`होली है...`
सण असो वा सेलिब्रेशन... बॉलिवूड तुमची साथ देणार नाही असं होणं शक्य नाही. आता होळीचंच घ्या ना... होळी सेलिब्रेशन करताना बॉलिवूडच्या गाण्यांची साथ नसेल आणि त्या गाण्यांवर ताल धरणारे नसतील तर होळीचं सेलिब्रेशन ते काय… चला तर पाहुयात... गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी काही खास होळीची गाणी...
‘होली आई रे...’
‘मदर इंडिया’ सिनेमातील हे गाणं शमशेद बेगम यांनी गायलंय. भारतात होळीच्या सणाला किती महत्त्व आहे, हे या गाण्यातून उमगतं. बॉलिवूडला चार चाँद लावणाऱ्या १९५७ साली झळकलेल्या या सिनेमात नर्गिस, राजेंद्र कुमार, सुनिल दत्त आणि राजकुमार, मेहबुब खान यांनी भूमिका साकारल्या होत्या.
‘अरे जा रे नटखट…’
ग्रेट क्लासिक म्हणून ओळखलं जाणारं हे आणखी एक होळीच्या सणावर आधारीत गाणं... महिपाल आणि संध्या यांनी हे गाणं जीवंत केलंय. व्ही. शांताराम दिग्दर्शित, १९५९ साली प्रदर्शित झालेल्या नवरंग या सिनेमातील हे गाणं...
‘आज ना छोडेंगे...’
‘कटी पतंग’ या सिनेमातील हे एक गाजलेलं गाणं. किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणं आजही तितकंच तरुण आहे. ‘कटी पतंग’ हा सिनेमा १९७० साली प्रदर्शित झाला होता. होळी आहे आणि हे गाणं ऐकायला मिळालं नाही असं होणं शक्यच नाही... राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रीत झालेलं हे आणखी एक एव्हरग्रीन गाणं...
‘होली के दिन...’
किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे ‘शोले’ या सिनेमातील गाणं... धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी या गाण्यात जान टाकली.
‘रंग बरसे...’
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या सिलसिला या सिनेमातील हे गाणं... हरिवंशराय बच्चन यांच्या अगणित गाण्यांकीच एक... आणि या गाण्याला आवाज दिला होता त्यांचाच मुलानं... अमिताभनं... प्रेमात बुडालेल्या जीवांचे रंग या गाण्यातून आजही उठून दिसतात. शिव हरी यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं.
‘अंग से अंग लगाना...’
होळीच्या सणावरच बेतलेलं हे ‘डर’ या सिनेमातील आणखी एक गाणं... जुही चावला आणि सनी देओलवर चित्रीत झालेलं... सनीलाही या गाण्यानं ताल धरायला भाग पाडलं... म्हणजे तुम्ही समजू शकाल की होळीसाठी हे गाणं किती मस्त वातावरणनिर्मिती करून शकतं ते... हरिप्रसाद चौरसिया आणि शिव कुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय.
‘होली खेले रघुवीरा...’
द ग्रेट अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हे आणखी एक गाणं... होळी सेलिब्रेशनचं... अलका याग्निक, सुखविंदर सिंग आणि उदीत नारायण यांचाही आवाज या गाण्यात ऐकायला मिळतो. ‘बागबान’ या सिनेमात साठीच्या दरम्यान असतानाही बीग बीनं हेमामालिनीला इशारे करत ताल धरला...
/marathi/slideshow/होळी-अन्-बॉलिवूड_211.html