Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

रोखठोक राज ठाकरे

राज ठाकरे आणि टीका...

राज ठाकरे आणि टीका...

‘सूरक्षेत्र’ या कार्यक्रमातील पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागाच्या मुद्यावरून पुन्हा चर्चेत आलेली मनसे, मुंबई हिंसाचाराच्या मुद्यावर गिरगाव ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा, मराठीचा मुद्दा रेखाटत हिंदूत्वाकडे वाटचाल, उद्धव-बाळासाहेब भेट अशा विविध मुद्यांवर अशा विविध मुद्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी... आणि राज ठाकरेंनी त्यांनी दिलेली ही रोखठोक उत्तरं...
चला तर पाहुयात, काय काय म्हटलंय राज ठाकरेंनी...

आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

‘आज ८ सप्टेंबर रोजी आशाताईंचा वाढदिवस... आशाताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेतच... जो आनंद यापूर्वी आशाताईंनी दिला तो भविष्यातही त्या देतील, अशी आशा आहे.... आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच रागावतो. आशाताई इतक्या मोठ्या आहेत की आमची लायकीच नाही त्यांच्यासोबत भांडण करायची. मुद्दा आहे तो फक्त पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागाचा...`

... म्हणून ‘सूरक्षेत्र’ला दिला हिरवा कंदील

... म्हणून ‘सूरक्षेत्र’ला दिला हिरवा कंदील

‘माझ्याकडे जेव्हा बोनी कपूर सगळ्या टीमसह आले तेव्हा ते सगळे रडायला आले होते. बोनी कपूर यांनी या प्रोजेक्टमध्ये प्रचंड गुंतवणूक केलीय. ते कर्जात आहेत. आमचं प्रचंड नुकसान होईल, असं त्यांनी म्हटलं... मी म्हटलं की, अंर्तआत्म्याला विचारून बघा बरोबर करतोय की नाही ते... आशाताईंना, लतादिदिना, सलमान खानलाही पाकिस्तानात बंदी आहे. मग आपण का देशातल्या लोकांना पायघड्या घालायच्या... पण, त्यांनी चूक कबूल केली म्हणून हिरवा कंदील दिला. राज ठाकरेंना विकत घेणारा अजून पैदा झालेला नाही आणि तो होणारही नाही’.

काय होता संदेश आणि कुणासाठी?

काय होता संदेश आणि कुणासाठी?

‘पाकिस्तानातल्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारतो. पण, ते मात्र आपल्याला स्विकारत नाहीत. ते इकडे येतात.. सीडीज विकतात... पैसे कमावून तिकडे घेऊन जातात.. पाकिस्तान सुधारेल अशी आशा नाही.. पण कुठेतरी काहीतरी मार्ग काढायला हवेत. टाळी कधी एका हातानं वाजत नाही... वेगवेगळ्या माध्यमांतून हे प्रेशर त्या देशावर जायला हवं.’

कलावंत हा कलावंत असतो

कलावंत हा कलावंत असतो

‘भारतात जेवढे मुसलमान आहेत तेवढेच पाकिस्तानतही आहेत. आपल्याकडे जे तीन सुपरस्टार आहेत ते खान आहेत. त्यांच्याकडे कुणी मुसलमान म्हणून पाहत नाहीत.बिस्मिल्ला खाँन यांच्या शहनाईवर कुणी कधी धर्माच्या नावाखाली आक्षेप घेतला नाही. हे औदार्यं समोरचा देश कधी दाखवणार? कलावंत हा कलावंत असतो. पण कला आणि राजकीय मुद्दे अधोरेखित व्हायलाच हवेत.’

बाळासाहेब - उद्धव ठाकरेंची भेट

बाळासाहेब - उद्धव ठाकरेंची भेट

‘ज्या माणसानं मला अंगाखांद्यावर खेळलो... ज्यांनी वाढवलं... ज्यांनी संस्कार केले... कसं वाटणार त्यांना भेटून...? नक्कीच खूप आनंद झाला होता तेव्हा. पण, तेव्हाचा प्रसंग वेगळा होता... बाळासाहेबांकडून काही राजकीय सल्ला मिळण्याचा किंवा देण्याचा, ही काही राजकीय सल्ला देण्याची ही काही जागा, परिस्थिती आणि वेळही नव्हती.’

