बॉलिवुडचा अविस्मरणीय प्रवास
सिनेमा आणि भारत यांचं घट्ट नातं आहे जसं एका आईचं आपल्या मुलाशी नातं असतं. जगातील दोन सिनेमा इंडस्ट्रीपैकी एक असलेली बॉलिवुड इंडस्ट्रीने आपल्या सिनेमा आणि अष्टपैलु कलाकारांमुळे एक जगात विशेष स्थान निर्माण करू शकली आहे. ३ मे २०१३ ला भारतीय हिंदी सिनेमाची शताब्दी साजरी करताना, ब्लॉकबस्टरवर हिट ठरलेल्या सिनेमांची एक झलक पाहूयात ज्याच्या आठवणी आजही प्रत्येक भारतीयाच्या ह्रद्यात चिरंतर आहेत.
मदर इंडिया (१९५७)
महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर भाष्य करणारा हा सिनेमा १९५७ साली प्रदर्शित झाला होता. महिला हा प्रेक्षक वर्ग लक्षात ठेवून बनवलेल्या या सिनेमाने त्या काळी सिनेमा जगतातले सगळे रेकॉर्ड तोडले होते. नरगीस आणि सुनिल दत्त अशी हिट जोडी असलेल्या या सिनेमाची सर्वोत्तम बॉलिवुड सिनेमांमध्ये गणना केली जाते.
मुघल- ए- आझम (१९६०)
१९६० सालचा हा सिनेमा पुरातन महाकाव्याचे दर्शन घडवून आणतो. के. असीफ दिग्दर्शित या सिनेमामध्ये एक प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५० वर्ष लोटली तरी जब प्यार किया तो डरना क्या यांसारखी गाणी आणि मधुबालाचे मोहक सौंर्द्य आजरामर झालयं.
गाईड (१९६५)
त्याकाळी टाईम मासिकाने सर्वोत्तम बॉलिवुड सिनेमांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर उचलून धरलेला हा सिनेमा त्यावेळी सुपर डुपर हिट ठरला होता. देव आनंद आणि वाहिदा रेहमान हे भारतीय सिनेमाचे अष्टपैलू कलाकार समजले जातात. तब्बल ४० वर्षानंतर ह्या सिनेमाच २००७ च्या कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये चित्रीकरण करण्यात आले.
छुपके छुपके (१९७५)
धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि शर्मिला टागोर यांचा अभिनय असलेला हा सिनेमा कॉमेडीची सफर घडवून आणतो. प्राध्यापक परिमल त्रिपाठी प्रेमळ पात्र अजूनही लोकांच्या आठवणीत आहे.
दीवार (१९७५)
अमिताभ बच्चन आणि साक्षी कपूर यांच अभिनय आणि यश चोप्राचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा ७०च्या दशकातल्या कुत्सित राजकारणाची ओळख करून देतो. अमिताभ बच्चनला एँग्री यंग मॅनच्या नावाने ओळख मिळवून देणाऱ्या या सिनेमाने १९७५ साली बॉक्सऑफिसवर खूप पैसे कमवले.
शोले (१९७५)
गब्बर, धन्नो असे शब्द उच्चारतायं शोलेची आठवण आल्याशिवाय राहवत नाही. ऍक्शन पॅक असलेला सिनेमा त्याच्या डायलॉग्जमुळे संगळ्यांच्या चांगल्याच लक्षात राहिला आहे. ‘ये हाथ मुझे दे दे ठाकूर’… ‘बसंती इस कुत्तो के सामने मत नाचना’....’अरे ओ सांबा कितने आदमी थे?’...हे डायलॉग आजही लोकांच्या मुखात आहेत.
डॉन (१९७८)
१९७८ साली रिलीज झालेला हा सिनेमा खूप हिट झाला होता. आतंकवादी विश्वातल्या अतिमहत्वाच्या माणसांवर चित्रित करण्यात आलेला आणि अमिताभ बच्चनचा अभिनय असलेल्या या सिनेमाचं रिमेक आणि सिक्वेल तेवढाचं हिट ठरला.
मिस्टर इंडिया (१९८७)
मोग्मॅबो खुश हुआ...ह्या डायलॉगने अमरेश पुरीला एक नवी ओळख निर्माण करून दिली. अनिल कपूर आणि श्रीदेवी या जोडीने दर्शकांना हा सिनेमा पाहण्यास भाग पाडले.
