अँडी 4डी आय स्मार्टफोन
आयबॉलचा नवा स्मार्टफोन `अँडी 4डी आय स्मार्टफोन` नुकताच लाँच झालाय. हा नवा स्मार्टफोन तुमच्या खिशाला परवडणारा आहे.
किंमत आणि सुविधा
आयबॉलचा हा नवा स्मार्टफोन मिळणार आहे फक्त ६ हजार रुपयांत. महागड्या फोनमध्ये ज्या सगळ्या सुविधा त्या सगळ्या तुम्हाला यात मिळतात. त्यामुळे कमी किंमतीत जास्त लाभ.
काय आहेत फिचर्स
अँडी4डी आय स्मार्टफोनचा डिस्प्ले ४ इंचाचा आहे. यात ४८० X ८०० पिक्सेल रिझोल्यूशन आहे. याच्या डिस्पलेमध्ये आय़पीएस टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलाय. यात १ गीगाहर्टझ कॉरटेक्स ए ९ प्रोसेसरचा वापर करण्यात आलाय. यातील रॅम ५१२ एमबी आहे तर इंटरनल मेमरी ४ जीबीची आहे. परंतु मायक्रो एसडीचा वापर करुन याची मेमरी ३२ जीबीपर्य़ंत वाढवता येते.
कॅमेरा आणि अँडी 4डी आय
यात १७०० एमएएचच्या बॅटरीचा वापर करण्यात आलाय. तसेच याचा कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे तर फ्रंट कॅमेरा `व्हिजीए` क्वालिटीचा आहे. यात फ्लॅशची सुविधाही असल्याने कमी प्रकाशात ही तुम्ही चांगले फोटो काढू शकतात.
अँड्रॉईडची सुविधा
आयबॉलच्या ६ हजाराच्या `अँडी 4डी आय’मध्ये तुम्हाला ३जी आणि वायफायची सुविधा मिळणार आहे. आयबॉलचा हा नवा स्मार्टफोन अँड्राइड व्ही ४.० जेली बीन ओएसवर काम करतो.
/marathi/slideshow/स्वस्त-आणि-मस्त-अँडी-4डी-आय-स्मार्टफोन_245.html