेगळ्या भूमिका निभावण्यासाठी सज्ज असेलेलं हे विमान मॅक 1.8 गती प्राप्त करू शकतं. 11 वेगवेगळी हत्यारं स्टेशन्स तसंच लेझर गाइडेड बॉम्बसारखी स्मार्ट हत्यारं या विमानात आहेत.
बी2बी बॉम्बर
बहुभूमिका निभावणारं हे लढाऊ विमान खास करून प्रतिपक्षावर पारंपरिक आणि अणुबॉम्ब टाकण्यासाठी वापरलं जातं. 0.92 मॅक गती प्राप्त करू शकणारं हे विमान आहे. बी 2 हे आत्तापर्यंतचं हवेतून जमिनीवर गुपचूपपणे आणि गतिनं हत्यारं वाहून नेणारं एकमेव एअरक्राफ्ट ठरलंय
/marathi/slideshow/जगातील-सर्वश्रेष्ठ-फायटर-जेट्स्_126.html