कयामत से कयामत तक (१९८८)
आमीर खान आणि जुही चावला यांचा पहिलाचं सिनेमा होता. १९८८ साली प्रदर्शित झालेली ही लव्हस्टोरी बॉक्सऑफिसवर चांगलीच गाजली. हा सिनेमा त्याकाळी एवढा गाजली की या सिनेमातील प्रमुख कलाकार रातोरात चमकले.
अंदाज अपना अपना (१९९४)
आतापर्यंतचा सर्वात जास्त चांगला विनोदी चित्रपट. सलमान खान, अमीर खान, रविना टंडन आणि करिश्मा कपूर यांचा अभिनय असलेला हा सिनेमा त्यातील गाण्यांमुळे सर्वात जास्त हिट झाला.
हम आपके है कोन? (१९९४)
प्रत्येक मुलीची आपल्या जोडीदाराबद्दल काही अपेक्षा किंवा स्वप्न असतात. त्या स्वनानां कॅमेरात बंद करण्यासाठी हम आपके है कोन?.... हा सिनेमा महत्वाचा ठरला. यातील १४ गाणी लोक आजही गुणगुणत असतात.
दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे(१९९५)
यश चोप्राचं दिग्दर्शन असलेली ही प्रेमकहाणी आजही लोकांच्या ह्रद्यात ताजी आहे. राज आणि सिमरन ह्या पात्रांना प्रत्येक प्रेमी युगलं आपला प्रेमाचा आराध्या देवत मानतो.
दिल चाहता है (२००१)
दिल चाहता है या चित्रपटाबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडतात. या सिनेमाच्या माध्यमातून सगळ्या मानवी भावनांना वाचा फोडण्यात आली. मग ती मैत्री असो किंवा प्रेम.
लगान (२००१)
ब्रिटीशांचे राज्य असलेल्या भारतातल्या शेतकऱ्यांची द्यनीय व्यथेवर भाष्य करणारा मिस्टर परफेक्शनिस्टचा सिनेमा लाखो लोकांच्या ह्रद्यात आजही जिवंत आहे. ह्या सिनेमाला ऑस्करचे नामांकन ही मिळाले होते.
मुन्नाभाई एम.बी.बी.एस(२००३)
संजय दत्तमधल्या अभिनेत्याला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसमोर आणणार सिनेमा म्हणजे मुन्नाभाई एम.बी.बी.एस. हा सिनेमा प्रेक्षकां शेवटपर्यंत हासवत राहतो.
रंग दे बसंती (२००६)
आमीर खानचा खूप जास्त गाजलेला सिनेमा म्हणजे रंग दे बसंती.या सिनेमानेही त्याच्या लाखो प्रेक्षकांचे ह्रद्य जिंकले
चख दे इंडिया (२००७)
भारतीय खेळ महिला हॉकीला एर वेगळं रूप देण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेला सिनेमा म्हणजे चख दे इंडिया. शाहरूख खानच्या अभिनयाची वेगळी झलक दाखवणाऱ्या सिनेमांपैकी एक सिनेमा.
३ इडियट्स (२००९)
चेतन भगतच्या पुस्तकावर आधारीत सिनेमा तरूण वर्गाने मोठ्या प्रमामावर उचलून धरला. शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर हा सिनेमा भाष्य करतो.
दबंग (२०१०)
दबंग या नावाने सलमानला प्रसिद्धी मिळवून देणारा सिनेमा म्हणजे दबंग. २०१० साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्यातील चुलबुल पांडे या पात्रामुळे प्रसिद्ध झाला.
दि डर्टी पिक्चर (२०११)
सिल्क स्मिताच्या खऱ्या आयुष्याचे चित्रण करणारा सिनेमा म्हणजे दि डर्टी पिक्चर. विद्या बालन, नसरुद्दीन शहा, तुषार कपूर, इम्रान हाश्मी यां सर्वांनी आपल्या अभिनयाची कौशल्य या सिनेमातून पणाला लावली.
/marathi/slideshow/भारतीय-हिंदी-सिनेमाची-शताब्दी-साजरा-करताना_220.html