१९९३ बॉम्बस्फोट: संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा
www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाकडे साऱ्य़ांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे संजय दत्त याला सगळ्यात मोठा झटका बसला आहे.
याआधी संजय दत्त याने १८ महिन्यांचा तरूंगावास भोगला होता. बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे संजय दत्तला आणि साडेतीन वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, एक वर्ष कमी करून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
संजय दत्त याने देखील कोर्टाचा निकाल मान्य केला आहे. संजय दत्तच्या वकिलांनी संजयला हा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. संजय दत्तला चार आठवड्यात पोलिसांना शरण जावे लागणार आहे.
मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तच्या निर्दोष मुक्ततेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ‘टाडा` न्यायालयाचा संजय दत्तला दोषी ठरविण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी सीबीआयने केली होती.
१९९३ बॉबस्फोट निकाल : १० आरोपींची फाशी रद्द
www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ बॉ़म्बस्फोटांप्रकरणी आज ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येत आहे. या खटल्याचे निकाल वाचन सुप्रीम कोर्टात सुरू आहे. टाडा कोर्टाने ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मात्र या १० आरोपींची फाशी रद्द केली आहे.
दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालात मुन्नाभाई संजय दत्तचं काय होणार याकडं साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. थोड्याच वेळात संजय दत्तच्या आरोपांबाबत निकाल सुनावण्यात येणार आहे.
- अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
- बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार मोकाटच
- बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा सहभाग
- निकालानंतर अपील करण्याची परवानगी नाही
- टाडा कोर्टानं ११ आरोपींना सुनावली होती फाशीची शिक्षा
- याकूब वगळता इतर दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द
- दहशतवाद हा प्लेग रोगासारखा - सर्वोच्च न्यायालय
- १० आरोपींची फाशी रद्द करून जन्मठेपेची ठोठावली शिक्षा
- सिनेमाचं चित्रिकरण रद्द करून संजय दत्त घरी परतला
- कस्टम अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही सर्वोच्च न्यायालयानं ओढले ताशेरे
- याकूब हा टायगर मेमनचा भाऊ
- याकूब मेमन याची फाशी कायम
- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम
www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटात याकूब यानं महत्त्वाचा भूमिका निभावल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. टाडा कोर्टानं ११ आरोपींना सुनावली होती फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यातील याकूब वगळता इतर दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. निकाल देण्यास उशीर झाल्यानं १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय.
१९९३ च्या बॉम्बस्फोटात टाडा न्यायालयानं ३१ जुलै, २००७ ला संजय दत्तसह १०० आरोपींना शिक्षा सुनावली होती. तर २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. फरारी आरोपी टायगर मेमन याचा भाऊ याकूब मेमन याच्यासह ११ आरोपींना फाशीची शिक्षा, २० आरोपींना जन्मठेप तर उर्वरित आरोपींना पाच ते दहा वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. संजय दत्तला दहशतवादी कृत्याच्या शिक्षेतून सूट मिळाली असली तरी त्याला एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल शस्त्रास्त्र कायद्याखाली सहा वर्षोची शिक्षा देण्यात आली होती. फाशी झालेल्या बारापैकी एका आरोपीचे निधन झाले असून, जन्मठेपेच्या वीसपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
दहशतवाद हा प्लेग रोगासारखा - सर्वोच्च न्यायालय
www.24taas.com, नवी दिल्ली
वीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातील अंतिम निकाल वाचनास सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कस्टम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचवेळी दहशतवाद हा प्लेग रोगासारखा आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हटले.
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाची सर्वोच्च न्यायालय आज गुरुवारी सुनावणी झाली. अभिनेता संजय दत्तसह शंभर जणांवरील निर्णय आज सुनावला गेला. प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, अन्य दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना कोर्टानं जन्मठेप सुनावली आहे.
बॉम्बस्फोट खटल्यातील अन्य दहा जण अशिक्षित आणि गरीब होते. त्यांना प्याद्यासारखं वापरण्यात आलं, असं नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सहानुभूती दाखवली आहे. तर संजय दत्तला सहा वर्षांची झालेली शिक्षा कमी करून पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अभिनेता संजय दत्त याला सहा वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. संजय दत्तनं यापूर्वी १८ महिन्यांचा कारावास भोगलेला आहे. त्यामुळं आता त्याला पुन्हा पोलिसांना शरण जावं लागणार आहे. चार आठवड्यात संजय दत्तला शरणागती पत्करावी लागणार आहे.
संजय दत्त खंबीर, शिक्षा भोगेलच - संजयचे वकील
www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि दंगलीदरम्यान विनापरवाना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजयला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपले संजयशी बोलणे झाले असून त्याने या शिक्षेचा स्वीकार केला असल्याचे मानेशिंदे यांनी सांगितले.
