बीबीसी न्यूज इंडिया
सरबजित सिंग: भारतीय `गुप्तहेरा`चा पाकिस्तान हल्ल्यात मृत्यू
पाकिस्तानने सदोष आरोपी ठरवलेला भारताचा हेर याचा मृत्यू झाला आहे. लाहोरच्या इतर आरोपींनी त्यावर विटेनी हल्ला केला होता. त्या हल्लेत तो गंभीर जखमी झाला होता.
अलजजीरा (अरब)
पाकिस्तान जेल हल्ल्यात भारतीय `गुप्तहेरा`चा मृत्यू
गेल्या आठवड्यात सरबजितवर विटेने वार करण्यात आले होते. त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.
हफिंगटन पोस्ट (अमेरिका)
पाकिस्तानी जेल हल्ल्यात भारतीय `हेरा`चा मृत्यू
पाकिस्तानात मृत्यदंडाची शिक्षा भोगणाऱ्या भारतीय हेराचा अखेर मृत्यू झाला आहे. जेलमधील इतर दोन आरोपींना त्याच्यावर विटेने वार केल्यावर त्याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली होती.
डेलीमेल (ब्रिटन)
पाकिस्तानी जेल अधिकाऱ्यांनी `सरबजीतला मारा` असे आदेश दिल्याचा कैद्यांनी केला दावा
लाहोरमधील जेल हल्ल्यात मृत पावलेल्या सरबजितवर हल्ला करण्याचे आदेश जेल अधिकाऱ्यांकडून आले असल्याचा धक्कादायक खुलासा पुढे आला आहे.
न्यूयॉर्क टाईम्स (अमेरिका)
भारतीय कैद्याचा हल्ल्यात पाकिस्तानमध्ये मृत्यू
भारतीय कैद्याचा पाकिस्तानात सहकैद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
वॉशिग्टन पोस्ट (अमेरिका)
पाकिस्तानी सहकैद्यानी केलेल्या हल्ल्यात भारतीय हेराचा मृत्यू
गुप्तहेरीच्या आरोपात दोषी ठरलेला आणि पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा भोगणाऱ्या भारतीय हेर सरबजीतचा मृत्यूशी झुंज देताना अखेर मृत्यू झाला आहे.
शिन्हुआ (चीन)
भारतीय हेराच्या मृत्यूवर भारतीय पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
गुरूवारी भारतीय पंतप्रधानांनी सरबजीतच्या मृत्यूच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे.
डॉन (पाकिस्तान)
लाहोरच्या जिन्हा हॉस्पिटलमध्ये सरबजीतचा मृत्यू
भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तान सरकारकडे सरबजितसाठी न्याय मागितला आहे. इतर कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजीत गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
द एक्सप्रेस ट्रिब्यून ( पाकिस्तान)
सरबजीतच्या मृत्यूप्रकरणी दोन जणांवर कारवाई; भारताने केली न्यायाची मागणी
पाकिस्तान सरकारने सरबजीतच्या मृत्यूप्रकरणी दोन जणांवर कारवाई केली असल्याची माहिती पाकिस्तान अधिकाऱ्यांनी कळवली.
/marathi/slideshow/सरबजित-हत्या-परदेशी-वृत्तपत्रकांनी-कशी-घेतली-दखल_222.html