नॉर्मन पिचर्ड
नॉर्मन पिचर्डची कारकीर्द थोडी वादग्रस्त. थोडी रहस्यमय ठरली. रेकॉर्ड पुस्तकांप्रमाणे ब्रिटीश संस्कृतीत वाढलेला नॉर्मन हा खरातरं भारतीय अॅथलिट. देशाकडून ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय. त्यामुळेच देशासाठी पदक मिळवणारा तो पहिला व्यक्ती गणला जातो.
त्याने १९०० मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या २०० मीटर ‘डॅश’ आणि २०० मीटर हर्डल्समध्ये दोन रजत पदक मिळवले. पण, काही लोक असाही दावा करतात की नॉर्मन याने कधी भारताचं प्रतिनिधित्व केलंच नाही. तो ब्रिटीश नागरिक असून फक्त भारतात राहत होता. तसंच १९०० मध्ये पॅरिस गेम्ससाठी त्याची निवड ग्रेट ब्रिटनचं प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली होती.
खाशाबा जाधव – एक विस्मृतीतील हिरो
स्वतंत्र भारताचा पहिला ऑलिम्पिक विजेता म्हणून खाशाबा दादासाहेब जाधव या मराठमोळ्या तरुणाला ओळखलं जातं. १९५२ साली हेलसिंकीमध्ये झालेल्या खेळात त्यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं पण त्यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली होती. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीच त्यांना सरकारी उदासीनतेला आणि वित्तीय संकटांना तोंड द्यावं लागलं होतं.
लहान वयातच खेळाडू वृत्तीचे वडील आणि मोठ्या चार भावांच्या सहवासात त्यांना खेळाची आवड निर्माण झाली होती. १९४८ सालच्या ऑलिम्पिक खेळानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. या प्रवासासाठी झालेला सगळा खर्च त्यांच्या मित्र, शुभचिंतक आणि शिक्षकांनी केला. २३ जुलै १९५२ साली त्यांनी कॅनडा, मॅक्सिको आणि जर्मनीच्या कुस्तीपटुंना हरवून कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. त्यांनी घडवलेल्या या इतिहासाची पुनरावृत्ती फक्त १९९६ साली पुन्हा एकदा घडली. खाशाबा जाधव यांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये के. डी. जाधव यांच्या नावानं एक आखाडा बांधण्यात आला आहे.
लिएंडर पेस
चार दशकांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर लिएंडर पेसनं अटलांटा ऑलिम्पिकच्या पदक प्रस्तुती सोहळ्यात तिरंगा फडकवला. पहिल्याच खेपेत त्यानं ब्राझीलच्या फर्नांडो मेलिंगेनीला मागे टाकून लॉन टेनिसमध्ये कांस्य पदक पटकावलं. मात्र फायनलमध्ये पोहचण्याचं त्याचं स्वप्न अमेरिकेच्या आंद्रे आगासीमुळं भंग पावलं. अर्थातच यावेळी आंद्रे आगासीनं गोल्ड मेडल पटकावलं.
पण, खुद्द आगासी पेसबद्दल बोलताना ‘न संपणाऱ्या ऊर्जेचा स्त्रोत’ म्हणून त्याचा उल्लेख करतो. १९९१ मध्ये भारताकडून ऑलिम्पिकची मशाल वाहून नेण्याचं मानाचं स्थान पेसनं भूषवलं.
कर्णम मल्लेश्वरी
कर्णम मल्लेश्वरी. मुळची आंध्रपदेशातली. वेटलिफ्टर. २००४ मध्ये सिडनीत पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये मल्लेश्वरी व्यक्तिगत श्रेणीत ऑलिम्पिक मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
११० किलो स्नॅच तसंच क्लीन अॅन्ड जर्क प्रकारात 130 किलो वजन तिनं एका झटक्यात उचललं. ११९५ साली मल्लेश्वरीनं ११३ किलोवजन उचलून तिच्या गटातील (५४ किलो) विश्व वेटलिफ्टरचा किताब पटकावला.
