संपूर्ण सिंग कालरा
शीख घरातील लहानगा संपूर्ण सिंग फाळणीची दृश्यं अनुभवत पाकिस्तानातील दीना गावातून दिल्लीत आला. कालांतराने मुंबईत आला. गॅरेजमध्ये काम करता करता कविता करू लागला आणि बिमल रॉय यांचा परीसस्पर्श लाभताच `गुलज़ार` बनला...
मोरा गोरा अंग लैले
`बंदिनी`मधील नुतनवर चित्रित झालेलं हे गाणं गुलज़ारजींचा हिंदी सिनेसृष्टीतला प्रवेश ठरला.
आज कल पाँव ज़मींपर नही पडते
रेखा आणि विनोद मेहरा यांच्या प्रेमाचं `घर`.. आणि या घरात नवपरिणित रेखाच्या मनातील भावना अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या गुलज़ारजींनी
ओ माज़ी रे...
जितेंद्र हेमा मालिनी यांच्या खुशबू सिनेमाचं दिग्दर्शनही गुलज़ारजींनी केलं होतं. यातील हे गाणं बंगाली साहित्याशी जवळीक साधतं.
नाम गुम जायेगा...
गुलज़ारजींच्याच किनारा सिनेमातील हे गीत... जगातल्या मोठ मोठ्या गायकांच्या आयुष्यातलं शाश्वत सत्यच या गाण्यातून गुलज़ार यांनी उलगडलं आहे.
मेरा कुछ सामान...
गुलज़ार याच्याच नव्हे तर पंचमदा, आशा भोसले यांच्याही कारकिर्दीतील एक उत्तुंग रचना.. गद्य स्वरुप वाटणारं गीत त्यातील संवेदनशीलतेमुळे विलक्षण परिणाम घडवून आणला...
हम ने देखी है उन आँखों की
खामोशी चित्रपटातील सुंदर गीत... प्रेमाचं वर्णन करणारं आणि चित्रपटात चपखल बसणारं गाणं गुलज़ार यांमनी लिहीलं...
दिल ढुंढता है...
मौसम चित्रपटात मिर्झा गालिब च्या अभिजात शायरीला आपल्या शब्दांची सोनेरी झालर लावून गुलज़ार यांनी एक आणखी अजरामर गीत रसिकांसमोर पेश केलं.
तेरे बिना ज़िदगी से...
आँधी चित्रपट हा एक वादळी चित्रपट ठरला.. याचं दिग्दर्शन गुलज़ारजींनीच केलं होतं. या सिनेमाकतील एक एक गीत म्हणजे रत्न ठरलं. यातीलच एक म्हणजे हे.. गुलज़ार यांच्या वैयक्तिक जीवनाशी जवळचं वाटतं.
दो दिवाने शहर में..
घरौंदा चित्रपटातील हे गीत.. याचंच दुसरं व्हर्जन म्हणजे `एक अकेला इस शहर में...` दोन्ही गीतं म्हणजे सर्वसामान्य माणसाची घर गेण्यासाठी चाललेली धडपड दाखवणारं प्रत्यतकारी चित्रणच...
मुसाफिर हूं यारों...
कुणालाही आपलंसं वाटावं असंच हे गीत... एकटेपणाचं आणि त्यातील आनंदाचं यथार्थ वर्णन खास गुलजार शैलीत...
तुझसे नाराज नही जिंदगी
मासूम चित्रपटातील सर्वांग सुंदर गीत.. आय़ुष्याला विचारलेला हा प्रश्न कुणालाही आपलासा वाटावा असा... गाणं ऐकताना डोळ्यांतून नकळत पाणी येतंच...
छोड आये हम वो गलीयाँ
माचिस चित्रपटातील काळजाला भिडणारं गाणं.. खलिस्तान चळवळीत सहभागी होऊ घातलेले, खरंतर वाममार्गाला चाललेले.. पण आपल्या दृष्टीने शहीद व्हायला निघालेले तरुण आपल्या गावाची आठवण काढतात... आणि आपणही भावूक होतो...
ए अजनबी, तू भी कभी
आपल्या प्रियकराला हाक मारणं ही नवी संकल्पना नाही.. पण, गुलज़ारजींनी या गीताला आपला स्पर्श देऊन ते उच्चतम पातळीला नेले...
कजरा रे...
बदलत्या काळाचा गुलज़ार यांच्या लेखणीवर झालेला सुंदर परिणाम... आयटम गीत असूनही त्यातील काव्यात्मक दर्जा आणि गुलज़ार नावाचा आब वाढवणारं हे नव्या जमानाचं गीत...
दिल तो बच्चा है जी...
वयाची सत्तरी ओलांडल्यावरही आपल्यातील मुल आणि तारुण्य तितकंच ताजं असल्याची अनुभूती देणारं गीत.... एकेक शब्द मनात घर करून राहाणारा...
पहली बार मोहब्बत की है...
तरुण भावनांचं गोडसं वक्य होणं... ऐकतानाच कुणाच्याही प्रेमात पडावंसं वाटायला लागतं...हे गाणं पहिल्या प्रेमाच्या भावना जाग्या करतं...
जय हो...
हॉलिवूड गाजवणारं आणि गुलज़ारजींना ऑस्कर पुरस्कार देणारं हे गीत.. शब्द तितकेच समर्थ.. तितकेच आक्रमक... हिंदी गीतांना जागतीक मान मिळवून देणारे एकमेवाद्वितीय... गुलज़ार....
/marathi/slideshow/शब्दप्रभू-गुलज़ार_110.html