www.24taas.com, मुंबई
मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढंच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिले होते. मी आता इथे (जालना), २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच. असे जाहीर आव्हान दिले होते. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी, तुम्ही पुण्यात येऊन दाखवा, असे आव्हान राज ठाकरेंना दिले होते.
राज ठाकरे यांच्या ईशाऱ्यानंतर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या माध्यमातून प्रसिद्ध पत्रक काढले होते. राज यांना पुण्यात येताना अडवू नका. त्यांना पुण्यात येवू दे. शांततेने आणि संयमाने सामोरे जा, असा आदेश शरद पवार यांनी दिला होता.
शरद पवारांनी लक्ष घातल्याने पुण्यातील अंकुश काकडे यांची हवाच निघून गेली. पवारांच्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी संयम दाखवला. मला संघर्ष करण्याची मुळीच ईच्छा नाही. मी पुण्याला सहज जाणार होतो. मी शरद पवारांवर टीका केलेली नाही. मी पवारांना प्रश्न विचारलेत. दुष्काळात आयपीएल क्रिकेटचे सामने कशासाठी?, राज ठाकरे यावेळी म्हणालेत.
www.24taas.com, मुंबई
माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय. आज दुपारी साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ मनसे कार्यकर्त्यांनी राडा केल्यानं परिसरातलं वातावरण तापलं होतं.
‘मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा’चा जप करणाऱ्या राज ठाकरेंनी शिवसेनेच्या हक्काच्या हिंदुत्वाच्या मुद्यातून अंग काढून घेतलेलं आहे. आपण हिंदुत्वाच्या मुद्यावर नाही तर मराठी माणसासाठी झगडतो, असं आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी ठासून सांगितलंय. ‘महाराष्ट्रात जर नोकऱ्या निर्माण होणार असतील तर त्या पहिल्यांदा मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहीजे... माझी भूमिका ही सदैव मराठी माणसांच्या हक्कासाठी होती आणि राहील त्यात काडीमात्र बदल होणार नाही’ असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
आज साताऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राडा केल्याने येथील वातावरण तापले आहे. साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ झालाय. उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आज दुपारीच ही घटना घडलीय. ग्रामीण भागातील मराठी मुलांसाना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने साताऱ्यात ही सैनिकी शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र, शाळेतील भरतीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारी युवकांना प्राधान्य देण्यात येत होते. प्रवेश घेताना वयाचे खोटे दाखले दिल्याचा आरोप मनसेनेने केलाय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
www.24taas.com, मुंबई
आज राज ठाकरे यांनी आपल्या `कृष्णकुंज` या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्यांना पुण्यात येण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिलं. आपली पुण्यात इतक्यात कुठलीच सभा नसल्याचं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसंच दुष्काळामध्ये आयपीएल मॅचेस व्हाव्यात का, असा प्रश्नही पुन्हा विचारला.
दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का? मार्चच्या पहिल्याच आठवड्यात एवढा दुष्काळ आहे. पुढील महिन्यांमध्ये तो वाढत जाईल. अशा काळात आयपीएल मॅचेस खेळवणं योग्य आहे का?
आयपीएल क्रिकेट मॅचेस ही शरद पवारांचीच संकल्पना आहे. या मॅचेसवर प्रचंड खर्च केला जातो. एकीकडे शरद पवारांनी आपल्या पक्षातील भास्कर जाधव यांना शाही विवाहातल्या खर्चाबद्दल समज दिली, एका महापौराला विवाहात वारेमाप खर्च केल्याबद्दल पक्षातून काढून टाकलं जातं, त्यांनीच खर्चिक आयपीएलच्या मॅचेस भरवणं बरोबर आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. अशा दुष्काळी परिस्थितीत आयपीएलच्या मॅचेस होणं सद्सद्विवेकबुद्धीला पटतं का? असंही राज ठाकरेंनी विचारलं. याचवेळी आमचाही कोळी महोत्सव होता तो आम्ही नोव्हेंबर- डिसेंबरवर ढकलला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
www.24taas.com, मुंबई
मनसे आणि `दादां`च्या राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. राज यांना अडवू नये, अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांनी केलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय. पाहुयात काय काय म्हणालेत ते या पत्रकार परिषदेत...
