आकर्षक डिझाईन आणि जबरदस्त फिचर्स
जगभरातील आघाडीच्या मोबाईल कंपन्यांमधली एक म्हणजे ‘एचटीसी’… या कंपनीनं नुकताच एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय... तो म्हणजे ‘एचटीसी वन’....
आकर्षक डिझाईन आणि जबरदस्त फिचर्सच्या साहाय्यानं हा स्मार्टफोन बाजारात दाखल झालाय. त्यामुळेच, गेल्या काही आठवड्यांत लॉन्च झालेल्या इतर कोणत्याही मोबाईलपेक्षा ‘एचटीसी वन’ वेगळा ठरतो. पाहुयात... याच मोबाईलचे काही दमदार फिचर्स...
ऑपरेटिंग सिस्टम
स्मार्टफोन ‘एचटीसी वन’मध्ये गुगल ऑपरेटिंग सिस्टम अँड्राईडचं आधुनिक व्हर्जन ४.१ (जेलीबीन) आहे. या नव्या ऑपरेटींग सिस्टमचा अनुभव तुम्हाला लगेचच लक्षात येईल.
डिस्प्ले
नव्या `एचटीसी वन`चा फूल एचडी डिस्प्ले आहे ४.७ इंचाचा... अॅल्युमिनिअम बॉडीच्या या फोनमध्ये प्रतिइंचाचं रिजोल्युशन आहे ४६८ पिक्सल... या फोनची रिजोल्युशन क्वालिटीच सांगते की हा फोन इतर स्मार्टफोनपेक्षा का वेगळा आहे.
प्रोसेसर आणि रॅम
‘एचटीसी वन’मध्ये १.७ गेगा हर्टज् चे क्वालकोम स्नेपड्रॅगन प्रोसेसरबरोबरच २ जीबीचा तगड्या रॅमचा समावेश आहे. इतर स्मार्टफोनपेक्षा हा रॅम आणि प्रोसेसर नक्कीच वेगळा आहे.
मेमरी
`एचटीसी वन` दोन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शनसह उपलब्ध होणार आहे. एकाची क्षमता आहे ‘३२ जीबी’ तर दुसऱ्याची आहे ‘६४ जीबी’... या फोनमध्य कंपनीनं इंटरनल मेमरीची सुविधा दिलीय. परंतू, मायक्रो एस डी कार्डच्या साहाय्यानं ही मेमरी एक्सटेंड करता येऊ शकणार नाही.
कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटीसाठी ‘एचटीसी वन’मध्ये वाय-फाय, ब्लू टूथ ४.०, जीपीएस, एनएफसी आणि मायक्रो यूएसबी पोर्टची सुविधा दिली गेलीय.
कॅमेरा
‘एचटीसी वन’चा कॅमरा या फोनमधला महत्त्वाचा आणि सर्वात वेगळा भाग ठरलाय. मेगापिक्सलच्या शर्यतीत धावण्यापेक्षा कंपनीनं ‘एचटीसी वन’मध्ये ‘अल्ट्रापिक्सल’ कॅमरा दिलाय. इतर कोणत्याही कॅमेऱ्यापेक्षा या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं काढलेल्या फोटोंची क्वालिटी उत्तम असेल, असा दावा एचटीसीनं केला. कमी प्रकाशातही या कॅमेऱ्यातून चांगले फोटो काढता येतील. फोनच्या पुढच्या आणइ मागच्या दोन्ही बाजुंच्या कॅमेऱ्यात ‘फूल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.
बॅटरी
मजेशीर गोष्ट म्हणजे, या आकाराच्या इतर फोनमध्ये जास्तीत जास्त २,१००mAh क्षमता असलेली बॅटरी असते. पण, ‘एचटीसी वन’मध्ये २,३००mAh बॅटरी दिली गेलीय. म्हणजेच, यामध्ये बॅटरीचं कॉन्फ्रिगेशन इतरांपेक्षा जवळजवळ २००mAh पर्यंत जास्त आहे.
किंमत
या नव्या फोनच्या किंमतीबाबत कंपनीकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात हा फोन भारतासहीत जगभरातील अन्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकेल, अशी आशा आहे.
/marathi/slideshow/फूल-टू-एचटीसी-वन_193.html