उद्या जागतिक मातृ दिन..आई आणि तिच्या लेकराचं एक गोडं नातं असतं त्याचं नात्याला आणि आईच्या मायेला विशेष स्थान असणारा दिवस म्हणजे जागतिक मातृ दिन...मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही घेऊन आलोय आपल्यासाठी बॉलीवूडच्या पाच गाण्यांची मेजवानी...
मेरी माँ (तारे जमीन पर)
दर्शिल सफारीवर चित्रित केलेलं `तारे जमीन पर` या चित्रपटातील हे गाणं त्याच्या प्रेक्षकांना रडवल्याशिवाय राहवत नाही..शंकर महादेवनने गायलेले ह्या गाण्यांना खूप पुरस्कार जिंकले...
लुका छुपी (रंग दे बसंती)
लता मंगेशकर यांचा आवाज त्याला एआर रहमानचे संगीत असलेले लुका छुपी हे गाण्याने लाखो लोकांची ह्रद्ये वितळवली...`रंग दे बसंती` या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले...
ए माँ तेरी सुरत (दादी माँ)
`ए माँ तेरी सुरत` हे गाणं एका आईचे हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभे करते...`ए माँ तेरी सुरत` हे गाणं १९६६ साली रिलीज झालेल्या दादी माँ या सिनेमातलं आहे...
मम्मा (दसविदानिया)
विनय पाठक अभिनित `दसविदानियाँ` सिनेमा त्यातील `मम्मा` या गाण्यामुळे जास्त हिट झाला..आई आणि मुलाच्या नात्यातील गोडवा या गाण्यातून उत्तम प्रकारे उतरवला आहे...
तू कितनी अच्छी है (राजा और रंक)
`तू कितनी अच्छी है` हे गाणं १९६८ साली रिलीज झालेला राजा और रंक या सिनेमातील आहे. लता मंगेशकर यांचा आवाज असलेला हे गाणे भरपूर लाखो लोकांच्या आठवणीत अजूनही जिवंत आहे.