• शरद पवारांना मी प्रश्न विचारलेत, त्यांच्यावर टीका केलेली नाही
• राष्ट्रवादी या दुष्काळाला जबाबदार आहे
• महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानव निर्मित आहे
• जे चुकीचं आहे ते मी बोलणारच
• माझी भूमिका मराठी माणसाबद्दल आहे, त्यात काहीही बदल होणार नाही
• महाराष्ट्रात जर नोकऱ्या निर्माण होणार असतील तर त्या पहिलांदा मराठी माणसाला प्राधान्य दिले पाहीजे
• दुष्काळात आयपीएल क्रिकेटचे सामने कशासाठी?
• मी पुण्याला सहज जाणार होतो
• परीक्षेच्या काळात संघर्ष टाळावा
• मला संघर्ष करण्याची मुळीच ईच्छा नाही
• मी माझं मत मांडत असतो
• कोणी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं
• पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं
www.24taas.com, सोलापूर
राज ठाकरे हे नकलाकार असून ते नकलाच करणार असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली होती. याची परतफेड शिंदे यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषेदेत केली आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर आहेत. सतत एकच बडबड करत असतात. मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं हे एकच तुणतुणं त्यांचं सुरू असतं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. सोलापूर येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सुशीलकुमारांची टिंगल केली होती. मला सोनिया मॅडमनी हे दिलं, एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं... तुम्ही काय केलं दलित बांधवासाठी? असा सवालही राज ठाकरेंनी केला होता.
दिल्ली रेप प्रकरणातील त्यांना प्रश्न विचारलं तरी तेच मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं हेच उत्तर सुशीलकुमार देत असतात, असंही राज ठाकरे म्हणाले होते. या टीकेला आज सोलापुरातच सुशीलकुमार शिंदेंनी उत्तर दिलं आहे.
www.24taas.com,पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात येताना अडवू नका. त्यांना पुण्यात येवू दे. शांततेने आणि संयमाने सामोरे जा, असा आदेश राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिलेत.
राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, राज यांनी जशास तसे उत्तर देताना आम्हाला कोणाची परवानगी नको. मी ७ तारखेला पुण्यात येतोय. कोण मला आडवतो, ते पाहतो. अडवून दाखवाच, असे प्रती अव्हान राज यांनी दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील वाद शिगेला पोहचण्याची शक्यता होती.
राज्यघटनेवर विश्वास ठेवणारा आहे. प्रत्येक नागरिकाला भारतात कुठेही जाण्याचा आणि विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जनता दुष्काळात होरपळत असताना त्यावर राजकीय पोळी भाजण्याची आमची प्रवृत्ती नाही. अशा परिस्थिती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम काही पक्ष जाणीवपूर्वक करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हा टोला मनसे आणि शिवसेनेला नाव न घेता राष्ट्रवादीने लगावलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संयम दाखवून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आपली शक्ती खर्ची करण्याचे प्रयत्न करतील, असे राष्ट्रवादीकडून स्पष्च करण्यात आलेय.
www.24taas.com,जालना
जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.
राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी, तुम्ही पुण्यात येऊन दाखवा, असे आव्हान राज ठाकरेंना दिले होते. पुण्यातले काकडे मला, म्हणतात, चार दिवस आधी सांगा पुण्यात येताना. मी आजच सांगतो. मी ७ तारखेला पुण्यात येणार आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा. मनसेची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले जात असून आम्हालाही जसास तसे उत्तर देता येते, हे विसरु नका, असा कडक इशारा राज यांनी दिला.
जसास तसे उत्तर द्यायचे असेल तर गुजरातला द्या. गुजरातमध्येा जसा विकास झाला आहे, तसा विकास महाराष्ट्रा त करा. मी स्वतः हार घालून तुमचा सत्कार करीन, असे खडे बोल राज यांनी उपमुख्यहमंत्री अजित पवार यांना सुनावले. राज यांना महाराष्ट्रातील विकास दिसत नाही. ते नेहमी गुजरात आणि नितीशकुमारचे गोडवे गातात, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
शरद पवार दुष्काळाची एवढीच काळजी असेल तर महाराष्ट्रा त आयपीएलचे सामने का ठेवता, असा सवालही राज ठाकरेंनी केला. त्या भास्कर जाधव याची मुलाचा विवाह करताना पैशाची उधळपटी केली म्हणून त्यांना चांगलेच खडसावलेत ना ! मग महाराष्ट्रात होणारे आयपीएलचे सामने रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
राज यांनी शरद पवारांना काही प्रश्नस विचारले. हे प्रश्न त्यांमच्या दृष्टीने पोरकटच आहेत, अशी खोचक टीका करुन राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रालत ३० वर्षांपासून अनेक प्रकल्प् रखडले आहेत. हजारो कोटींचा पैसा वाया गेला आहे. प्रकल्पांच्या किंमती अनेक पटीनी वाढ गेल्यात. तरीही अनेक ठिकाणी प्रत्याक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. हे का, याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे.
