बॉलिवूडचे चार्मर्स
अभिनेत्यांमध्ये काही क्वालिटीज असाव्या लागतात.. त्यांच्या व्यक्तिमत्वाने लोकांनी आकर्षित व्हायला हवं, त्याची स्टाइल लोकप्रिय व्हायला हवी. लोकांना त्याच्यासारखं बनायची इच्छा व्हायला हवी. मुलींसाठी त्याच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटला पाहिजे. देव आनंद, राजेश खन्नाने तो काळ आणला. ते कलाकार इतको चार्मिंग होते.. की लोक वाट्टेल ते करून त्यांच्यासारखी हेअरस्टाइल, कपडे करायचे. आपला जनमानसावर प्रभाव पडावा याबद्दल चार्मर्सही दक्ष असतात. आज लोकांवर कुणाचा चार्म पडतोय?
अमिताभ बच्चन
गेली 40 वर्षं हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन यांचं या यादीत नाही, असं होऊ शकत नाही.. अमिताभ बच्चन यांचं व्यक्तिमत्व मुलींना संमोहित करणारं खरं तर नव्हतं.. पण, त्यांच्या प्रभावापासून अजतागायत दूर राहू शकलेलं नाही. आजही अमिताभ बच्चन यांची मोहिनी प्रेक्षकांवर आहेच. भेदक नजर, शालीन व्यक्तिमत्व, काव्यात्मक भाषा यामुळे त्यांचा चार्म अजूनही सगळ्या पिढ्यांवर तेवढाच आहे.
शाहिद कपूर
शाहिद कपूरचे सिनेमे फारसे चालत नाहीत. पण, त्याचा चार्म नेहमीच चालतो. मुलींमध्ये शाहिदचं फॅन फॉलोइंग तुफान आहे. शाहिदचा बोबी फेस, चॉकलेट बॉय व्यक्तिमत्व, डान्स आणि काही जुनी प्रेम प्रकरणं त्याचा चार्म अधोरेखीत करतं.
अभय देओल
केवळ ऍक्टिंगच्या आधारावर अभय देओल आपला चार्म लोकांवर पसरवू शकला. तो इतरांपेक्षा वेगळा आहे, असं सगळ्यांनाच वाटतं. पण, त्याच्याकडे बघणं प्रत्येकाला आवडतं. तो दिसतो चांगला.. साधारण तरीही वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तो आकर्षक ठरतो.
फरहान आख्तर
टॅलेंटचं भंडार असणारा फरहान आख्तर म्हणजे धमाल पॅक आहे. त्याची स्वतःची एक स्टाइल आहे.. त्याच्या बोलण्यातली हुशारी, वाक्चातुर्य त्याला चार्म बहाल करून जातं. त्याची ऍक्टिंग, गाणं, डान्स, दिग्दर्शन या सगळ्यांहूनही वेगळं म्हणजे त्याचा वावर...यामुळे फरहान चार्मिंग ठरतो
सैफ अली खान
वयाने मोठा तरी लहान मुलासारखा अवखळ, फ्लर्टी असणारा सैफ अली खान आपल्या क्युट आणि रोमँटिक असणारा सैफ अली खान बऱ्याच जणांना चार्मिंग वाटतो.. त्यांच्या बोलण्यातला रुबाब, त्याचं परदेशातील शिक्षण, त्याने आलेली एक स्टाइल, नवाबी स्टाइल घरंदाज वृत्ती यामुळे मुली त्याच्यावर भाळतात.. असा नवावी चार्म सैफ अली खानकडे आहे.
जॉन आब्रहम
जॉनचे केवळ लूक्सच त्याच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसे आहेत. मुली त्याच्या डोळ्यांमधील बेफिकिरी, गालांवरील खळी, बिनधास्त ऍटिट्यूड यामुळे मॉडेलिंगपासूनच त्याच्या फॅन्सचं प्रमाण मोठं आहे. त्यातूनही त्याची हेअर स्टाईल एकेकाळी लोकांना वेड लावून गेलेली. जबरदस्त टोन्ड बॉडी हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य.. यामुळे त्याचा चार्म जाणवत राहातो.
