भारतातील रिटेल क्षेत्रातील प्रगती
तुम्हाला शॉपिंग करायची आवड असेल तर तुम्हाला शॉपिंगची बेस्ट ठिकाणंही नक्कीच माहित असतील... किरकोळ व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यापेक्षा तुम्ही शॉपिंग मॉल किंवा एकाच ठिकाणी अनेक वस्तू मिळत असतील अशी ठिकाणच आपण निवडतो... सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झालं तर, ज्या ठिकाणी अनेक गृहपयोगी आणि इतर वस्तूंची थेट ग्राहकांना विकले जातात, अशा विक्रेत्यांना रिटेलर्स म्हणतात.
भारतात रिटेल क्षेत्र नुकतंच कुठे मूळ धरू लागलंय. २००६ ते २०१० या वर्षांमध्ये भारताच्या रिटेल क्षेत्राचा प्रगतीचा दर होता १३.३ टक्के. या काळात भारताची अर्थव्यवस्था, उच्च वर्गीय आणि मध्यम वर्गांमध्ये सतत होणारी वाढ, व्यवसाय क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग या सगळ्या गोष्टी रिटेल क्षेत्राच्या पथ्यावर पडल्या.
गेल्या १०-१२ वर्षांमधल्या रिटेल क्षेत्राच्या कामगिरीवर लक्ष दिलं तर ‘खाद्यपदार्थ आणि किराणा’ हा रिटेलमधला एक भाग सगळ्यात जास्त तेजीत असलेला दिसून येतो. तर दुसरा क्रमांक लागतो ‘कपडे आणि पादत्राणां’चा… मनोरंजन, पुस्तकं आणि खेळाच्या वस्तूंचा तिसरा क्रमांकावर स्थान मिळवलंय.
चला तर एक नजर टाकुयात भारतातल्या टॉप १० रिटेलर्सवर
पॅन्टलून्स रिटेल
पॅन्टलून्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कपड्यांचा सेगमेंट... पण, पॅन्टलून रिटेलमध्ये मात्र अनेक गोष्टींचा समावेश आहे. पॅन्टलून्स (कपडे), होम टाऊन, बिग बाझार, फूड बाजार, ई झोन अशा अनेक प्रकारांचा त्यात समावेश आहे. फ्यूचर ग्रुपचा एक भाग असलेल्या पॅन्टलून्स रिटेलनं देशातील १६ मिलियन स्क्वेअर फूटची जागा व्यापलीय. पॅन्टलून्स रिटेलचे देशातील ७३ शहरांत जवळजवळ १००० स्टोअर्स आहेत. सुमारे ३० हजार लोक इथं काम करतात. २००१ मध्ये स्थापन करण्यात आलेलं ‘बिग बाजार’ देशातील पहिलं सुपरमार्केट ओळखलं जातं. पॅन्टलून्स रिटेलचा वार्षिक उलाढाल १२,५०० करोड रुपयांच्या घरात आहे.
के. रहेजा ग्रुप
के. रहेजा ग्रुपनं २००१ साली ‘शॉपर्स स्टॉप’ या देशातील पहिल्या डिपार्टमेंटल स्टोअरची स्थापना केली. ‘इंटरकॉन्टिनेंटल ग्रुप ऑफ डिपार्टमेंटल स्टोअर्स’चा (IGDS) हा ग्रुप भारतातील एकमेव सदस्य आहे. एअरपोर्ट रिटेलिंगसाठी रहेजानं नेचर ग्रुपबरोबर ५०:५० ची भागीदारी केलीय. शॉपर्स स्टॉपची भारतात एकूण १७ शहरांत जवळजवळ ३९ स्टोअर्स आहेत. २.०५ मिलियन स्क्वेअर फिट इतकी जागा रहेजा रिटलर्सनं व्यापलीय.‘होमस्टॉप’च्या माध्यमातून रहेजा ग्रुपनं रिटेल क्षेत्रात एक नवा पायंडा पाडलाय. इथं डेकोरेटेड फर्निचर, खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू, मनोरंजनाच्या वस्तू, इलेक्टॉनिक – हायटेक अशा सगळ्या वस्तू इथं तुम्हाला पाहायला मिळतील. क्रासवर्ड बूक स्टोअर्स, मदरकेअर आणि अर्ली लर्निंग सेंटर (ELC), टाईमझोन एन्टरटेन्मेंट हे काही महत्त्वाचे भाग... रहेजा ग्रुपची वार्षिक उलाढाल १५७० करोड रुपयांच्या घरात असते.
टाटा ग्रुप
१९९८ मध्ये रिटेल क्षेत्रात उतरलेल्या टाटा ग्रुपनं वेस्टसाईड, लाईफस्टाईल, स्टार इंडिया बाजार अशी रिटेल स्टोअर्सची साखळीच देशभरात निर्माण केली. २००५ मध्ये भारतातील पुस्तक आणि संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा रिटेलर होण्याची संधी या ग्रुपला मिळाली. ‘टाटा’नं आणखी एक उपविभाग म्हणून ‘इन्फिनिटी’ची निर्मिती केली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रिसाठी ओळखलं जाणारं ‘क्रोमा’ हा त्याचाच एक भाग. टायटन इंडस्ट्रीज, टायटन हा घड्याळांचा स्वत:चा ब्रँड तसंच ‘तनिष्क’ हे ज्वेलरी ब्रँड... हे आणखी काही टाटाचे उपविभाग... टाटा ग्रुपची वार्षिक उलाढाल डिसेंबर २०१० मध्ये होती १९७.१३ करोड रुपये.
