एक्सपिरिया एम
स्मार्टफोनच्या जगात सोनी कंपनीने आपले स्थान भक्कम केले आहे. एक्सपिरिया झेडनंतर एक्सपिरिया एम हा स्मार्टफोन सोनीने बाजारात आणलाय. नवीन टेक्नॉलॉजी आणि दिसायलाही आकर्षक, असे या स्मार्टफोन फोनचे वैशिष्ट्ये आहेत. दुहेरी सिम असणारा एक्सपिरिया हा या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे. एक नजर टाकूया सा नव्या स्मार्टफोनच्या वैशिष्टयांवर
सोनीचा `एक्सपिरिया एम`
सोनीने बाजारात आणखी एक स्मार्टफोन आणलाय. स्मार्ट आणि किमतीत तो आघाडीवर आहे. वन टच फंक्शन यात आहे. तो स्मार्ट फीचरवर आधारित आहे. एक्सपिरिया एम. आकर्षक डिजाईन, हाय क्वालिटी स्क्रीन, स्मार्ट कॅमेरा, उत्तम फोटो क्वालिटी, असे या एक्सपिरिया एमचे फिचर आहेत.
एक्सपिरियाचा लूक
सोनी कंपनीचा एक्सपिरियाचा नवा लूक असणार आहे. एकदम चकचकीत आणि हळूवार स्पर्शची जाणीव या मोबाईलमधून मिळेल. एक्सपिरिया एम दिसायला ओम्नीबॅलन्सारखाच आहे.
एक्सपिरिया मॅजिक
मित्रांसोबत आनंदाचे क्षण, आवडतं म्युझिक शेअर करण्यात वेगळाच आनंद असतो. हा आनंद तुम्ही एक्सपिरिया एमच्या साथीने नक्कीच पूर्ण करू शकता. हे सगळ फक्त एका क्लिकवर. बटने नाहीत, वायर्स नाहीत. एक्सपिरिया एमच्या साथीने एक वेगळा अनुभव घेता येणार आहे.
स्मार्टफोन ते स्पीकर
तुम्हाला संगीत ऐकण्याची आवड असेल तर या स्मार्टफोनच्या माध्यमातून ते तुम्ही घेऊ शकता. यासाठी सोनी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ब्लु टूथ स्पीकर आहे. त्यामुळे तुमची संगीताची आवड नक्कीच पूर्ण होईल. एकदाच तुमचा फोन स्पीकरच्या विरुद्ध दिशेला टॅप करा आणि मोठ्या आवाजातील संगीताचा आनंद घ्या.
स्मार्टफोन ते बिग स्क्रीन
तुम्हाला आनंदाचे क्षण मोठ्या पडद्यावर बघायचे आहेत का? ही पण सोय आहे, एक्सपिरिया एममध्ये. तुमचा एमएफसी ब्रॅव्हियाच्या रिमोटला टच करा आणि आनंद घ्या मोठ्या पडद्यावर पाहण्याचा.
संगीत आणि एक्सपिरिया एम
मोबाईल, टॅब्लेट आणि कंम्प्युटरपेक्षा एंटरटेनमेंटचा अधिक चांगला अनुभव देणारा असा हा एक्सपिरिया एम. यातील वॉकमन, अल्बम आणि मूव्ही अॅपचा वापर करून आपण आपल्याकडील माहिती शेअर करू शकतो आणि ऑनलाईन वा ऑफलाईन त्याचा आनंद घेऊ शकतो.
आकर्षक डिझाईन
यातील डिझाईन्सही खूप आकर्षक आहेत.. फक्त सेन्स असणारा असा हा स्मार्टफोन हातात घेतल्यावर कळतही नाही इतका स्लिम आहे.एक सुंदर आणि वेगळाच अनुभव हा फोन हाताळल्यानंतर मिळतो.
वनटच बॅकअप
या फोनमध्ये सोनीचं पर्सनल कंटेन्ट स्टेशन आहे. ज्यात आपण टॅब्लेट आणि कॅमेरामधून घेतलेले फोटो आणि व्हिडीओ स्टोर करू शकतो. तसचं वनटच बॅकअप असल्याने हा फोन वापरण्यास मज्जा येते.
फोटोग्राफीचा नवा अनुभव
या स्मार्टफोनमुळे तुम्ही फोटोग्राफीचा एक नवा अनुभव घेऊ शकता. फोटो काढण्याचा अनुभव द्विगुणित होतो. तुम्हाला तुमचे खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात का. एक्सपिरिया एमच्या ४ हाय क्वालिटी डिस्प्लेमधून तुम्ही ते चांगले क्षण जिवंत करु शकतात.
मिळवा एचडी सारखा अनुभव
एक्सपिरिया एमचा कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. तसेच यात ऑटो फोकस, फोन लॉक असताना फोटो काढण्याची सुविधा, फास्ट कॅप्चर फंक्शन या सगळ्या वैशिष्टयांमुळे फोटो काढतानाचा अनुभव खरच वेगळा आणि मस्त असणार आहे.
खास वैशिष्ट्ये
एक्सपिरिया एम ड्युअलचे एक खास वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या सिमचा वापर एकावेळेस करायचाय फक्त एका क्लिकवर हे शक्य आहे. एक्सपिरिया एम आणि एक्सपिरिया एम ड्युअल हे दोन्ही फोन तीन रंगात उपलब्ध आहेत. काळा, पांढरा आणि जांभळ्या रंगात मिळू शकतो. पिवळा रंग फक्त एक्सपिरिया एमसाठीच आहे.
/marathi/slideshow/सोनीचा-एक्सपिरिया-एम_234.html