बॉलीवूडचे ‘सुपर डॅड’
आज १६ जून ‘फाडर्स डे’. या दिवसाच्या निमित्ताने बॉलीवूडमधील आपले करिअर सांभाळतानाही आपल्या कुटुंबाकडे आवर्जुन लक्ष देणारे स्टार कलाकार. आपली पित्याची भूमिका समर्थपणे निभावत आहेत. आपलं शेड्युल्ड सांभाळून मुलांच्या भवितव्याकडेही लक्ष देतात. या फादर्स डे च्या निमित्ताने त्यांची ही ओळख
अजय देवगण
बॉलीवूडमधील प्रसिद्ध नाव अजय देवगण. ज्ञासा आणि युग ही त्याची दोन मुलं. अजय देवगण आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी मुलांसाठी तो खास वेळ काढतोच. एकनिष्ठ वडील म्हणून त्याची ख्याती आहे.
अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालच्या मायरा आणि महिका या दोन लेकी म्हणजे त्याचा जीव की प्राण. लेकींच्या या प्रेमापोटी त्याने आपल्या हातावर त्यांची नावही गोंदवून घेलतीयेत.
सैफ अली खान
जरी कामात कितीही व्यस्त असला तरी एक चांगला बाबा म्हणून त्याने नेहमीच आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवलाय. छोटा नवाब म्हणून ओळख असलेला सैफ अली खान आपल्या सारा आणि इब्राहिम या लाडक्यांचा एक सपोर्टिव आणि प्रेमळ बाबा आहे.
आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला आमिर परफेक्ट बाबाही आहे. जुनैद, ईरा आणि आझादसाठी आमिर एक फेव्हरिट बाबा आहे. मुले त्यांच्या प्रगतीचे श्रेय बाबाला देतात. बाबा म्हणजे एक ग्रेट माणूस असं त्याच्या मुलांच म्हणणं आहे.
शाहरुख खान
बॉलीवूडचा बादशाह घरातही मुलांसाठी एक प्रेमळ बादशाह आहे. आर्यन आणि सुहाना ही दोन मुले म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व. त्यांच्यासाठी हा बादशाह जीवाचे रान करू शकतो. आता तो तिस-यांदा बाबा होतोय.सरोगसीच्या माध्यमातून शाहरुखच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे.
अभिषेक बच्चन
अभिषेकसाठी सगळ्यात आनंदाचा दिवस म्हणजे आराध्याचा जन्म. आराध्यचं आयुष्यात येणं म्हणजे त्याच्यासाठी बाबाचा एक नवीन रोल आहे. पण अभिषेक हा रोल एका आयडॉल बाबासारखा निभावतोय.
/marathi/slideshow/फादर्स-डे_231.html