सोनाक्षी सिन्हा
२ जुन १९८७ रोजी अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम सिन्हा यांना सोनाक्षी सिन्हा ही मुलगी झाली. सोनाक्षीने सुरूवातीच्या काळात फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नशिबाने तिला अभिनय क्षेत्रात आणलं आणि आज ती नव्या अभिनेत्रींमध्ये सर्वांत बिझी आणि उद्याची यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचं दिसणं ८० च्या काळातल्या अभिनेत्रींसारखं असल्यामुळे तिला सर्व पिढ्यांतील लोकांनी पसंत केलं आहे. आज ती २६ वर्षांची झाली आहे.
करिअर
SNDT, मुंबई मधून सोनाक्षीने फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. २००५ साली तिने मेरा दिल लेके देखो या सिनेमासाठी कॉश्च्युम डिझायनिंग केलं होतं. पण लवकरच तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यापूर्वी तिला आपलं वजन खूप कमी करावं लागलं होतं.
दबंग
२०१० साली सलमान खानने सोनाक्षीला आपल्या दबंग या सिनेमाची ऑफर दिली. या सिनेमात सोनाक्षीला गावातल्या भोळ्या भाबड्या रज्जोची भूमिका केली होती. सोनाक्षीच्या पहिल्याच सिनेमाने १०० कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमात ती सगळ्यांना आवडली.
रावडी राठोड
‘दबंग’ सिनेमासाठी सोनाक्षी सिन्हा बेस्ट डेब्युचा अवॉर्ड मिळाला. यानंतर तिचा दुसरा सिनेमा ‘रावडी राठोड’ही २०१२ साली आला. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत झळकली. हा सिनेमाही जबरदस्त हिट झाला. या सिनेमानेही १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
जोकर
`रावडी राठोड` सिनेमांनंतर सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार याच जोडीने जोकर या सिनेमात काम केलं. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. तरीही सोनाक्षी सिन्हा सगळ्यांची फेव्हरेट बनली.
OMG- ओह माय गॉड
ओह माय गॉड या सिनेमात सोनाक्षीने आयटम साँगही केलं. साक्षात प्रभूदेवासोबत सोनाक्षी सिन्हा गो गो गो गोविंदा या गाण्यावर थिरकली. या गाण्यात सोनाक्षीने अफलातून डान्स केला. तसंच दही हंडीही फोडली.
सन ऑफ सरदार
सन ऑफ सरदार या सिनेमात अजय देवगण आणि संजय दत्त सोबत सोनाक्षी सिन्हाने धमाल केली. या सिनेमात सोनाक्षी पक्की पंजाबी मुलगी वाटली. या सिनेमातही तिने गोड अभिनय केला होता. या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर १५० कोटींच्या वर कमाई केली. १०० कोटींच्या वर कमाई करणारा सोनाक्षीचा हा तिसरा सिनेमा होता.
दबंग २
`दबंग`च्या यशानंतर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी पुन्हा त्याच अंदाजात `दबंग २` सिनेमात दिसले. या सिनेमामध्ये रज्जोही चुलबुल पांडेसमोर दबंगच दाखवली होती. या सिनेमानेही १०० कोटींच्या वर कमाई केली. त्यामुळे सोनाक्षीचे ४ सिनेमे १०० कोटींच्या वर कमाई करणारे ठरले. तिला `लकी` अभिनेत्री मानलं जाऊ लागलं.
हिम्मतवाला
१९८३ सालच्या हिम्मतवाला या सिनेमाचा साजिद खानने केलेल्या रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हाचं स्पेशल आयटम साँग होतं. `थँक गॉड इट्स फ्रायडे` या गाण्यात तिला ८० च्या दशकातला कॉश्च्युम दिल्यामुळे ती अगदी ८०च्या दशकातली अभिनेत्री वाटत होती.
सोनाक्षीचे अभिनेते
सोनाक्षीला तिच्या वयाच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळत नव्हती. तिचा फेव्हरेट अभिनेता ऋतिक रोशन याच्यासोबत काम करण्याची तिची इच्छा आहे. मात्र तिचे सर्वच अभिनेते तिच्यापेक्षा वयाने दुप्पट होते. रणबीर कपूर, रणवीर सिंग या अभिनेत्यांसोबत तिला काम करायचं आहे, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
लुटेरा
आगामी लुटेरा या सिनेमात सोनाक्षी बंगाली चित्रकार मुलीची भूमिका करत आहे. या सिनेमात तिचा नायक रणवीर सिंग आहे. पहिल्यांदाच सोनाक्षी आपल्या वयाच्या अबिनेत्यासोबत काम करत आहे.
वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन
नुकताच तिच्या वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई अगेन या सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच झाला आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि इमरान खान दिसणार आहेत.
/marathi/slideshow/सोनाक्षी-सिन्हा_227.html