तरंगता माऊस
ऑफिसमध्ये जास्त वेळ घालविणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ऑफिसमधील निम्मे लोक हे संगणकावर (कॉम्प्युटर) काम करत असतात. संगणकाच्या समोर काम करताना हातात नेहमी माऊस असतो. या माऊसला आता हात लावावा लागणार नाही. तसेच तो तुमच्या टेबलावर दिसणार नाही. त्यामुळे माऊससाठी हाताचा वापर करावा लागणार नाही. हा माऊस हवेत तरंगता राहणार आहे. चेक रिपब्लिकची राजधानी प्रागमध्ये या माऊसचे डिझाईन करण्यात आलेय. हा माऊस लवकरच बाजारात येईल, असे सांगण्यात येत आहे.
माऊसचे नाव ‘बॅट’
हा हवेत तरंगता माऊस प्राग येथील किबार्डिनडिजाइन स्टुडिओमध्ये बनविण्यात येत आहे. या माऊसचे नाव ‘बॅट’ असे ठेवण्यात आले आहे. या माऊसची खासियत आहे की, हा टेबलावर न राहता तो टेबलापासून ४० मीमी हवेत उंचीवर तरंगता राहिल.
१० मीमी हवेत
ज्यावेळी तुम्ही काम करत राहाल, त्यावेळी बॅट माऊसवर हात ठेवाल त्याचवेळी तो १० मीमी हवेत उंचीवर असेल. तो तगंताच राहून आपले काम करील. हा माऊस सामान्य माऊस प्रमाणे काम करेल.
कसं चालणार काम
हा माऊस कसा काम करणार? या माऊसबरोबर एक पॅड असेल. हे पॅड संगणकाला जोडले जाईल. त्याप्रमाणे संगणकासाठी काम करणारा माऊस हा सामान्य माऊस असेल. जोडण्यात येणाऱ्या पॅडबरोबर तो माऊस असेल. या माऊसच्या खाली मॅग्नेटिक रिंग लावलेली असेल. या रिंगमुळे हा माऊस पॅडपासून थोडा वर असेल आणि तो तरंगता राहिल. मात्र, असे असले तरी या माऊसची किंमत ठरविण्यात आलेली नाही. हा माऊस पांढरा आणि काळ्या अशा दोन रंगात असणार आहे.
त्रास वाचणार
ऑफिसमध्ये संगणकावर काम करताना माऊसचा वापर होत असतो. माऊसचा वापर सारखा केल्याने टेबलावर हात घासला जातो शिवाय बोटांनाही त्रास होतो. या त्रासातून आपली सुटका होणार आहे. जास्तवेळ माऊसचा वापर केल्याने कार्पल टनल सिंड्रोमची आपण शिकार होण्याचा जास्त धोका असतो. तसेच संगणकावर काम करताना जास्तवेळ टेबलवर हाथ ठेवणे चुकीचे आहे. मात्र, काम करताना टेबलावरील हात हटविणे शक्य नसते. मात्र, बॅट माऊस आपल्याला यातून सुटका देईल. त्यामुळे आपण आता निर्धास्त राहा आणि चांगले काम करू शकता.
/marathi/slideshow/माऊस-तरंगणार-हवेत_206.html