Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

हॅपी बर्थडे माधुरी!

धक-धक गर्ल माधुरीचा प्रवास

धक-धक गर्ल माधुरीचा प्रवास


एका मध्यमवर्गीय हिंदू ब्राह्मण कुटुंबात माधुरीचा जन्म झाला. स्नेहलता आणि शंकर दीक्षित यांची ही लेक... ही मुलगी बॉलिवूडचा एक अढळ तारा बनेल याचा त्यावेळी कुणी विचारही केला नसेल. तिच्या सौंदर्यात आज ४६ वर्षानंतरही तसूभरही फरक दिसलेला नाही. लग्नानंतर कुटुंबाला प्राधान्य देऊन करिअरला रामराम ठोकणाऱ्या आणि काही वर्षानंतर पुन्हा कमबॅक करणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्रींपैकी माधुरी एक... तिचं कमबॅक बॉक्सऑफीसवर फारसं प्रभावी ठरलं नसलं तरी आपल्या नृत्यानं आणि मोहक हास्यानं ती आजही अनेकांना घायाळ करते.

माधुरीच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर...

माधुरीचं लहानपण आणि ‘कथ्थक’प्रेम...

माधुरीचं लहानपण आणि ‘कथ्थक’प्रेम...


कुटुंबामध्ये माधुरी ही तिच्या आईवडिलांची काही एकटीच मुलगी नाही. माधुरीला दोन बहिणी रुपा आणि भारती तसंच एक भाऊ - अजित – आहे. डिव्हाईन चाईल्ड हायस्कूलमधून तिनं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीमधून.

अभिनय हे काही माधुरीचं पहिलं प्रेम नाही तर माधुरीचं पहिलं प्रेम आहे ‘कथ्थक’. तीन वर्षांची असल्यापासून माधुरी कथ्थक नृत्य शिकत होती. नृत्यासाठी शाळेत असतानाही तिनं अनेक बक्षीसं जिंकली आहेत.

बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल – अबोध

बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल – अबोध


१७ वर्षांची असताना ‘राजश्री प्रोडक्शन’च्या अबोध या सिनेमातून माधुरीनं आपलं पहिलं-वहिलं पाऊल बॉलिवूडमध्ये टाकलं. सिनेमा पडला मात्र माधुरीनं प्रेक्षकांची आणि समीक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली. एका साध्या-सुध्या मुलीची भूमिका माधुरीनं या सिनेमात निभावली होती. एक अशी नवरी जी अजून इतकी लहान आहे की तिला विवाह म्हणजे काय आणि त्याच्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांशी ओळख होणं अजून बाकी आहे.

तेजाब

तेजाब


स्वाती, मानव हत्या सारखे काही फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर माधुरीला तिचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा मिळाला होता... तो म्हणजे तेजाब. या सिनेमात त्यावेळचा आघाडीचा हिरो अनिल कपूरलाही तिनं फिकं पाडलं होतं. या सिनेमानं माधुरीला बॉलिवूडमध्ये चांगलाच ‘ब्रेक’ दिला. ‘एक दो तीन...’ या गाण्यामुळे एका रात्रीत ती सामान्य मुलीची - आघाडीची अभिनेत्री बनली होती.

दिल

दिल


१९९० साली, माधुरी परफेक्शनिस्ट आमिर खान बरोबर ‘दिल’ या सिनेमात दिसली. एका गरिब मुलाच्या प्रेमात पडलेली पण एका श्रीमंत बापाच्या मुलीची भूमिका माधुरीनं मोठ्या खुबीनं वठवली होती. त्या साली हा सिनेमा बॉक्सऑफीसवर सर्वात हीट ठरला. माधुरीला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड याच सिनेमासाठी मिळालं होतं. ‘दिल’ हीट ठरल्यानंतर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये माधुरीचंही नाव जोडलं गेलं.

बेटा

बेटा


‘दिल’ आणि ‘साजन’ नंतर माधुरी पुन्हा एकदा अनिल कपूरसोबत ‘बेटा’ या सिनेमात दिसली. या सिनेमात अनिल कपूर मुख्य भूमिकेत असला आणि हिरोईनला तेवढं महत्त्व नव्हतं तरी माधुरीनं ‘धक धक करने लगा’ या गाण्याला चार चाँद लावले. तिनं तिची दखल घ्यायला प्रेक्षकांना भाग पाडलं. तिची प्रत्येक अदा, प्रत्येक नजर प्रेक्षकांना घायाळ करून गेली. तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून या सिनेमासाठी दुसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.