राज्यवर्धन सिंह राठोड
2004 साली अथेंस खेळांमध्ये पुरुष डबल ट्रॅपमध्ये राज्यवर्धन सिंह राठोडनं रौप्य पदक जिंकलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातलं सर्वात चांगलं व्यक्तिगत खेळाचं प्रदर्शन त्यानं करून दाखवलं. त्याच्या या कर्तृत्वामुळे तो भारतीय सेनेचा एक चेहरा आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला.
मुळचा राजस्थानचा असलेल्या राठोडची रुची होती क्रिकेटमध्ये पण, नशिबानं त्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये पोहचवलं आणि इथूनच तो शूटर म्हणून नावारुपाला आला.
सुशील कुमार
एका ड्रायव्हरचा मुलगा, २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं मानाचं स्थान पटकावून फक्त आपल्या वडिलांचंच स्वप्न पूर्ण केलं नाही तर कुस्तीच्या मैदानात त्यानं आपली एक कायमचीच छाप सोडली. कझाकिस्तानच्या स्पिरिडोनोव्हला ३:1 नं पझाडत त्यानं कांस्य पदक पटकावलं.
भारतासाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला कारण तब्बल 56 वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये पदक मिळालं होतं. 2010 मध्येही मोस्कोच्या जागतिक कुस्तीस्पर्धेत सुवर्ण पदकं जिंकून सुशील कुमारनं आपले कारनामे सुरुच ठेवले.
अभिनव बिंद्रा
अभिनव बिंद्रा हा भारताला ‘सुवर्णपदक’ मिळवून देणारा पहिला भारतीय ठरला. त्यामुळे त्याचं नाव भारताच्या इतिहासात सर्वात उच्चस्थानी आहे. २००८ साली झालेल्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटरच्या एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळवून तो वर्ल्ड चॅम्पियन बनला. सदा हसतमुख असणाऱ्या बिंद्रानं आपल्या कर्तृत्वानं अनेक बक्षिसं आणि पुरस्कार प्राप्त केले आहेत.
विजेंदर सिंग
उंच आणि रुबाबदार दिसणाऱ्या या तरुणानंही भारताकडून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं. आणि भारतीय मीडियातर्फे एरवी फक्त क्रिकेटपटुंना दिली जाणारी प्रसिद्धी त्यानं आपल्याकडे खेचून आणली. जाहिरातींमध्येही क्रिकेटपटुंना पर्याय म्हणून विजेंदरचा चेहरा दिसू लागला.
२००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये इक्वाडोरच्या गाँगोरा मर्कोडोला हरवून कांस्य पदक पक्कं केलं. ग्लॅमर जगातल्या त्याच्या वावरामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना त्यानं २००९च्या मिलानमध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशीपमध्येही कांस्य पदक पटकावून तोंडावर पाडलं.
हॉकी : भारताचा सुवर्ण खेळ
ऑलिम्पिकमध्ये साऱ्या जगाला भारताची दखल घ्यायला लावली ती ‘हॉकी’ या खेळानं... तब्बल 28 वर्षं समर ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमनं आपला विजय अबाधित ठेवला. अर्थातच भारतीय खेळ जगतात या टीमनं मानाचं स्थान पटकावलं. या टीमची साऱ्या जगानंच धास्ती घेतली होती. ब्रिटीश टीम तर फक्त घरच्या मैदानातच भारतीय टीमच्या समोर यायची. हॉकीनं भारताला आजवर 11 ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली आहेत.
यामध्ये 8 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. संपूर्ण जगात आजही ध्यानचंद आणि त्यांची टीम ‘हॉकी स्टीकच्या जोरावर जादू घडवणारी टीम’ म्हणून ओळखली जाते. आपल्या कार्यकालात त्यांनी भारताची सगळ्या जगासमोर ‘बिनतोड’ अशीच प्रतिमा निर्माण केली होती.
/marathi/slideshow/भारताने-जिंकलेली-पदकं_102.html