‘काही झालं तरी उद्धव माझा भाऊ’

‘काही झालं तरी उद्धव माझा भाऊ’

‘बदल हे प्रगतीचं लक्षण... बदल हा घडतच असतो... त्याची राजकीय गणित कशी लावावीत? या मनस्थितीत मी सध्या नाही. मी कुटुंबियांना भेटलो यातच मला जास्त आनंद... राजकारणात असलो तरी उद्धव भाऊ आहे माझा. राजकारण ही गोष्ट वेगळी... माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा वेगळा... ते काही दोन कंपन्या एकत्र किंवा वेगळं करण्याइतपत सोपं नसंत.’

मुद्दे... शिवसेनेचे की मनसेचे?

मुद्दे... शिवसेनेचे की मनसेचे?

‘मुद्दे अगोदरही मांडले गेलेले आहेत... हे मुद्दे प्रभावीपणे कोण पुढे नेतंय, याला जास्त महत्त्व आहे... बाळासाहेबांचा मुद्दा मी पुढे नेतोय यात काही चुकीचं आहे का? सध्याच्या परिस्थितीत एखादा प्रश्न सुटण्यापेक्षा जास्त कठीण होतायत. आणि हे मुद्द मी प्रभावीपणे मांडून त्याचा रिझल्ट मिळत असेल आणि ते लोकांना मान्य होत असतील, तर त्यात काही गैर आहे का?’

अमरजवान स्मारकाची तोडफोड करणाऱ्याला पकडणाराही ‘मुस्लिम’च

अमरजवान स्मारकाची तोडफोड करणाऱ्याला पकडणाराही ‘मुस्लिम’च

‘मी फक्त परप्रांतियांच्या मुद्यावर बोलतो... हिंदुत्वाचा मुद्द्यावर नाही... बाबरी मस्जिद पडली त्याची रिअॅक्शन मुंबईत उमटली... ११ ऑगस्टच्या मोर्चानंतर दुसरा मोर्चा निघाला तो लखनौला... पण, गुजरातच्या दंगली झाल्या त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात का नाही उमटल्या?... अमर जवान स्तंभाची तोडफोड करणारा मुस्लिम तरुण बिहारमध्ये पळून गेला... त्याला बिहारमधून पकडून आणणारा पोलीस मुसलमान आहे, त्याचं नाव रौफ शेख... यामध्ये तुम्ही हिंदुत्व कुठे घालणार? त्याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही...

धर्माचं राजकारण काँग्रेस करतंय

धर्माचं राजकारण काँग्रेस करतंय

‘मुंबईत हिंसाचार करणारा जो जमाव होता तो मुसलमान होता, त्यांनी नासधूस केली, महिला पोलिसांवर अत्याचार केला, पोलिसांवर हात उगारला... त्याच्यावर राज्यसरकार म्हणतंय आम्ही रमजाननंतर कारवाई करू... आता सांगा यात धर्म कोण आणतंय? काँग्रेस सरकारनंच यामध्ये धर्म आणलाय.. गुन्हेगार हा गुन्हेगाच आहे त्याचा धर्माशी काय संबंध?’

आबा गृहमंत्रिपदासाठी नालायक

आबा गृहमंत्रिपदासाठी नालायक

‘मी अजूनही आबांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. बिहार कमिशनरकडून पत्र आलेय असं मुंबई पोलीस कमिशनर सांगतायत आणि आबा म्हणतायत की असं काही पत्रचं मिळालेलं नाहीय... ज्या गृहमंत्र्याला दोन राज्यांमधला पत्रव्यवहारचा पत्ताही नसतो, त्याला खरोखरच गृहखातं कळतंय का? मुळात आर. आर. पाटलांचा तो पिंडच नाही... आबा गृहमंत्रिपदासाठी नालायक आहेत... त्यांचं कामच नाही हे... असा गृहमंत्री असतो का? त्यांना गृहखातंच कळालेलंच नाहीय... ते कसं काम करणार?’

पोलीस... पाय बांधून शर्यतीत!

पोलीस... पाय बांधून शर्यतीत!