दुष्काळामुळे आमच्या जनावरांना वा-यावर सोडावे लागत आहे. ही जनवारे खाटीक नेऊन कापतात. अनेकांवर सोने गहाण ठेवून स्थरलांतर करण्याची वेळ आली आहे. ज्यात जनावरांला पोटच्याल गोळ्यासारखे वाढविले, त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. ही पापं तुम्ही कुठे फेडणार, असा सवाल करत राज ठाकरे म्हणालेत, सत्ता हातात द्या, मग बघा विकास काय असतो ते.
www.24taas.com, जालना
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. शरद पवार कायम पोरकट म्हणून मला हिणवतात म्हणून त्यांच्यासाठी काही पोरकट प्रश्न मी आणले आहेत. असं म्हणत त्यांनी या पोरकट प्रश्नांची उत्तरं द्यावी असं आव्हान त्यांनी शरद पवारांना दिलं.
राज्यातला सर्वाधिक दुष्काळग्रस्त जिल्हा असलेल्या जालन्यात झालेल्या सभेत राज यांनी दुष्काळापेक्षा पवार काका-पुतण्यांवरच्या टीकेलाच झुकतं माप दिलं. राष्ट्रवादीकडे चार महत्त्वाची खाती आहेत आणि त्याच खात्यांत भ्रष्टाचार सुरूय, असं राज म्हणाले. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या चार कंत्राटदारांची नावं वाचून ते अजितदादांचे निकटवर्तीय असल्याचा दावाही त्यांनी केला.
तहलकानं अजित पवारांच्या घोटाळ्यांवर काढलेला विशेषांक मराठीत अनुवादित करून वाटणार असल्याचंही राज यांनी यावेळी जाहीर केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही सवाल राज यांनी केलेत.
राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतका पुळका आहे, तर मग एप्रिलमध्ये महाराष्ट्रात होणा-या आयपीएलच्या मॅचेस का नाही रद्द करत नाही असा खडा सवाल त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना केला.
www.24taas.com, जालना
‘गडी बिथरलाय’ या अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना... राज ठाकरेंनी सरळ घरात घुसून मारतील, असा सज्जड दमच भरला... ‘मी असं काय वावगं बोललो... काय चुकीचं बोललो.. यापुढे लक्षात ठेवा यापुढे लोकं तुमच्या घरात घुसून मारतील... माझ्या पेक्षा जनता तुम्हांला काय शिव्या घालतात ते पहा.. जशास तसे उत्तर देऊ म्हणे, या तर बघू मग... होऊन जाऊ दे... महाराष्ट्र काय यांचा बापाचा आहे.... पोलीस काढा बाजूला, तुमच्या दोन पायावर परत जाल का पहा जरा.’
‘कोंबडं दाबलं तरी उगवायचं राहत नाही.’ असं म्हणत अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्राशी असभ्य भाषेत बोलणाऱ्यांसाठी माझी भाषा अशीच राहील असंही राज ठणकावून म्हणाले. रस्ते, पाणी, वीज आणि गृहखातं अशी चार महत्त्वाची खाती गेली १४ वर्ष राष्ट्रवादीच्या हातात आहेत. गेल्या १४ वर्षात या खात्यांमध्ये त्यांनी कधी काही केलंच नाही उलट त्यांनी महाराष्ट्रावर बलात्कारच केला अशी घणाघाती टीका राज यांनी केली.
