इफ्तारची धूम
मुंबईत ठिकठिकाणी रमजानचा उत्साह दिसून येतोय... खास करून खवय्यांसाठी ही एक पर्वणीच ठरते. मुंबईमधील काही आकर्षक ठिकाणी जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मांसाहारी खाद्यप्रकाराचे भोजन अनेकांच्या आवडीचं...
ज्या ठिकाणी भेजाफ्राय, कालेजी, गुरदासारखे अनेक मांसाहारी पदार्थ उपलब्ध आहेत, त्यांचा आस्वाद तर घ्यायलाच हवा... पाहुयात अशीच काही खाद्यपदार्थ....
नल्ली नहारी आणि चिकन हाकिमी
भेंडी बाजार जवळ असणारे नूर मोहम्मदी हे एक ऐतिहासिक हॉटेल असून तेथे उत्तम नहारी मिळते. तेथे लेगपीस (मटण बॉन्स) आणि त्यांचा रस्सा हे अतिशय चांगले मिळते.
त्या हॉटेलमध्ये अनेक अभिनेते जातात.तेथे संजय दत्त आणि एम. एफ. हुसेन यांनी भेट दिली आहे.
किंमत – मटण नहारी- ८० रुपयांपर्यत मिळेल. त्याचबरोबर व्हाईट बिरीयानी आणि चिकन हाकिमी हेदेखील ७५ रुपयांपर्यत मिळते.
बारा हंडी
जो व्यक्ती मटण प्रेमी आहे आणि ज्याला नवीन काहितरी खाण्यांची आवड असेल तर त्याने सुरती बारा हंडी या हॉटेलमध्ये जावे.तेथे ७५ वर्ष जूने असणारे गुलाम मुस्ताफा सोरती हे अतिशय उत्तम अशी डिश लोकांना पुरवितात.त्यात छोटा, बडा पाया तसेच गोमांसचा रस्सा अतिशय उत्तम मिळतो.
कबाब भेजाफ्राय
नागपाड्यापासूनजवळ असणाऱ्या `सारावी` हे बीफ सीक कबाबसाठी अतिशय प्रसिध्द आहे आणि तिथुनच जवळपास असणाऱ्या म्हणजे नागपाडाच्याविरूध्द दिशेला असणारे एक रेस्टॉरंटही खूप प्रसिधद आहे. इथलं भेजा, खिमा आणि गुरदा हे पदार्थ चांगलेच प्रसिद्ध आहेत.
रूमाल रोटी
अर्थातच रूमाल रोटी ही आपण प्रत्येक डीशबरोबर आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. ही अतिशय प्रसिद्ध रोटी आहे.
हैदराबादी हारीश
ही परांपरागत डीश नागपाडा येथील `मस्तान तलाव` स्टेडीयमजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मिळते. या डीशमध्ये गहू, डाळ, दूध हे बारिक केलेले असतात आणि त्यात वाफवून घेतलेले चिकण घालून ही डीश बनवली जाते. सुलतान खुरेशी यांची ही डीश फक्त रमजानमध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत मिळते.
मालपोवा आणि फिरणी
मालपोवा हा तेलात तळलेला आणि अंड्यापासून बनवलेला पँनकेकसारखा पदार्थ आहे.
फेरणी ही दुसरी गोड डीश आहे. जी तांदळापासून बनवली जाते आणि त्यांचे अनेक वेगवेगळे फ्लेवर असतात, जसे व्हँनिला, मँन्गो यासारखे अनेक फ्लेवर असतात. त्यांचबरोबर सुतारफेणीही खास पद्धतीनं बनवली जाते.
/marathi/slideshow/रमजान-स्पेशल_251.html