किती अंधश्रद्धाळू आहेत हे बॉलिवूड स्टार
महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी विधेयकावर जोरदार फड रंगला होता. पण बॉलिवुडच्या ज्या स्टारला लाखो जण फॉलो करतात ते अंधश्रद्धेने कसे पछाडले आहे हे त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येईल....
पाहा हा स्लाइड शो
सलमान खान
वाँटेड` आणि `दबंग`च्या यशानंतर सलमान खान आपला प्रत्येक सिनेमा ईदच्याच मुहूर्तावर रिलीज करतो.
एकता कपूर
निर्माती एकता कपूर किती अंधश्रद्धाळू आहे, हे काही वेगळे सांगायला नको. शुटिंग लोकशन्सची निवड असो किंवा आपल्या मालिकेचे शीर्षक ठेवणे असो, एकताचा अंधश्रद्धाळूपणा जगजाहीर आहे. `क्या सुपर कुल है हम`, `ऑल द बेस्ट`, `सिंघम` आणि `गोलमाल` सीरिजच्या सिनेमातील बीचचे दृश्य एकताने एकाच लोकेशनवर शुट केले होते.
ऐश्वर्या राय
अभिषेक बच्चनबरोबर लग्नापूर्वी ऐश्वर्या रायने झाडाबरोबर लग्न केल्याची बातमी मीडियात आली होती. ऐश्वर्याला मंगळ असल्यामुळे बच्चन कुटुंबियांनी असे केले होते. मात्र नंतर बच्चन कुटुंबियांनी ही बातमी अफवा असल्याचे सांगितले होते.
अजय देवगण
अभिनेता अजय देवगणने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आपले नाव बदलले. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अजयचे नाव विशाल होते. शिवाय आपल्या फॅमिली ज्योतिषाच्या सांगण्यावरुन अजयने आपल्या आडनावातून a हे अक्षर काढून टाकले. काही फ्लॉप सिनेमानंतर आणि अपघातानंतर अजय देवगण आपले नाव Devgn असे लिहितो.
कतरिना कैफ
अल्पावधीतच यशोशिखरावर पोहोचलेली अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा खूप अंधश्रद्धाळू आहे. कतरिना आपल्या प्रत्येक सिनेमाच्या रिलीजआधी दरग्यावर जाऊन प्रार्थना करत असते.
करीना कपूर आणि सैफ अली खान
करीना कपूर आणि सैफ अली खानसुद्धा इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अंधश्रद्धाळू आहेत. बेबो 3 या अंकाला आपला लकी नंबर समजते तर सैफचा लकी नंबर 7 आहे. सैफचा वाढदिवस 16 ऑगस्टला असतो. 16 चा योग 7 येतो. त्यामुळे सैफ 7 या अंकाला आपला लकी नंबर समजतो.
विद्यासाठी लकी आहे हाशमी
विद्या बालन आणि इमरान हाशमीचा काही संबंध आहे, असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाहीये. हाशमी हे पाकिस्तानी ब्राण्डचे काजळ आहे. विद्या हाशमी काजळला लकी समजते. त्यामुळे ती दुस-या ब्राण्डचे काजळ वापरत नाही.
सोनू सूदचा लकी नंबर
सोनू सूदने आपल्या ऑडी कारच्या रजिस्ट्रेशन नंबरमध्ये Q7 हा नंबर मिळवण्यासाठी तीन लाख रुपये खर्च केले होते.
अर्जुन रामपाल
अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या हाताच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठी घालतो. एवढ्या अंगठ्या घालण्यामागे नेमके कारण काय हे तर अर्जुनलाच ठाऊक.
शाहरुख खान
शाहरुख खानच्या प्रत्येक कारचा रजिस्ट्रेशन नंबर 555 हा आहे.
संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त महागड्या कारचा शौकीन आहे. संजयच्या कार कलेक्शनमध्ये रॉल्स रॉयस, फॅटम, फरारी आणि बुगारी वेरॉन या गाड्यांचा समावेश आहे. संजयने आपल्या सगळ्या गाड्यांचा नंबर 4545 असा ठेवला आहे. संजय 9 या अंकाला आपला लकी नंबर मानतो. त्यामुळे त्याच्या कारच्या नंबर प्लेटच्या 4545 या नंबरचा योगही 9 येतो.
शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या मॅचदरम्यान दोन्ही हातात घड्याळ घालून दिसली होती. आता दोन घड्याळ हातात घालण्यामागचे रहस्य काय हे तर शिल्पाच जाणे.
/marathi/slideshow/बॉलिवूड-सेलिब्रिटी-अंधश्रद्धाळू_247.html