सुनावणीच्या काळात संजयने याआधी दीड वर्ष तुरुंगात काढले असल्याने त्याला आता साडेतीन वर्ष तुरूंगात काढावी लागणार आहेत. बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या गंभीर आरोपातून संजयची मुक्तता करण्यात आली होती. मात्र, बेकायदेशीररित्या एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल त्याला नोव्हेंबर २००६ साली दोषी ठरवण्यात आले होते.
मी खंबीर राहिन – संजय दत्त
निकाल जाहीर झाल्यावर संजय दत्तला अश्रू अनावर झाले. त्याने निराश होऊन आपल्या परिवाराला आलिंगन दिले. यावेळी मान्यता दत्त त्याचा हात पकडून उभी होती. ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. या निकालासाठी संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्त या निकाल लागण्याआधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. संजय दत्तही चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत असताना मात्र तो अस्वस्थ झाला आणि चित्रिकरण अर्ध्यावरच सोडून तो घरी परतला होता.
निकाल लागल्यानंतर मात्र संजय दत्त धीरानं पत्रकारांना सामोरं गेला. यावेळी त्यानं ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा मात्र वेगळंच सांगत होती.
सध्या बॉलिवूडमध्ये संजय दत्तवर अडीचशे कोटींपेक्षा जास्त पैसे लागले आहेत. अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये तो व्यस्त आहे. परंतू, येत्या चार आठवड्यांमध्ये संजय दत्तनं पोलिसांना शरण यावं, असे आदेश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे संजयच्या अनेक शुटींग्स रखडण्यात येतील किंवा निर्मात्यांना पर्याय शोधावा लागणार आहे.
संजय दत्त करणार पुनर्विचार याचिका दाखल
www.24taas.com, नवी दिल्ली
संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कमी करण्यासाठी संजय दत्तकडून प्रयत्न केले जाणार आहेत. संजय दत्तसाठी शिक्षा कमी करण्याचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे.
संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्त आता पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे समजते आहे. शिक्षेवर पुनर्विचार करण्यात यावा यासाठी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षा कमी करुन घेण्यासाठी हा त्याचा शेवटचा प्रयत्न असेल. नाहीतर आणखी साडेतीन वर्ष त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे हे पुर्नविचार याचिका दाखल करणार आहेत.
संजयला शिक्षा, प्रिया दत्त यांना अश्रू झाले अनावर
www.24taas.com, मुंबई
अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनविण्यात आली. गेले २० वर्ष हा खटला सुरू होता. त्यामुळे या हाय प्रोफाईल खटल्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. आज खटल्याचा निकाल सुनविण्यात आल्यानंतर संजय दत्तने निकाल मान्य असल्याचे मान्य केले. तर दुसरीकडे त्याची बहीण आणि खासदार प्रिया दत्त यांना मात्र अश्रू अनावर झाले.
संजय दत्त याला शिक्षा झाल्याचे जाही झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी विचारले असता, त्यांनी कोणीतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र याच वेळेस त्यांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही. आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
संजय दत्तला ६ वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. त्यानं यापूर्वी १८ महिन्यांचा कारावास भोगलेला आहे. त्यामुळं आता त्याला पुन्हा पोलिसांना शरण जावं लागणार आहे. चार आठवड्यात संजय दत्तला शरणागती पत्करावी लागणार आहे.
...आणि संजूबाबालाही रडू कोसळले
www.24taas.com, मुंबई
निकाल जाहीर झाल्यावर संजय दत्तला अश्रू अनावर झाले. त्याने निराश होऊन आपल्या परिवाराला आलिंगन दिले. यावेळी मान्यता दत्त त्याचा हात पकडून उभी होती. ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. या निकालासाठी संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्त या निकाल लागण्याआधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. संजय दत्तही चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत असताना मात्र तो अस्वस्थ झाला आणि चित्रिकरण अर्ध्यावरच सोडून तो घरी परतला होता.
निकाल लागल्यानंतर मात्र संजय दत्त धीरानं पत्रकारांना सामोरं गेला. यावेळी त्यानं ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा मात्र वेगळंच सांगत होती.
सध्या बॉलिवूडमध्ये संजय दत्तवर अडीचशे कोटींपेक्षा जास्त पैसे लागले आहेत. अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये तो व्यस्त आहे. परंतू, येत्या चार आठवड्यांमध्ये संजय दत्तनं पोलिसांना शरण यावं, असे आदेश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे संजयच्या अनेक शुटींग्स रखडण्यात येतील किंवा निर्मात्यांना पर्याय शोधावा लागणार आहे
मुंबईत का झाले होते बॉम्बस्फोट? : घटनाक्रम
www.24taas.com, नवी दिल्ली
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. या घटनेचा आणि खटल्याचा थोडक्यात घनटाक्रम.
अभिनेता संजय दत्त याला सहा वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि सीबीआयने दाखल केलेल्या विविध याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुरू होती. याच प्रकरणी १९९३ मध्ये संजय दत्तने १८ महिने तुरुंगवासही भोगला आहे.