माझं आणि पक्षाचं नाव बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी षडयंत्र करत असून त्यासाठी ते कुठल्याही थराला जातील असा आरोप राज यांनी केला. पण यामुळे मी थांबणार नाही... उलट जशास तसे उत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले... तसंच केसेस करा.... मी केसेस ना घाबरत नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. जशास तसं उत्तर देण्याची भाषा आत्ता करणारे अजित पवार मुंबईत पोलिसांवर झालेल्या अत्याचाराच्यावेळी मूग गिळून का बसले होते असा थेट सवाल राज ठाकरेंनी अजित पवारांना केला.
www.24taas.com, जालना
जालन्यातील सभेत राज ठाकरेंनी केलेली तुफान फटकेबाजी
ही सत्ता राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, कायापालट काय असतो ते कळेल तुम्हांला - राज
आता लक्षात ठेवा आम्हांला जर काळे झेंडे दाखवले तर ते झेंडे लाल झाल्याशिवाय राहणार नाही - राज
औरंगाबादमधील पुरातन विहीरी आमच्या पोरांनी केला मी, स्वत: पाहून आलो - राज
तेव्हा तुमच्या शेपट्या का गेल्या आत - राज
टीव्हीवर पाहिलं सगळ्यांनी तेव्हा अजित पवार का बोलले नाही - राज
काही दिवसापूर्वी मुंबईत मुस्लिम संघटनेने जेव्हा आमच्या पोलीस महिलांवर हल्ले केले तेव्हा का नाही बोलले अजित पवार जशास तसे उत्तर देऊ - राज
तुमच्यावर टोलनाके बसविले जातात, तुमच्याकडून पैसा उकळायचा - राज
एका समितीतील चोप्रा आले होते महाराष्ट्रात, ते म्हणाले दुष्काळी परिस्थिती पाहून अशी अवस्था फक्त राजस्थानात आहे आज - राज
जशास तसं उत्तर गुजरातला द्या - राज
मी लोकांच्या मनातलचं बोलतो - राज
आम्हांला उत्तर देण्याची भाषा करू नका - राज
अजित पवार दुसऱ्या राज्यातील विकास पहा जरा - राज
एवढी भीषण परिस्थिती जर महाराष्ट्रात असेल तर सांगा काय करणार आहे हे सरकार - राज
नाशिकमधील एका बँकेने पाच हजार किलो सोनं महिलांनी गहाण टाकून स्थलांतर केलं आहे - राज
मला एका चॅनेलच्या संपादकाने फोन करून सांगितलं की, मार्चच्या सुरवातीला काय अवस्था आहे महाराष्ट्राची - राज
चारा लोकांबाबत मी तुम्हांला ठेकेदाराबाबत सांगणार आहे, ज्यांनी करोडोंचे घोटाळे केले - राज
हे घोटाळे होताने काय करीत होती भाजप आणि शिवसेना - राज
तहेलकांने अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्याबाबत कव्हर स्टोरी छापली आहे. - राज
काही माणसाबाबत मला पवार साहेब तुम्हांला काही बालीश प्रश्न विचारायचे आहे - राज
आम्हांला मत करा, नाही केला तर तुमच्यावर दादागिरी करायची - राज
कुठं घेऊन जाणार हा पैसा, हा पैसा तुमच्यावर दादागिरी करण्यासाठी वापरणार? - राज
अरे अजित पवार कुठं फेडाल ही पापं... - राज
दुष्काळामुळे आमच्या जनावरांना सोडावं लागतयं, खाटीक नेऊन कापतात - राज
माझ्या बालिश प्रश्नांना उत्तर द्या साहेब - राज
जलसिंचनंच्या घोटाळ्याबाबत काय बोलणार शरद पवार साहेब - राज
राष्ट्रवादीवाल्यांनो षड्यंत्र रचल्यास जशास तसे उत्तर देऊ - राज
राज ठाकरेंच्या या बालिश प्रश्नांना उत्तर द्या - राज
पवार साहेब मला सांगा हा दुष्काळ निसर्गामुळे आला आहे की, सरकारमुळे - राज
मी कुठंही जाता पूर्ण तयारीने जातो, हे लक्षात ठेवा कधीही बेसावध नसतो - राज
आणि लक्षात ठेवा, जर काही हुल्लडबाजी करण्यासाठी आला असाल तर चारही बाजूने वेढला आहात तुम्ही - राज
