राजकारणावर बॉलीवूडचे सिनेमे
राजकारणावर आधारीत विषय आणि उपहास हा भारतीय चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. राजकारणातील वाईट गोष्टींवर या चित्रपटांमध्ये भाष्य केलेलं दिसून येतं. भ्रष्टाचार आणि घोटाळे यांचे दुष्परीणाम, अशा विषयांमुळे देशात चांगले राजकारणी निर्माण करण्यास मदत होते.
आंधी
वादग्रस्त आणि राजकारणावर तयार झालेल्या चित्रपटातील एक अप्रतिम चित्रपट म्हणून `आंधी`ची ओळख आहे. आंधी हा चित्रपट तयार झाला, तेव्हा तो इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे, अशी जोरदार चर्चा होती. सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांच्या अभिनयाने चित्रपटात जिवंतपणा आला आहे. या चित्रपटावर 1972 च्या दरम्यान आणीबाणी सुरू असतांना बंदी आणण्यात आली होती. दोन वर्षानंतर या चित्रपटावरील बंदी हटवण्यात आली आणि हा चित्रपट राष्ट्रीय टेलिव्हिजन वाहिनीवर दाखवण्यात आला. या चित्रपटाला 7 फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले. यात सर्वोत्कृ्ष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समावेश होता.
दिग्दर्शक - गुलझार
अभिनेते - संजीव कुमार, सुचित्रा सेन
हू तू तू
गुलझार यांचा हा सिनेमा आधुनिक राजकारणावर तयार करण्यात आला आहे. गुलझार यांनी दिग्दर्शित केलेला हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे. हतूतू चित्रटात तरूणांच्या मनात भ्रष्टाचारामुळे यांच्यामुळे तरूणांच्या मनात असेलली चिड या सिनेमात मांडण्यात आली आहे. हा सिनेमाचं कथानक अतिशय मजबूत आहे, तब्ब आणि सुनील शेट्टी याच्यात मुख्य कलाकार आहेत.
दिग्दर्शक - गुलझार
अभिनय- तब्बू, नाना पाटेकर, सुनील शेट्टी, सुहासिनी मुळे, शिवाजी साटम, मोहन आगाशे, कुलभूषण खरबंदा.
युवा
या सिनेमा हिंदी आणि तमिळ या दोन्ही भाषेत बनवण्यात आला आहे. युवा हा युवा-मुलांवर आधारीत आहे. हा सिनेमाची स्टोरी टेलिंग स्टाईल अनोखी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय राजकारणात क्रांती आणि सुधारणांची गरज आहे, यासाठी राजकारणात युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. या सिनेमामुळे युवकांची राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करणारा आहे, आणि व्यवस्थेत चांगले बदल करण्याची गरज असल्याचं यात मांडण्यात आलं आहे.
दिग्दर्शक : मनी रत्नम
अभिनय - अजय देवगन, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, विवेक ओबेरॉय, करिना कपूर, इशा देवोल, सोनू सूद.
नायक
अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात अनिल कपूर हा व्यवस्थेत चांगले बदल करणार नायक दाखवण्यात आला आहे. नायकाच्या काही आयडीयांमुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचार काही दिवसात दूर होत असतात. हा चित्रपट फील गूड प्रेक्षकांना देतो यामुळे प्रेक्षकांमध्ये राजकारणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो. अमरिश पुरीला भ्रष्टाचार माजवणार खलनायक दाखवण्यात आला आहे.
दिग्दर्शक -एस शंकर
अभिनय - अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरिश पुरी, परेश रावल
सत्ता
सत्ता हा चित्रपट अंडरवर्ल्ड, व्यावसायिक, भ्रष्ट पोलिस अधिकारी आणि राजकारण्यांचे संबंध दाखवणारा चित्रपट आहे. हे संबंध प्रस्थापित करण्यासाठी महिलांचा पुरूषांकडून कसा वापर केला जातो याचं चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
अभिनय - रविना टंडन, अतुल कुलकर्णी, गोविंद नामदेव.
गुलाल
राजकारणावर प्रभावी आणि उत्कट भाष्य करणार अनुराग कश्यपचा गुलाल हा चित्रपट काही कारणांमुळे मागील 3 वर्षांपासून रखडून होता. या चित्रपटात सत्तेसाठी संघर्ष कोणत्या टोकाला आणि कसा जातो. यात विद्यार्थी दशेतील राजकारण, राज घराण्यांचा सत्तेसाठीचा संघर्ष यात दाखवण्यात आला आहे.चित्रपटात के के मेननने सर्वोत्कृष्ट, डोळे खिळवून ठेवणार अभिनय केला आहे.
दिग्दर्शक - अनुराग कश्यप
अभिनय - राजसिंह चौधरी, के के मेनन, दीपक डोबरियाल, माही गिल, जेसे रंधवा, आदित्य श्रीवास्तव, पियुष मिश्रा आणि अभिमन्यू सिंग.
मेरे अपने
राजकारणात सुशिक्षित तरूणांचा कसा वापर होतो, यावर हा सिनेमा आधारलेला आहे. एका आजीच्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलांचा राजकारणी कशा पद्धतीने वापर करून घेतात. हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
दिग्दर्शन : गुलझार
अभिनय - विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, मीना कुमारी
राजनीती
हा सिनेमा 2010 मध्ये आला, या सिनेमातील राजकीय नाट्य हे `महाभारत` आणि `गॉ़ड फादर`वर आधारीत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 143 कोटी रूपये कमवले.
दिग्दर्शन - प्रकाश झा
अभिनय - रणबीर कपूर, कटरिना कैफ, अर्जन रामपाल, अजय देवगन, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी, नशरूद्दीन शहा
किस्सा कुर्सी का
हा सिनेमा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या राजकारणावर आधारीत उपहास असल्याचं सांगण्यात येत, या सिनेमात शबाना आझमी, राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा आणीबाणी दरम्यान आला होता. या सिनेमावर बंदी लावण्यात आली होती.
दिग्दर्शन- अम्रित नहाटा
अभिनय - शबाना आझमी, राज बब्बर, उत्पल दत्त, रेहाना सुल्तान, मनोहर सिंह
/marathi/slideshow/सिनेमा-आणि-भारतीय-राजकारण_318.html