खलनायक

खलनायक


खलनायक... १९९३ सालात वादात अडकलेला हा सिनेमा. हा सिनेमा वादात अडकला होता कारण सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान संजय दत्तला जेलची हवा खावी लागली होती. हा सिनेमा एका गुन्हेगारावर आधारित होती आणि ती निभावली होती संजय दत्तनं... तरीही माधुरीनं आपल्या अभिनयाची चांगलीच झलक दाखवून दिली. ‘चोली के पिछे...’ गाण्यानं भल्याभल्यानं थिरकायला भाग पाडलं.

हम आपके है कौन...!

हम आपके है कौन...!


सलमान खान आणि माधुरीची भन्नाट जोडी राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके है कौन या सिनेमात पाहायला मिळाली. म्युझिकल रोमान्टिक कॉमेडी आणि फॅमिली ड्रामानं प्रेक्षकांना खेचून आणलं. बॉलिवूडमधल्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये या सिनेमानं आघाडी घेतली होती. संपूर्ण जगभरात या सिनेमानं त्या काळी १३५ करोडची कमाई केली होती. या सिनेमातील फक्त माधुरी आणि माधुरीचा डान्सच नाही तर माधुरीच्या कपड्यांचंही प्रेक्षकांना कौतुक केलं. तिचा हिरवा आणि पांढरा लेहेंगा आणि जांभळ्या रंगाची साडी भलतीच हिट ठरली होती.

दिल तो पागल है

दिल तो पागल है


१९९७ साली आलेल्या यश राज फिल्म्सच्या दिल तो पागल है या सिनेमानं प्रेक्षकांनाच पागल करून टाकलं होतं. या सिनेमात माधुरीसोबत करिश्मा कपूर आणि शाहरुख खान दिसले. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला होता. माधुरीला या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिचं पाचवं ‘फिल्मफेअर’ मिळालं होतं.

लग्न आणि संसार

लग्न आणि संसार


यशोशिखरावर असताना १९९९ साली माधुरीनं अनेकांची हृद्य तोडली जेव्हा तिनं अमेरिकास्थित हृदयविकार तज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाहगाठ बांधली. लग्नानंतर माधुरीनं बॉलिवूडला रामराम ठोकत अमेरिकेचा रस्ता धरला.

आईच्या भूमिकेत!

आईच्या भूमिकेत!


माधुरी ही दोन मुलांची आई आहे. आरिन आणि रेयान ही तिची दोन मुलं.

देवदास

देवदास


२००२ साली ‘शरतचंद्र चट्टोपाध्याय’ यांच्या कादंबरीवर आधारीत ‘देवदास’ या सिनेमातून माधुरीनं बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं. या सिनेमात तिच्यासोबत होते ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान. या सिनेमानं धडधडीत यश मिळवत तब्बल पाच राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर अवॉर्डवर आपलं नाव कोरलं. त्या वर्षीचा ‘देवदास’ हा उत्कृष्ट सिनेमा ठरला.

या सिनेमात माधुरीनं ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला होता. ऐश्वर्या राय आणि माधुरीला एकमेकींना टक्कर देताना ‘डोला रे डोला...’ हे गाणं भलतंच हिट ठरलं.

आजा नचले

आजा नचले


त्यानंतर बऱ्याच दिवस गायब झालेली माधुरी ‘आजा नजले’ या सिनेमात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसली. या सिनेमात तिनं, आपल्या नृत्य शिक्षकाची शेवटची आठवण असणाऱ्या ‘अजंटा’ या डान्स थिएटरला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या एका नृत्य दिग्दर्शकेची भूमिका निभावली होती. या सिनेमाला बॉक्सऑफिसवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसला तरी माधुरीच्या नृत्याला आणि अभिनयाला मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13

More Slideshow

8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीचे 10 स्मार्टफोन

इराकमध्ये भीषण नरसंहार!

फूटबॉल स्टार्स आणि त्यांच्या प्रेम कहाण्या...

`फादर्स डे` स्पेशल बॉलिवूडची गाणी

बॉलिवूडचे सुपर ‘डॅड’!

जगातील काही समाजाचे विचित्र अंत्यविधी प्रकार

माधुरी दीक्षितचे सर्वश्रेष्ठ सिनेमे

`मदर्स डे` निमित्त गिफट

`मदर्स डे` आणि गीते

लग्नाआधीच यांना लागली बाळाची चाहूल...

जगातील १० सर्वात धोकादायक पूल!

`बॉलिवूड`मध्ये येणारे नवे चेहरे

First Prev 1 2 3 4 5  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/हॅपी-बर्थडे-माधुरी_225.html