तुम्ही शांत बसलात तर पोलिसांना तुमच्यावर काठ्या उगाराव्या लागणार नाही - राज
थोडेच प्रश्न आहेत बाकीचे पुढील सभांमध्ये विचारीन - राज
ऐ तिकडे काय हुल्लडबाजी चालली आहे रे... - राज
शरद पवार साहेब म्हणाले ते बालिश प्रश्न आहेत - राज
पवार साहेब माझे काही बालिश प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देता आली तर सांगा - राज
अजित पवार मला, वर्षभरातच विचारता तुम्ही १४ वर्ष महाराष्ट्रवर बलात्कार केला त्याचं काय - राज
मला नाशिकची सत्ता मिळून वर्ष झालाय, पाच वर्षानंतर विचारा - राज
नाशिकचा काय विकास केला राज ठाकरेंनी.. - राज
अजित पवार यांची पुन्हा केली राज ठाकरेंनी नक्कल - राज
राज्यातील महत्त्वाची चारही खाती राष्ट्रवादीकडे आहे आणि तीसुद्धा चौदा वर्ष - राज
करणारच कारण की, महाराष्ट्राच्या या अवस्थेला हेच लोकं जास्त जबाबदार आहेत - राज
लोकं म्हणतात राष्ट्रवादीवर टीका करता काँग्रेसवर टीका करीत नाही - राज
मनसेच्या बंदोबस्तासाठी बैठका घेता काय - राज
पवार साहेब मला सांगा बंद कराल का तुम्ही त्या आयपीएल मॅचेस - राज
माझं राहणं जर खुपतयं तर मग अजितदादा मला सांगा एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएल मॅचेस बंद करणार का? - राज
मराठवाड्यात मी दुष्काळ पाहून आलो, आणि तेथील शासकीय विश्रामगृह सप्ततारांकित आहे, ते पाहून या - राज
अजित पवार म्हणतात मला, मी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो, माझ्या पैशांनी राहतो, तुमच्यासारखे महामंडळ्याच्या पैशानी राहत नाही - राज
२०१४ मध्ये सत्ता आल्यावर सगळ्या केसेस काढून घेईल – राज
कशाला घाबरू नका... बिनधास्त टाकू द्या केसेस.. - राज
केसेसेची भीती कुणाला दाखवता... - राज
हिम्मत असेल तर आडवून दाखवा - राज
अजित पवार सत्तेत दीड वर्ष राहीलं आहे, त्यानंतर आमची सत्ता आल्यावर काय कराल - राज
काकड्या सोलून टेबलावर ठेवीन - राज
Breaking News - राष्ट्रवादीवाल्यांनो तुम्हीही रस्त्याने फिरता, आमच्याकडूनही दगड येऊ शकतो...
मी ७ तारखेला पुण्यात येतोय काय करणार ते दाखव - राज
तू काय हॉटेल मॅनेजर आहे का? बुकींग करणार का? - राज
ते पुण्यातले काकडे मला, सांगतात चार दिवस आधी सांगा पुण्यात येताना - राज
पिचड ते राष्ट्रवादीचे, असं काय आडनाव असतं... मैद्याचं पोतं... - राज
पोलीस काढा बाजूला, तुमच्या दोन पायावर परत जाल का पहा जरा - राज
महाराष्ट्र काय यांचा बापाचा आहे - राज
जशास तसे उत्तर देऊ म्हणे, या तर बघू मग... होऊन जाऊ दे... - राज
माझ्या पेक्षा जनता तुम्हांला काय शिव्या घालतात ते पहा - राज
यापुढे लक्षात ठेवा यापुढे लोकं तुमच्या घरात घुसून मारतील - राज
मी असं काय वावगं बोललो... काय चुकीचं बोललो - राज
बिथरलयं कोण, मी की तुम्ही - राज
माझं भाषण सुरू झालं की, केबल बंद करायची, दगडफेक करायची - राज
ते अजित पवार मला म्हणाले, गडी बिथरलाय कोणी मी - राज
मी जेव्हा जिल्हा पातळीवरील सभा घेईल तेव्हा तुमचं काय होईल - राज
मी आतापर्यंतच्या दौऱ्यात फक्त तीन सभा घेतल्या तेव्हा पहा यांना किती मिरच्या झोंबल्या - राज
आणि जे सुटलं आहे आहे ते आपल्यामुळेच - राज
इथं वारं खूप सुटलं आहे - राज
इथं जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू, भगिनी आणि मातांनो - राज
राज ठाकरे यांचे भाषण पहा लाईव्ह फक्त `झी २४ तास`वर