आलमट्टी धरणाची उंची वाढवणार, राज्याला महापूराचा धोका?

Last Updated: Sunday, December 1, 2013, 21:39

कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.