‘आझाद मैदानावरच्या भाषणात फक्त पोलिसांची बाजू मांडली... त्यांच्यावर येत असणारा राजकीय दबाव, परप्रांतियांचा प्रेशर हे सगळे मुद्दे आपण लक्षात घ्यायला हवेत. आपण सण साजरे करतो, त्या ठिकाणी पोलीस असतात, त्यांच्या खाण्या-पिण्याची-राहण्याची सोय काय, याकडे कोण लक्ष देतो? पण, तिथं मात्र एखादी घटना घडली तर आपण त्यांनाच दोष देतो. पाय बांधून शर्यतीत उतरवण्यासारखं आहे हे... पोलिसांचं मनोधैर्य खचलं असेल, त्यांच्या परिवाराचं मनोधैर्य खचलं असेल तर आबांनी पोलीस कॉलनीत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे... मुंबई हिंसाचारात जे झालं ते झालं, आता तरी यापुढे असं होऊ देणार नाही हाच मॅसेज द्यायचा होता.’

हिंदी चॅनल्स आणि राज

हिंदी चॅनल्स आणि राज


‘माझ्यावर टीका केली तर माझा आक्षेप नाही... टीका होणारच... पण एकतर्फी दाखवू नका. हिंदी न्यूज चॅनल्स एका बाजून चित्र रंगवतात... ते स्वत:च चूक-बरोबर ठरवतात... चूक की बरोबर ठरवणारं चॅनेलवाले कोण लागून गेले? ते जजेस आहेत का? मी हिंदी चॅनलच्या विरोधात नाही तर काही लोकांच्या प्रवृत्तीविरोधात आहे... मी टीकेला कधीच घाबरत नाही... चॅनेलवर इतर लोक टीका करत असतील तर मला चालेल पण न्यूज चॅनल्सचे अँकर टीका करत असतील तर ते मला मान्य नाही कारण ते त्याच्यासाठी तिथे बसलेला नाहीत. हिंदी चॅनल्स त्यांच्या नजरेतून चुकीच्या बातम्या दाखवतात. त्यांना कुणाला समजून घ्यायचंच नसतं त्यांना फक्त निर्माण करायची असते कॉन्ट्रोव्हर्सी... अशी कित्येक उदाहरणं मला माहित आहेत.’

उत्तरप्रदेश : गुन्हेगारांचा अड्डा

उत्तरप्रदेश : गुन्हेगारांचा अड्डा

‘पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, लाल बहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी इतके पंतप्रधान ज्या राज्यानं देशाला दिलेत त्या प्रांतातील लोकं तिथून बाहेर पडून दुसऱ्यांना छळतायत... तिथं गुन्हेगारांचे अड्डे झालेत... आपल्या देशात संचाराचं स्वातंत्र्य आहे... पण संचाराचं स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांना जाऊन त्रास देणं नाही... खुद्द इंदिरा गांधींनी म्हटलं होतं की, एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये लोकं गेली आणि त्या राज्यातल्या स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर त्या राज्यांना याचा त्रास होईल.... त्यांना राज्य सुधारायला सांगा... त्यांना कुणी विचारत नाही... सल्ला फक्त महाराष्ट्रालाच... हिंदी चॅनेलवाले... कारण टीआरपी महाराष्ट्रात... हेच लोक कोणतंही वाक्य समजून न घेता इतर राज्यांमध्ये आगी लावतात.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14

More Slideshow

8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीचे 10 स्मार्टफोन

इराकमध्ये भीषण नरसंहार!

फूटबॉल स्टार्स आणि त्यांच्या प्रेम कहाण्या...

`फादर्स डे` स्पेशल बॉलिवूडची गाणी

बॉलिवूडचे सुपर ‘डॅड’!

जगातील काही समाजाचे विचित्र अंत्यविधी प्रकार

माधुरी दीक्षितचे सर्वश्रेष्ठ सिनेमे

`मदर्स डे` निमित्त गिफट

`मदर्स डे` आणि गीते

लग्नाआधीच यांना लागली बाळाची चाहूल...

जगातील १० सर्वात धोकादायक पूल!

`बॉलिवूड`मध्ये येणारे नवे चेहरे

First Prev 1 2 3 4 5  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/रोखठोक-राज-ठाकरे_121.html