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तच्या निर्दोष मुक्ततेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ‘टाडा` न्यायालयाचा संजय दत्तला दोषी ठरविण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी सीबीआयने केली होती.
१९९३ मुंबई स्फोटाचा निकाल आणि घटनाक्रम
>संजय दत्तला साडेतीन वर्षे काढावी लागणार तुरुंगात.
>संजय दत्तला पाच वर्षांचा तुरुंगवास.
>संजय दत्तन याआधीच १८ महिने तुरुंगवास भोगलाय
>याकूब मेमन आणि इतर फरार आरोपी हे `तिरंदाज` -
सर्वोच्च न्यायालय
>इतर गुन्हेगार त्यांचे `बाण` - सर्वोच्च न्यायालय
>संजय दत्त मानसिकदृष्ट्या सक्षम - संजय दत्तचे वकील
>गुन्ह्याचे स्वरूप आणि ती परिस्थिती खूपच गंभीर सर्वोच्च न्यायालय
>संजय दत्तला `प्रोबेशन`वर सोडता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
>टाडा न्यायालयाने सुनावलेल्या १८ जणांच्या जन्मठेपेपैकी १६ जणांची शिक्षा कायम
>बॉम्बस्फोटांचा प्रमुख याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम
>मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या दहा जणांना आता जन्मठेप
>१९९३च्या बॉम्बस्फोटांमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयचा हात
>या स्फोटांसाठी पोलीस, तटरक्षक दल आणि कस्टम अधिकाऱ्यांचा हात
>दाऊद इब्राहिम आणि इतरांचा या स्फोटात हात
>या स्फोटांचा नियोजन आणि कट पाकिस्तानमध्ये
>स्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण मिळाले
>मार्च १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट
>१९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून बॉम्बस्फोट
१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा
www.24taas.com, मुंबई
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.
याप्रकरणी संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
बॉम्बस्फोट आणि संजय दत्त
> २१ मार्च २०१३ : सुप्रीम कोर्टाकडून संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा, चार आठवड्यांमध्ये शरणागती पत्करण्याचे आदेश.
> २० ऑगस्ट २००७ : सुप्रीम कोर्टाकडून संजय दत्तला जामीन मंजूर
> २ ऑगस्ट २००७ : संजय दत्तला पुन्हा अटक, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये रवाना
> जुलै २००७ : संजय दत्त बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे ६ वर्षांची शिक्षा
> २८ नोव्हेंबर २००६ : टाडा अंतर्गत सर्व केसेसमध्ये आर्म ऍक्ट्स अंतर्गत संजय दत्त दोषी
> २७ नोव्हेंबर २००६ : टाडा कोर्टचा संजय दत्तला समन्स
> १६ ऑक्टोबर १९९५ : जेलमध्ये असताना संजय दत्तेने चिफ जस्टीला पत्र लिहलं, ज्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. लेटर पिटीशन म्हणून दाखल. १८ महिने तुरुंगात घालवण्यानंतर संजय दत्तला जामीन मिळाला.
> ११ सप्टेंबर १९९५ : ट्रायल कोर्टने संजय दत्तचा जामीन फेटाळला.
> २२ जुलै १९९५ : मैत्रीण जिच्याशी नंतर विवाहबद्ध झाला त्या रेहा पिल्लाईला भेटण्यासाठी संजय दत्तला कोर्टाने संमती दिली. ती आजारातून बरी झाली होती.
> २० नोव्हेंबर १९९४ : संजयने आपला कबुलीजबाब फिरवला
> ४ जुलै १९९४ : ट्रायल कोर्टने संजय दत्तचा जामीन रद्द केला. संजय दत्तला पुन्हा अटक
> ४ नोव्हेंबर१९९३ : संजय दत्तविरोधात चार्जशीट दाखल
> ५ मे १९९३ : संजयन दत्तला बॉम्बेहाय कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर. ट्रायल कोर्टच्या संमतीने जामीन
> २८एप्रिल १९९३: संजय दत्तने पोलिसांसमोर कबुली दिली
> १९ एप्रिल १९९३ : एके- ५६ रायफल आणि ९ एमएम पिस्तुल बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी सजंय दत्तला मुंबई क्राईम ब्रँचकडून अटक. मॉरिशसहून परताना एअरपोर्टवर केली अटक
का केलेत बॉम्बस्फोट?
>१९९३च्या बॉम्बस्फोटांमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयचा हात
>या स्फोटांसाठी पोलीस, तटरक्षक दल आणि कस्टम अधिकाऱ्यांचा हात
>दाऊद इब्राहिम आणि इतरांचा या स्फोटात हात
>या स्फोटांचे नियोजन आणि कट पाकिस्तानमध्ये
>स्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण मिळाले
>मार्च १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट
>१९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून बॉम्बस्फोट
/marathi/slideshow/संजूबाबा-मुन्ना-नाही-भाईचं_210.html