लेनोवोचा नवा स्मार्टफोन ‘लेनोवो के ९००
’सध्या प्रत्येत कंपन्यांमध्ये स्मार्ट फोन डोळ्यासमोर ठेऊन स्पर्धा चाललेय. मोबाईलच्या कंपन्यांबरोबरच आता लॅपटॉपमध्ये अग्रगणी असलेल्या कंपन्याही आता स्मार्टफोनच्या रेसमध्ये उतरु लागल्यात. दर आठवड्याला विविध कंपन्या नवीन फिचर्स, स्मार्टलूक असलेले स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे ती लेनोवोची. लेनोवो कंपनीने नवीन स्मार्टफोन लेनोवो के ९०० आणलाय.
लेनोवो के ९००
या स्मार्टफोनचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याची मोठी स्क्रीन. गोरिगा ग्लास हे त्याचे खास वैशिष्ट्यं आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन फुल एचडी म्हणजेच १०८० x १९२० इतके आहे. स्क्रीनचा आकार आहे ५.५ इंच. जर तुम्हाला मोठा टॅब्लेट वापरायचा नसेल तर हा लेनोवोचा ऑप्शन छान आहे.
लेनोवोची बॉडी
लेनोवो के ९०० ची बॉडी स्टेनलेस स्टील आणि पॉलिकॉर्बोनेटचा वापर करून बनवलेली आहे. या फोनचा आकार ६.९ मिमी इतका आहे आणि वजनाने १६२ ग्रॅमचा आहे.
लेनोवोचे फीचर्स
लेनोवो के ९०० मध्ये १६ जीबी मेमरी इंटरनल आहे.यामध्ये आपण एक्सर्टनल मेमरी वाढवण्यासाठी कोणतीही सोय नाही. त्याचे मोठे आकर्षण म्हणजे याचा यूझर इंटरफेस. यामध्ये जेलीबीन २.१ ची अॅड्रॉईड सिस्टीम आहे. यूझर इंटरफेसमधील विशेष भाग म्हणजे एड्युरन्स यात आपल्या फोनची बॅटरी किती शिल्लक आहे हे बघण्यासाठी सतत सेटिंगमध्ये जावे लागणार नाही. इथे हे होमस्क्रीनवरच पाहायला मिळेल.
इंटेलची अॅटम ही प्रोफेसर चिप वापरणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्याचा वेग १.८ गिगाहर्टझ आहे तसेच तो ड्युअल कोर ही आहे. या मध्ये २ जीबी रॅमची सोय आहे.
कॅमेरा आणि लेनोवो
लेनोवो के ९०० चा कॅमेरा आहे तब्बल १३ मेगापिक्सेलचा. त्यासाठी सोनी एक्समोर बीएआय सेन्सर देण्यात आलाय. कमी प्रकाशात फोटो काढाताना अडचण येऊ नये म्हणून यामध्ये दोन एलईडी लाईटसचा वापर केला गेलाय. या स्मार्टफोनमध्ये क्लोजअपसाठी मायक्रो सेटिंगची सोय आहे. तसेच या कॅमेऱ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावर चांगले वाइड अँगल फोटोही काढता येतात. यात समोरचा कॅमेरा आहे २ मेगापिक्सेलचा.
लेनोवोची इतर वैशिष्ट्ये
लेनोवोची बॅटरी क्षमता हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. यामध्ये २५०० एमएच बॅटरी वापरण्यात आलीय. इतर फोनप्रमाणे याची बॅटरी लगेच संपत नाही तर जरी आपण वायफायचा वापर केला तर दीड दिवस याची बॅटरी नीट चालते. या विविध आकर्षक अशा फिचर्सनी परिपूर्ण लेनोवो के ९०० ची किंमत आहे ३२, ९९९ रुपये.
/marathi/slideshow/लेनोवो-के-९००_238.html