भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु
भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे पं. जवाहरलाल नेहरु. नेहरुंनी भारताचं नेतृत्व केलं. देशाच्या प्रगतीसाठी पंचवार्षिक योजना भारतात अमलात आणली.
सरदार वल्लभभाई पटेल
सरदार वल्लभभाई पटेल हे देशातलं असं नाव आहे, ज्यांनी पारतंत्र्यकाळातच नाही तर स्वातंत्र्यानंतरही देशाच्या प्रगतीत मोलाची कामगिरी बजावली. अनेक संकटातून देशाला सावरणाऱ्या पटेलांना `लोह पुरुष` नाव साजेसंच आहे. सरदार पटेल हे देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते.
इंदिरा गांधी
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांच्या `गरिबी हटाओ` या नाऱ्यामुळे ग्रामीण मतं काँग्रेसकडे वळली. अत्यंत प्रतिभाशील अशा या पंतप्रधान होत्या.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
डॉ. अबुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम हे देशाचे ११वे राष्ट्रपती. तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये १५ ऑक्टोबर १९३१ला त्यांचा जन्म झाला. अॅरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या डॉ. कलामांच्या नेतृत्वातच `पृ्थ्वी` आणि `अग्नी` सारख्या देशाचं नाव उंचावणारी क्षेपणास्त्र भारतानं बनवली.
मदर टेरेसा
मदर टेरेसा या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. २६ ऑगस्ट १९१० ला अल्बानिया इथं त्यांचा जन्म झाला. इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की आपल्याला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.
सत्यजित रे (मे २, इ.स. १९२१ - एप्रिल २३, इ.स. १९९२ )
सत्यजित रे हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी इ.स. १९५५मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचा शहेनशहा म्हणून बिग बी अमिताभ बच्चन यांना ओळखलं जातं. १८० पेक्षा जास्त हिट चित्रपटांची नावं अमिताभ बच्चन यांच्या नावासोबत जोडली गेलेली आहेत. अष्टपैलू अभिनेते म्हणजे बिग बी. बॉलिवूडमधील त्यांच्या कामाबद्दल त्यांना १९८४मध्ये `पद्मश्री` आणि २००१मध्ये `पद्मभूषण` पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर
संगीत क्षेत्रातलं हे असं नाव ज्यांना स्वरसम्राज्ञीचा खिताब मिळाला. सर्वाधिक गाण्यांचं पार्श्वगायन करण्याचा रेकॉर्ड लतादीदींच्या नावं आहे.
सचिन तेंडुलकर
सचिन रमेश तेंडुलकर एक क्रिकेटर. सचिन भारतातलाच नाही तर आताचा जगातला सर्वात श्रेष्ठ क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. सचिनला मास्टर ब्लास्टर असं संबोधलं जातं. वयाच्या १६व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या सचिनच्या नावं अनेक रेकॉर्ड्स आहेत. राजीव गांधी `खेलरत्न` पुरस्कार, `पद्मभूषण` सारख्या पुरस्कारांनी सचिन सन्मानित आहे.
रतन टाटा
भारतातले एक नामवंत उद्योगपती रतन टाटा. १९९१पासून तर २८ डिसेंबर २०१२पर्यंत त्यांनी टाटा उद्योग समूहाचं संचालक पद भूषवलं. २००८मध्ये त्यांनी `पद्मविभूषण` पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
नारायण मूर्ती
भारतातले एक प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती. १९८१मध्ये केवळ सहा आयटी प्रोफेशनल्ससह त्यांनी `इन्फोसिस` या आयटी कंपनीचा पाया रचला आणि आज कंपनीला जागतिक स्तरावर पोहोचवलं.
/marathi/slideshow/भवितव्य-घडवणारे-भारतीय-व्यक्ती_254.html