पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनाचा ताळमेळ...
बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी एकदा का वैवाहिक जीवनात प्रवेश केला की त्यांचं करिअर संपलं... असं पूर्वी समजलं जायचं... पण, आता ते दिवस गेले. सध्या अनेक अभिनेत्री आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल जीवन एकत्रच आणि तेही सुनियोजितरित्या सांभाळताना दिसतात. ऐश्वर्या राय-बच्चन, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, करिश्मा कपूर, मलाईका अरोरा-खान, काजोल अशा काही अभिनेत्रींची नावं यामध्ये घ्यायलाच लागेल. त्यांच्यापेक्षा तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकतील अशा भूमिका त्या आजही निभावताना दिसतात. त्यांचा प्रेक्षकांमधील चार्म त्यांच्या लग्नानंतरच नाही तर त्यांना मुलं झाल्यानंतरही कायम आहे. पाहुयात, याच बॉलिवूडच्या टॉप ५ ‘मम्मीज्’…
ऐश्वर्या राय-बच्चन
३९ वर्षीय अभिनेत्री... माजी मिस वर्ल्ड... अभिनेता अभिषेक बच्चन याच्याबरोबर विवाहीत... एका गोंडस मुलीची आई... १६ नोव्हेंबर २०११ रोजी आराध्याचा जन्म झाला. गरोदरपणाच्या काळात वजन वाढल्यानंतर आणि आराध्याला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्याच्या वाढलेल्या वजनावर अनेक चर्चा सुरू होत्या. या दरम्यान ती काही ठराविक वेळेसच मीडियासमोर दिसली. पण त्यानंतर तीनं आपल्या प्रोफेशनच्या सगळ्या कमिटमेंटस् पूर्ण केल्या. कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ती तिच्या वाढलेल्या वजनासह (तरिही तितकीच सुंदर) आणि चिमुरड्या आराध्यासह उपस्थित राहील. त्यानंतर ती कल्याण ज्वेलर्सच्या एका जाहिरातीतही दिसली.
शिल्पा शेट्टी
मूळची कर्नाटकच्या मंगलोरची असलेली शिल्पा ‘मंगलोरिअन ब्यूटी’ म्हणून ओळखली जाते. ‘बाझीगर’ या चित्रपटातून शिल्पानं बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल टाकलं. काहि वर्षांपूर्वी तिनं राज कुंद्रा या व्यावसायिकाबरोबर वैवाहिक जीवनात प्रवेश केला. २१ मे २०१२ रोजी तिनं ‘विआन’ला जन्म दिला. हा क्षण तिच्यासाठी तिच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा क्षण होता.
गरोदरपणानंतरही तिनं अनेकांना योगाचे धडे दिले. अत्यंत कमी काळात तिनं गरोदरपणानंतर आपलं वजन नियंत्रणात आणलं. एका मुलाची आई असलेल्या शिल्पाची स्वत:ची एक आयपीएल क्रिकेट टीमही आहे. पती राज कुंद्रासोबत तिनं राजस्थान रॉयल्स ही आयपीएल टीम विकत घेतलीय. अनेक कार्यक्रमांत ती दिसते. सध्या छोट्या पडद्यावरचा ‘नच बलिए – ५’ या एका डान्स शोची ती जज म्हणूनही दिसतेय. ‘ओले’ या सौदर्य प्रसाधनाच्या अनेक जाहीरातींतही ती झळकतेय. त्यातच ती आपल्या बाळासाठीही वेळ काढते.
मलाईका अरोरा – खान
३९ वर्षीय अभिनेत्री... बॉलिवूडमधल्या टॉपच्या ‘आयटम गर्ल’मध्ये मलाईकानं आपली छबी उमटवलीय... अरहान नावाच्या एका मुलाची आई... पण, तिच्या कमनिय कायेकडे पाहून तिला ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणंही कठिण.
२००८ साली तिनं प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिलं. आत्तापर्यंत मलाईकानं ११ ‘आयटम साँग’ना आपला डान्स तडका दिलाय. तसंच अनेक ‘रिअॅलिटी शो’ज् जज म्हणूनही तिनं काम पाहिलय. कित्येक बड्या – बड्या फॅशन ब्रॅंडसाठी तीनं रॅम्पही गाजवलंय आणि आजही गाजवतेय.
काजोल
‘ब्युटी विथ ब्रेन’... या ३८ वर्षीय अभिनेत्रीनं १९९९ साली तिचा ‘गुंडाराज’मधील सहकलाकार अभिनेता अजय देवगणसोबत विवाह केला. काजोल ही एका मुलीची आणि मुलाची आई आहे. छोट्या ‘न्यासा’ला 2003 साली जन्म दिल्यानंतर तीन वर्षांनी तिनं ‘फना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रवेश केला. या चित्रपटात आमीर खानला ती तोडीस तोड ठरली होती.
या सिनेमासाठी ‘फिल्मफेअर’चा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला पुरस्कार मिळालाय. आणि त्यानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर २०१० साली आलेल्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठीही तिला पुन्हा एकदा फिल्मफेरनं उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मान मिळाला.
करिष्मा कपूर
बॉलिवूडमधल्या बहुप्रतिष्ठीत कपूर खानदानातील ही मुलगी... चित्रपटसृष्टीत पाऊल ठेऊन तीनं तिच्या घराण्यातील मुलींनी-सुनांनी चित्रपटात काम न करण्याची जुनाट परंपरा मोडीत काढली. बालमित्र आणि व्यावसायिक संजय कपूर याच्यासोबत ती विवाहबद्ध झाली. ३८ वर्षीय करिष्मा दोन मुलांची आई आहे. मुलगी समैरा आणि मुलगा किआन यांच्यासोबत ती संसारात पुरेपूर रमलीय.
पतीसोबत निर्माण झालेल्या वितुष्टाची बरीच चर्चा मध्यंतरी ऐकायला मिळाली. पण, तिनं आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक कठिण प्रसंग बाजुला सारून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. ‘डेंजरस इश्क’मधून तिनं कमबॅक केलं. मुलाच्या जन्मानंतर करिष्मानं कमबॅक करण्यासाठी जवळजवळ २३ वजन कमी केलं होतं.
/marathi/slideshow/बॉलिवूडच्या-टॉप-५-मम्मीज्…_197.html