जितेंद्र-१
गेल्या जमान्यातील आघाडीचा नायक जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी झाला. जितेंद्र यांचं खरं नाव रवी कपूर असं आहे. त्यांचं बालपण गिरगावातल्या चाळीत गेलं. भविष्यात आपल्या देखण्या रुपाने, अभिनयाने आणि अनोख्या नृत्यशैलीमुळे जितेंद्रने आपला काळ गाजवला.
जितेंद्र-२
जितेंद्र यांची कारकीर्द ३० वर्षांची आहे. १९६० ते १९९० या काळात जितेंद्र यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. ३० वर्षांमध्ये श्रीदेवी, जया प्रदा, हेमामालिनी आणि जया बच्चन यांसारख्या अभिनेत्रींसोबत जितेंद्रची जोडी जमली.
जितेंद्र-३
आपल्या काळात जितेंद्र यांनी अनेक अप्रतिम परफॉर्मंस दिले. ‘परिचय’, ‘हिम्मतवाला’, ‘बर्निंग ट्रेन’ या सिनेमांमधील त्याचा अभिनय आजही लोकांच्या लक्षात आहे. अनेक तरुण कलाकारही त्यांच्या अभिनयाची आणि स्टाइलची नक्कल करतात.
जितेंद्र-४
अभिनयासोबतच जितेंद्र यांचा डान्स लोकप्रिय झाला. आपल्या डान्समुळे जितेंद्र यांना ‘जम्पिंग जॅक’ हे नाव पडलं. आजही जितेंद्र यांना प्रेमाने लोक `जम्पिंग जॅक` म्हणतात.
जितेंद्र-५
आजही जितेंद्र यांचा चार्म कमी झालेला नाही. गिगरगावात बालपण घालवल्यामुळे जितेंद्र अस्खलित मराठी बोलतात. त्यांच्या घरी येणारा गणपती बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. आज सिनेमात काम करत नसूनही जितेंद्र `बालाजी टेलिफिल्म्स` या देशातील आघाडीच्या टीव्ही प्रोडक्शन कंपनीचे चेअरमन आहेत.
जितेंद्र-६
जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर आज यशस्वी तरूम महिला म्हणून गणली जाते. एकता कपूर बालाजी टेलिफिल्म्स संभाळते. तर मुलगा तुशार हा देखील बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता आहे.
/marathi/slideshow/हॅपी-बर्थडे-जीतेंद्र_214.html