आरपीजी ग्रुप
संघटीत रितीनं खाद्यपदार्थ आणि किराणा मालामध्ये बाजारात पहिल्यांदा प्रवेश करणाऱ्यांपैकी हा एक ग्रुप. १९९६ साली सुरू केलेल्या फूडवर्ल्डच्या माध्यमातून आरपीजी ग्रुपनं बाजारात प्रवेश केला. अल्पावधीतच ‘डेअरी फार्म इंटरनॅशनल’ला सोबतीला घेऊन या ग्रुपनं ‘हेल्थ एन्ड ग्लो’ ची काही फार्मसी आणि ब्युटी केअर्सची स्टोअर्स उभारली. आता सध्या दोन्ही ग्रुप्स वेगळे झालेत. आरपीजीनं आता ‘म्युझिक वर्ल्ड स्टोअर्स’च्या माध्यमातूनही आपली ओळख निर्माण केलीय.
लॅन्डमार्क ग्रुप
१९९८ साली लॅन्डमार्कनं भारतात आपलं बस्तान मांडलं. सध्या लॅन्डमार्क ग्रुपची रिटेल क्षेत्रातील जवळजवळ १०० स्टोअर्स भारतभर पसरलीयत. होम सेंटर, सेंटरपॉईंट, बेबीशॉप, स्प्लॅश, शू मार्ट, लाईफस्टाईल, मॅक्स, लाईफस्टाईल डिपार्टमेंटल स्टोअर्स, फूडमार्ट, फन सिटी, फिटनेस फर्स्ट, सिटीमॅक्स इंडिया हा सगळा लॅन्डमार्कचाच रिटेल क्षेत्रातला विस्तार. उत्पन्न ३.८ बिलियन डॉलर
भारती वॉलमार्ट
‘वालमार्ट’बरोबर ‘भारती’नं 50-50 टक्केच्या भागीदारीत रिटेल क्षेत्रात धडाक्यात सुरुवात केली. भारतात रिटेल क्षेत्रात आपल्या स्टोअर्सची साखळी तयार करण्यासाठी तब्बल सात बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊन भारती वॉलमार्टनं 100 हायपरमार्केटस् देशभरात निर्माण करयचा बेत आखलाय.
रिलायन्स
रिलायन्स कंपनीनं देशभरात 560 रिलायन्स फ्रेश स्टोअर्स निर्माण केली आहेत. त्याचसोबत ‘रिलायन्स मार्ट हायपरमार्ट’ही स्थापन करण्यात आलंय. महत्त्वकांक्षी रिलायन्सला असेच काही हायपरमार्ट दिल्ली, हैद्राबाद, विजयवाडा, पुणे आणि लुधियाना या काही महत्त्वाच्या शहरांत निर्माण करायची आहेत. यावर्षीचा रिलायन्सचा टर्नओव्हर होता तब्बल 4500 करोड रुपयांचा.
ए व्ही बिर्ला ग्रुप
लुईस फिलिप, व्हॅन हुसेन, एलन सॉली, पिटर इंग्लंड, ट्राऊजर टाऊन इत्यादी ए व्ही बिर्ला ग्रुपचे काही अग्रेसर ब्रँड सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. मदुरा गारमेंट हाही आदित्य बिर्ला ग्रुपचाच एक भाग... साऊथ, ट्रायनेथ सारख्या रिटेल चेन स्टोअर्सचा ताबा मिळवून आता बिर्ला ग्रुपनं भारतभर या स्टोअर्सची संख्या जवळजवळ 400 स्टोअर्सपर्यंत वाढवण्यात यश मिळवलंय. ‘मोअर’ हे सुपरमार्केट आणि हायपरमार्केटही बिर्ला ग्रुपच्याच मालकीचं आहे. देशभरात या सुपरमार्केटची संख्या आहे 600 तर हायपरमार्केटस् आहेत नऊ... आदित्य बिर्ला ग्रुपची वार्षिक उलाढाल आहे 1700 करोड रुपयांची.
मेट्रो
‘कॅश एन्ड कॅरी’ ही संकल्पना भारतात पहिल्यांदा सुरू केली ती ‘मेट्रो’नं. 2003 साली बंगलोर शहरात दोन डिस्ट्रीब्युशन सेंटर्सची स्थापना करून मेट्रोनं भारतात रिटेल क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलं. कमी किंमतीत वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक मेट्रोकडे जरुर वळतात. सध्या, बंगलोर, हैद्राबाद, कोलकाता आणि मुंबई या शहरांत मेट्रोचे सहा ‘कॅश एन्ड कॅरी’ सेंटर्स सुरू आहेत.
विवेक लिमिटेड
इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहपयोगी वस्तूंसाठी ओळखलं जाणाऱ्या ‘विवेक लिमिटेड’नं भारताच्या दक्षिण भागात 44 स्टोअर्स स्थापन केलेत. यासाठी जवळजवळ 1,75,000 स्क्वेअर फूट भूभाग या ग्रुपनं रिटेल क्षेत्रासाठी वापर केलाय. विवेक लिमिटेडचा वार्षिक टर्नओव्हर आहे तब्बल 400 करोड रुपयांचा... त्यामुळेच ‘विवेक’ हा ब्रँड आता घराघरांत पोहचलेला दिसून येतो. भविष्यात आणखी 50 स्टोअर्स स्थापन करण्याचा विवेक ग्रुपचा मानस आहे.
/marathi/slideshow/भारतातील-टॉप-१०-रिटेलर्स_116.html