रणबीर कपूर
जन्मजात आपला स्वतःचा चार्म घेऊन आलेला हा मुलगा.. सिनेसृष्टीत दाखल झाल्या झाल्याच तो लोकांना आवडून गेला. सिनेमांची निवड, त्याचं कॅरेक्टर, बॉय नेक्स्ट डॉअर दिसणं, गोड वाटणारा वावर, आत्मविश्वास आणि कपूर घराण्याचा पिढीजात चार्म त्याच्याबरोबर नेहमीच असतो. त्यातही त्याची वेगवेगळी अफेअर्स त्याला चार्म मिळवून देतो.
हृतिक रोशन
परिपूर्ण हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.. ग्रीक गॉड मानल्या गेलेल्या हृतिकचा चार्म जबरदस्त आहे. त्याचे डोळे, चेहेरा, कातीव शरीर, अभिनय, अफाट नृत्यकला यांमुळे हृतिकचा चार्म अनोखा आहे. लोकांमध्ये फारसा मोकळा होऊ शकत नसला, तरी आपल्या साधेपणानेही हृतिक एक आदर्श व्यक्ती वाटतो.. त्याचा चार्म काही औरच आहे..
आमिर खान
बुद्धिमान लोकांना हा कलाकार फारच आकर्षक वाटतो. त्याचे विचार, त्याची समज, त्याचं वागणं-बोलणं या गोष्टींमुळे तो लोकांना हवा हवासा वाटतो.. मीडिय.समोर सतत आपली टिमकी वाजवणं तो करत नाही.. आपला प्रत्येक सिनेमा वेगळा असावा यासाठी तो प्रयत्नशील असतो.. वर्षातून एकच सिनेमा करत असल्यामुळे त्याच्याबद्दल वेगळंच आकर्षण निर्माण झालं आहे..
सलमान खान
सलमान खानचा चार्म गेली 20 हून जास्त वर्षं लोकांमध्ये आहे.. मुली जितक्या त्याच्यासाठी वेड्या आहेत, तेवढीच मुलंही त्याच्यासाठी जीव टाकतात. बॉलिवूडमध्ये त्याची इमेज बॅड बॉयची आहे.. त्याचं नाव खराब आहे, पण त्याचवेळी तो सगळ्यांना मदत करण्याबदंदलही प्रसिद्ध आहे. त्याची बेदरकार वृत्ती, निरागस डोळे असं वैशिष्ट्यपूर्ण कॉम्बिनेशन त्याचा चार्म वाढवतं. त्याने काहीही केलं, तरी त्याचा चार्म वेगळाच ठरतो. रोमँटिक ‘प्रेम’ असो, किंवा चुलबूल पांडे असो.. त्याच्यासाऱखी बॉडी असावी, यासाठी लोक दिवस रात्र जिम मध्ये घाम गाळत असतात.
शाहरुख खान
बॉलिवूडचा 1 नंबरचा चार्मर जर कुणी असेल, तर तो शाहरुख खान.. त्याच्यातील उत्साह, प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्व.. त्याच्याकडे ना सलमानसारखी बॉडी आहे, ना आमीरसारखी निवड.. ना हृतिकसारखं व्यक्तिमत्व.. पण त्याच्यात असं काही आहे.. की मुलं मुली त्याच्या प्रेमात पडतातच... त्याच्या गालांवरच्या खळ्या.. मधाळ डोळे.. वाक्चातुर्य इ. गोष्टींमुळे सिनेक्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांवरही त्याचा चांगलाच प्रभाव पडला आहे.. आत्मविश्वासाच्या बळावर तो दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय भागातून मुंबईत आला आणि सुपरस्टार झालाय..
/marathi/slideshow/बॉलिवूडचे-चार्मर्स_128.html