ब्लॅकबेरी क्यू ५
सध्या स्मार्टफोन्सनी बाजाराच नुसती गर्दी केलीय. याच स्मार्टफोनच्या गर्दीत आता आणखी एक नाव दाखल होतयं.
ब्लॅकबेरी मोबाईल कंपन्यांमधील नावाजलेली कंपनी. ब्लॅकबेरी कंपनीने नवीन `ब्लॅकबेरी क्यू ५` हा नवाकोरा स्मार्टफोन बाजारात लाँच केलाय. नवीन ऑपरेटिंग सिस्टीमबरोबरच `क्यू १०` सारखेच क्वार्टी की-पॅडही आहे. परंतु क्यू१०च्या तुलनेत याची किंमत फारच कमी म्हणजेच २४,९९० इतकी आहे.
१७ जुलैला हा फोन बाजारात उपलब्ध होतोय पण काही मोबाईल स्टोअरमध्ये आणि २० जुलैला हा सगळ्या मोबाईल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.
`ब्लॅकबेरी क्यू-५`ची सिस्टीम
`ब्लॅकबेरी क्यू-५` मध्ये ७२०x७२० रिझोल्यूशन आणि ३२८ पीपीआय़ पिक्सेल डेन्सिटी असलेली ३.१ इंचाची टच स्क्रीन आहे. यात १.२ गीगाहर्टझ ड्यूअल कोअर प्रोसेसर आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ८ जीबी फ्लॅशमेमरी आहे. मायक्रो एस डी कार्ड वापरुन आपण याची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
किती रंगात उपलब्ध
`ब्लॅकबेरी क्यू-५` मध्ये २१८० एमएएचची बॅटरी आहे. जी फोनशी जोडलेली आहे. हा फोन १०.५ मिमी स्लिम आणि १२० ग्रॅम वजनाचा आहे. हा फोन काळा, सफेद, आणि लाल रंगात उपलब्ध आहे.
कॅमेरा
या फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. ज्यात आपण १०८० पिक्सल एचडी व्हिडिओ शूट करु शकतो. यात ब्लॅकबेरी टाइम शिफ्ट मोड वापरुन परफेक्ट शॉट घेऊ शकतो.
ब्लॅकबेरी स्टोरीमेकर वापरुन आपण फोटो, व्हिडीओ आणि म्यूझिक यांना जोडून पिक्चरही बनवू शकतो.
यात २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे
नवीन अॅप्स आणि बरेच काही
आता तुम्ही ब्लॅकबेरी मेसेंजर चॅटवर व्हिडिओ चॅटही करु शकता. जरी तुम्ही तुमचा कॅमेरा सुरू ठेवला असेल अथवा ब्राऊजर चालू केला असेल तरीही तुम्ही तुमची स्क्रीनदेखील शेअर करु शकता.
ब्लॅकबेरी हबमुळे तुमचे सारे मेसेज आणि सोशल साईटवरचं संभाषण केवळ एका स्वाइपवर मिळेल. `ब्लॅकबेरी क्यू-५` मध्ये `थ्रीजी`सोबतच `फोर जी` एलटीईसुद्ध आहे.
पण, बॅडलक... अजूनतरी `फोर जी`ची सुविधा भारतात उपलब्ध नसल्यानं तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही.
/marathi/slideshow/ब्लॅकबेरी-क्यू-५_243.html